'IIT-Mumbai' tops in the country

 1. शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे.
 2. तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला दुसरे आणि आयआयटी-मद्रासला तिसरे स्थान मिळाले आहे.
 3. विशेष म्हणजे याच कंपनीने यापूर्वी केलेल्या जागतिक पाहणीत भारतात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला सर्वात चांगले मानांकन मिळाले होते.
 4. या विरोधाभासावर स्पष्टीकरण देताना कंपनीच्या जनसंवाद विभागाच्या संचालिका सिमोना बिझोझिरो यांनी सांगितले की, जागतिक आणि भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांच्या मानांकनाठी वापरलेले निकष वेगवेगळे होते.
 5. त्यामुळे एकाच संस्थेचा जागतिक यादीत आणि भारतीय यादीत वेगळा क्रमांक लागला आहे.
 6. जागतिक पातळीवर शिक्षणसंस्थांना मानांकन देताना संस्थेच्या शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी ४० टक्के गुण होते. तर भारतीय पातळीवर याच बाबीसाठी ३० टक्के गुण होते.
 7. भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन करताना शैक्षणिक लौकिकासाठी ३० टक्के, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या लेखी असणाऱ्या लौकिकासाठी २० टक्के, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तरासाठी २० टक्के, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये पीएचडीधारक कर्मचाऱ्यांच्या प्रमाणासाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार दर प्राध्यापक शोधनिबंधांसाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार प्रत्येक शोधनिबंधाच्या झालेल्या उल्लेखांसाठी ५ टक्के, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रमाणासाठी प्रत्येकी २.५ टक्के अशी गुण विभागणी केली होती.
 8. क्वाक्वारेली सायमंड्स(क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यपीठांचे मूल्यांकन जाहीर करते.
 9. जगभरातील विद्यपीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मूल्यांकन जाहीर करण्यात येते कंपनीने यापूर्वी चीनच्या शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन केले. त्यानंतर भारताचे मूल्यांकन केले.
 10. हे दोन्ही देश विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार महत्त्वाचे असल्याचे कंपनीने सांगितले. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियातील शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे.


October 18 to 24 in the maharashtra swastha bharat yatra

 1. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
 2. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'इट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वास्थ भारत यात्रा' चे देशात 16 ते 27 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
 3. 'स्वास्थ भारत यात्रा' बाबत माहिती देण्यासाठी एम. सी. ए. क्रिकेट क्लब बीकेसी, वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 4. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, एफएफएएसआयचे महाराष्ट्र विभागीय संचालक मुथ्थूमारन, दिल्ली येथील सहायक संचालक अखिलेश गुप्ता, एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जगमीत मदान, एएफटीएसआय संस्थेचे अध्यक्ष प्रबोध हलदे, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त सी. बी. पवार आदींसह राज्यभरातील सहआयुक्त, सहायक आयुक्त यावेळी उपस्थित होते.
 5. यावेळी बापट म्हणाले, एफडीए ने काल ऑनलाईन अन्न पदार्थ पुरवठा धारकांना अन्नपदार्थ पुरविणाऱ्या 113 आस्थापनांवर कारवाई केली.
 6. एकीकडे गरीब जनतेला एकवेळचे अन्न मिळण्यास अडचण येते. तर अन्न भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत भेसळ करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही.
 7. 'स्वास्थ्य भारत यात्रा' ही जनतेला चांगल्या अन्नाबाबत जागृती करण्याचे साधन ठरणार आहे. या यात्रेत एफडीए, एनसीसी यासह सर्वच प्रशासन तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे.
 8. अन्नाबाबतची जागृती ही यात्रेपुरती मर्यादित न राहता निरंतर राहावी, असेही ते म्हणाले.
 9. यावेळी प्रास्ताविकात डॉ. दराडे म्हणाल्या, स्वास्थ भारत यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे, अन्न चाचणी, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमांचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे.
 10. स्वास्थ भारत यात्रेची प्रत्यक्ष सुरुवात जागतिक अन्न दिनाच्या पूर्वसंध्येला ता.16 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यामध्ये सहभागी होणारे संपूर्ण प्रवास सायकल वरून करणार आहेत. यात्रेसाठी संपूर्ण देशात एकूण 6 मार्ग बनवले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मार्गांचाही समावेश आहे.
 11. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. प्रत्येक ट्रॅकवर साधारण 25 सायकलपटू असणार आहेत.
 12. हे सायकलपटू 50 ते 60 कि.मी. अंतर पूर्ण करुन प्रत्येक टप्प्यात 2 ते 3 गावात आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत व महाराष्ट्रातील 33 ठिकाणी भेटी देणार आहेत आणि पुढील सायकल पथकाला रिले बॅटन सुपूर्द करणार आहेत. 


