India ranked 78th in the WEF Energy Transit Index

 1. जागतिक आर्थिक मंच (WEF) ने आपला ‘फोस्टरिंग इफेक्टिव एनर्जी ट्रांझीशन' नामक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात 114 देशांना सामील करण्यात आलेला ऊर्जा संक्रमण निर्देशांक (Energy Transition Index) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत कश्याप्रकारे देश संतुलन राखण्यास सक्षम आहे आणि कुठपर्यंत पर्यावरण संरक्षण राखण्यात व स्वस्त वीज उपलब्धतेत यशस्वी ठरला यांच्या आधारावर देशांची क्रमवारी ठरविण्यात आलेली आहे.
 3. ठळक बाबी:-
  1. क्रमवारीत स्वीडन प्रथम स्थानी आहे, तर भारत 78 व्या क्रमांकावर आहे.
  2. क्रमवारीत प्रथम 10 देशांमध्ये स्वीडननंतर अनुक्रमे नॉर्वे, स्वित्झर्लंड, फिनलंड, डेन्मार्क, नेदरलँड, ब्रिटन, ऑस्ट्रिया, फ्रांस आणि आयरलॅंड यांचा क्रम लागतो. या निर्देशांकात रशिया 70 वा, चीन 76 वा देश आहे.
  3. 43 देश असे आहेत, ज्यांनी उत्कृष्ट कार्यक्षमता ऊर्जा प्रणाली आणि उच्च-संक्रमण सज्जता वाढीव प्रदर्शित केली आहे, जे सध्याच्या कामगिरीनुसार ऊर्जा संक्रमणाशी निगडित करण्याची क्षमता दर्शवते.
  4. उद्योगासाठी ऊर्जेचा खर्च कमी करून आणि विजेच्या पुरवठ्यामधील गुणवत्तेत वाढ झाल्यामुळे चांगल्या कामगिरीला गती प्राप्त झाली आहे.
  5. नॉर्वेमध्ये जवळजवळ सर्व वीज जलविद्युत निर्मितीतून प्राप्त होत असल्याने कार्बन उत्सर्जनात तुलनेने कमतरता आली आहे.
  6. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय शाश्वतीकरणाच्या दृष्टीने सुमारे 14 देशांना संभाव्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
  7. कामगिरी कमी प्रदर्शित करणार्‍या श्रेणीतील देशांचे प्रमाण 50% हून अधिक आहे, जे अग्रगण्य देशांहून अधिक आहे. अहवालाच्या मते, हे वाढीव संक्रमण सज्जतेसाठी फायदेशीर परिणाम दर्शविते.
  8. व्हेनेझुएला आणि इराण यांच्यासह अनेक देशांना "उदयोन्मुख" म्हणून परिभाषित केले आहे, जे बहू-संक्रमण सज्जता श्रेणींमध्ये सुधारित संधी दर्शविते.

भारतासंबंधी ठळक बाबी

 1. अहवालानुसार, भारताने वीज उपलब्धता वाढवणे, ऊर्जा दक्षता आणि ऊर्जेच्या अक्षय स्त्रोतांची उपलब्धता या बाबतीत मोठ्या स्वरुपात पावले उचलली आहे. जेव्हा की, देशांमध्ये ऊर्जा संक्रमणाला मोठी गुंतवणूक, उपयुक्त वातावरण आणि योग्य कायदेशीर रूपरेषा देण्याची गरज आहे, जेणेकरून याला पाठिंबा मिळू शकणार आहे.
 2. भारताने सन 2013 आणि सन 2018 या कालावधीत आपल्या प्रदर्शनात 5.6% ची वृद्धी प्राप्त केलेली आहे.
 3. मुख्य रूपाने अधिक ऊर्जा उपलब्ध असून अनुदानात कमतरता आली आणि आयात खर्चात घट झाल्याचे आढळून आले आहे.
 4. भारत 2022 सालापर्यंत 175 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.


India has the second highest rate among GST countries: World Bank

 1. जागतिक बँकेने आपल्या ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’ अहवालात असे म्हटले आहे की, भारतात वस्तू व सेवा कर (GST) अधिक किचकट आहे.
 2. 1 जुलै 2017 पासून भारतात लागू GST मध्ये 5 स्तर तयार केले गेले आहे. ते आहेत – 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. सुवर्ण धातुवर 3% GST तर मौल्यवान दगडांवर 0.25% कर दर लागू आहे.
 3. सोबतच मद्य, पेट्रोलियम उत्पादने आणि बांधकाम क्षेत्र यावर लागू होणारा स्टॅम्प ड्यूटी आणि विजेचे बिल यांना GST च्या बाहर ठेवले आहे.
 4. जागतिक बँकेने कर-स्तरांची संख्या कमी करणे आणि कायदेशीर तरतुदींना सुलभ करण्याची शिफारस केली आहे.
‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’
 1. ठळक बाबी:-
 2. संपूर्ण आशियात, भारतात सर्वात उच्च मानक GST दर आहेत.
 3. भारतातील सर्वाधिक GST दर 28% आहे, जो GST व्यवस्था असलेल्या 115 देशांच्या नमुन्यांमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक दर आहे.
 4. भारत, इटली, लेक्सिमबर्ग, पाकिस्तान आणि घाना या 5 देशांमध्ये 5 कर-स्तर आहेत. अहवालानुसार, भारताशिवाय अन्य चार देशांची वर्तमान अर्थव्यवस्था खराब आहे.
 5. जगातल्या 49 देशांमध्ये GST चा एक दर लागू आहे, जेव्हा की 28 देश असे आहेत जेथे GST चे दोन दर आहेत.


Top