Another mega food park in the state of Maharashtra, Aurangabad

 1. महाराष्ट्रातले दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात वाहेगाव आणि धनगांव या गावांमध्ये उभारण्यात आले आहे. 
 2. ‘पैठण मेगा फूड पार्क’साठी 124.52 कोटी रुपये खर्च आला असून ते 102 एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे.
 3. यामध्ये ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रि-कुलिंग, रायपनिंग चेंबर्स, फ्रीझर रुम, अन्न तपासणी प्रयोगशाळा, दुधाचे टँकर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.
 4. राज्यातल्या तिसऱ्या मेगा फूड पार्कलाही मंत्रालयाने मंजुरी दिली असून ते वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
 5. राज्यातले पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात आहे.
 6. भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मेगा फूड पार्क योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
 7. मेगा फूड पार्क ही योजना "समूह" पध्दतीवर आधारित आहे. 
 8. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.
 9. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) द्वारे चालवले जातात, जे कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असतात. 


Hima Das: UNICEF India's young ambassador

 1. भारताची 18 वर्षीय धावपटू हिमा दास ह्यांची संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) इंडिया म्हणजेच UNCEFच्या भारतीय शाखेच्या प्रथम तरुण राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे.
 3. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते, ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती.
 4. पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
 5. पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घ-काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला.
 6. 1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले.
 7. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.


The 87th Interpol general assembly session held in Dubai

 1. संयुक्त अरब अमीरातच्या (UAE) दुबई शहरात दिनांक 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या काळात ‘आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल) महासभा 2018’ (General Assembly) भरविण्यात येणार आहे.
 2. महत्त्वपूर्ण सुरक्षात्मक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि जागतिक तज्ञांना एकत्र आणणार आहे.
 3. संघटित गुन्हे आणि दहशतवाद विरोधात लढ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच प्रगत तंत्रज्ञानाची भविष्यातील भूमिका वाढविण्यावर चर्चा केली जाणार आहे.
 4. दुबई पोलिसांनी स्वत:ला जगाच्या सर्वोत्तम कायद्याच्या अंमलबजावणी संस्थांमध्ये विकसित केले आहे.
 5. त्यासाठी युरोपियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट (EFQM) या संस्थेकडून दुबई पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्लॅटिनम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 6. ते हा पुरस्कार प्राप्त करणारे जगातले पहिले पोलीस दल बनले आहे.
 7. आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल / International Criminal Police Organisation) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जे आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्यासाठी सुविधा पुरवते.
 8. 1923 साली याची स्थापना करण्यात आली.
 9. फ्रान्समधील लिऑन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
 10. इंटरपोलमध्ये 192 देशांमधील (2017 सालापर्यंत) पोलीस दलांची सदस्यता आहे.


Two Parikramas in Arunachal Pradesh were inaugurated under Swadesh Darshan scheme

 1. भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत अरुणाचल प्रदेशात दोन परिक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. "ईशान्य परिक्रमांचा (North East Circuits) विकास" प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत -
  1. भालुकपोंग-बोम्दीला-तवांग प्रकल्प
  2. नाफरा-सेप्पा-पाप्पू, पासा, पाक्के व्हॅलीज-सांगदूपोटा-नवे सागाली-जीरो-योम्चा प्रकल्प
 3. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना सन 2014-15 मध्ये सुरू केली.
 4. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
 5. या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी 13 पर्यटन परिक्रमांची ओळख करण्यात आलेली आहे.
 6. ते आहेत - बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.


The 9th Annual Meeting of 'India-China Defense and Security Dialogue' concludes

 1. भारत आणि चीन या दोन देशांमधील ‘संरक्षण आणि सुरक्षा संवाद’ याची नववी वार्षिक बैठक चीनची राजधानी बिजींग या शहरात पार पडली.
 2. भारत आणि चीन दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी दोन्ही देशांच्या लष्करी दलांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर संरक्षण क्षेत्रासंबंधित विनिमय आणि परस्परसंवाद वाढविण्यास सहमती दर्शविलेली आहे.
 3. यावेळी 2019 सालामधील वार्षिक बैठक नवी दिल्लीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 4. चीन हा जगाच्या मध्यभागी वसलेला एक आशियाई देश आहे.
 5. हा जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
 6. भूप्रदेशाच्या आकारानुसार, चीन (क्षेत्रफळ सुमारे 96 लक्ष चौरस किलोमीटर) जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.
 7. बिजींग ही देशाची राजधानी असून रेन्मिन्बी (CNY) हे राष्ट्रीय चलन आहे. 


Top