Cleanliness Survey 2018: Indore is the cleanest city in India

 1. या वर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये इंदोर हे भारतातले सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. 
 2. मध्यप्रदेश राज्यातले दोन शहरे यावेळीही पहिल्या दोन क्रमांकावर आहेत आणि ते म्हणजे – इंदोर आणि भोपाळ.
 3. त्यानंतर चंदीगडने मागच्या सर्वेक्षणाच्या 11 व्या स्थानावरून पुढे येत यावेळी तिसरा क्रमांक मिळवला आहे.
 4. ठळक बाबी:-
  1. शीर्ष तीन सर्वात स्वच्छ शहरे (अनुक्रमे) – इंदोर, भोपाळ आणि चंदीगड
  2. शीर्ष तीन सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये (अनुक्रमे) – झारखंड, महाराष्ट्र आणि छत्तीसगड
  3. सर्वात स्वच्छ राज्य राजधानी - ग्रेटर मुंबई (किंवा बृहन्मुंबई)
  4. अभिनवता आणि सर्वोत्कृष्ट सरावांमध्ये सर्वोत्तम शहर – नागपूर (महाराष्ट्र)
  5. घनकचरा व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम शहर – नवी मुंबई (महाराष्ट्र)
 5. भारतातील सर्वात स्वच्छ शहर (क्षेत्रनिहाय):-
  1. उत्तर - भालसो (पंजाब)
  2. पूर्व – बुंदू (झारखंड)
  3. ईशान्य – काकचिंग (मणिपूर)
  4. दक्षिण – सिद्दीपेट (तेलंगणा)
  5. पश्चिम – पंचगनी (महाराष्ट्र)
 6. एकूण 52 पुरस्कार विविध विभागात घोषित करण्यात आले आहेत.
 7. स्वच्छता सर्वेक्षण-2018:-
  1. स्वच्छता सर्वेक्षण-2018 अंतर्गत यावेळी देशातल्या सर्व 4200 शहरांमधील साफसफाईबाबत परिस्थितीचे मूल्यांकन केले गेले.
  2. सर्वेक्षण शहरांचे मूल्यांकन तीन स्तरात केले जाते; ते म्हणजे
   1. सेवा पातळीवर झालेली प्रगती
   2. प्रत्यक्ष निरीक्षण
   3. नागरिकांकडून अभिप्राय.
  3. सेवा पातळीवर झालेली प्रगती अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-2018 मध्ये अभिनवता आणि सर्वोत्तम कार्यप्रणाली हा एक आणखी घटक जोडला गेला आहे.
  4. सन 2014 पासून स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात झाली; तेव्हापासून या कार्यक्रमांतर्गत केला गेलेला हा तिसरा सर्वेक्षण आहे.
  5. यापूर्वी 2017 साली अश्या सर्वेक्षणात 434 शहरांचा तर 2016 साली केवळ 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता.
  6. हे सर्वेक्षण क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया (QCI) कडून केले जाते.


 WHO's 'Replace' program for the transition of trans-fatty acid from diet till 2023

 1. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सन 2023 पर्यंत वैश्विक अन्नपदार्थांच्या पुरवठ्यामधून औद्योगिक रूपाने उत्पादित कृत्रिम ट्रान्स-फॅटी अॅसिड बाद करण्यासाठी एक व्यापक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे 'रिप्लेस (REPLACE)'.  
 2. अन्नपुरवठ्यामधून औद्योगिक रूपाने ट्रान्स-फॅटी अॅसिड बाद करण्यासाठी 'रिप्लेस' योजना सहा धोरणात्मक कृतींना प्रदान करते.
 3. औद्योगिकरीत्या बनवलेले ट्रान्स-फॅट यांच्या आहारशास्त्राविषयक स्त्रोतांचा आणि धोरणातील आवश्यक बदलासाठी पार्श्वभूमीचे पुनरावलोकन करणे.
 4. आरोग्यवर्धक फॅट्स आणि तेल घटकांसह औद्योगिकरीत्या बनवलेले ट्रान्स-फॅटच्या पुनर्स्थापनेस प्रोत्साहन देणे.
 5. औद्योगिकरीत्या बनवलेले ट्रान्स-फॅट यांच्या निर्मुलनासाठी नियामक कृती आणि कायदे तयार करणे.
 6. अन्न पुरवठ्यामधील ट्रान्स-फॅट घटकांचे मूल्यांकन करणे आणि देखरेख ठेवणे तसेच लोकसंख्येतील ट्रान्स फॅटच्या सेवनामध्ये बदल करणे.
 7. धोरण निर्माते, उत्पादक, पुरवठादार आणि जनतेमध्ये ट्रान्स फॅटच्या नकारात्मक आरोग्य प्रभावाविषयी जागरुकता निर्माण करणे.
 8. धोरणे आणि नियमांचे पालन करण्याचे प्रमाणन करणे.
 9. या योजनेमधून 2023 सालापर्यंतचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आखलेले एक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे.
 10. WHOच्या अंदाजाप्रमाणे ट्रान्स-फॅटी अॅसिडच्या सेवनाने हृदयरोगासंबंधी आजारांनी जगभरात दरवर्षी 5 लक्षहून अधिक मृत्यू होतात.
 11. ट्रान्स-फॅटी अॅसिड वगळणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याच्या अति सेवनाने हृदय रोगासारख्या आजारांची संभावना वाढते.
 12. ट्रान्स-फॅटी अॅसिडचे सर्वाधिक प्रमाण वनस्पती तूप आणि वनस्पती तेल मध्ये तर सर्वाधिक कमी प्रमाण तूप आणि लोणीमध्ये आढळून येते.
 13. डालडा, मार्गरीन यासारखे औद्योगिकरीत्या उत्पादित ट्रान्स फॅट अनेकदा स्नॅक्स, बेक्ड पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांच्या प्रक्रियांमध्ये वापरले जातात.


 Shashank Manohar: Second consecutive election as chairman of ICC

 1. शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे स्वतंत्र अध्यक्ष (chairman) म्हणून पदाच्या दुसर्‍या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड केली आहे.
 2. शशांक मनोहर यांच्याकडे सन 2016 मध्ये पहिल्यांदा ICC चे स्वतंत्र अध्यक्ष पद आले आणि आता पुढील 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा निवड केली आहे.
 3. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 4. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स या नावाने स्थापना केली होती
 5. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 6. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.
 7. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात.


Top

Whoops, looks like something went wrong.