Constitution Week from November 26 in the state

 1. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये,सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये 26नोव्हेंबरपासून संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
 2. संविधान सप्ताहामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊन संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करतील.
 3. या सप्ताहामध्ये संविधानावर आधारित निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम राबविले जातील.
 4. तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी शालेय शिक्षण,ग्रामविकास, नगरविकास, गृह तसेच संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याची माहिती श्री.बडोले यांनी दिली. 


Prof-Abhay-Ashtekar-will-be-honored-with-prestigious einstein award

 1. भारतीय वंशांचे अमेरिकेतील शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित असा आईनस्टाईन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून ही घोषणा करण्यात आली. प्रा. अष्टेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 3. प्रथमच एका मराठी माणसाला हा आईनस्टाईन पुरस्कार दिला जात असल्याने अवघ्या महाराष्ट्रातील जनसामान्यांना त्यांचा अभिमान वाटत असून त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 4. प्रा. अभय अष्टेकर हे गेल्या ४० वर्षांपासून गुरुत्वाकर्षण विज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.
 5. अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून प्रा. अष्टेकर यांना १० हजार डॉलर्सची रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाणार आहे. १९९९ पासून महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.
 6. प्रा. अष्टेकर हे पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅवेहिटेशन अँड द कॉसमॉसचे निर्देशक आहेत.
 7. विज्ञानातील भौतिकशास्त्रातील ब्लॅक होलचा सिद्धांत, सामान्य सापेक्षता आणि क्वांटम फिजिक्समधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 8. प्रा. अभय अष्टेकर हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. पुढे त्यांनी टेक्सास विद्यापीठातून गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी संपादन केली. त्यानंतर शिकागो विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले.
 9. आजवर अनेक नामांकित विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. फ्रान्स, कॅनडा आणि भारतातील महत्वाच्या पदावरही त्यांनी काम केले आहे.
 10. “शाळेत असताना मी न्यूटनचा सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षणाची माहिती घेतली.
 11. ज्या बलामुळे कोणतेही साहित्य पृथ्वीवर येते त्याच बलामुळे पृथ्वी ही सुर्याची परिक्रमा करत आहे.” असे प्रा. अष्टेकर यांनी म्हटले.
 12. तसेच येत्या अनेक दशकांपर्यंत भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रातील शोधांवर गुरुत्वाकर्षण या विषयाचे प्रभुत्व राहील. भौतिक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ हे चांगले काम करत आहेत.
 13. भौतिक क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ हे चीनच्या तुलेनेत पुढे आहेत. असे मत प्रा. अष्टेकर यांनी मांडले.


Due to the demise of Kashinath Wadekar, mourning at the literary movement

 1. मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे.
 2. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाचीसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे.
 3. येथील साहित्य चळवळीचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. आरती मासिकातील मात्रा आणि वेलांट्या हे सदर तर त्यांचे खूपच गाजले होते. त्यांच्या या सदरांची दखल खुद्द कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी ही घेतली होती. तसेच त्यांच्या या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावनाही दिली होती.
 4. प्रा. काशीनाथ वाडेकर हे मूळचे सांगली येथील पण त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा सावंतवाडीमध्ये घालवला.
 5. ते येथील पंचम खेमराज महाविद्यालयात मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी वर्गाबरोबरच सावंतवाडीतील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जवळचे संबध होते.
 6. वाडेकर सरांना पूर्वीपासूनच लेखनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपला बराच काळ हा सिंधुदुर्गातील सहित्य क्षेत्रात घालवला.
 7. ते कोकण मराठी साहित्य परिषदेशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचा आरती मासिकाशी विशेष संबध आला. त्यांनी आरती मासिकामध्ये मात्रा आणि वेलांटी हे सदर सुरू केले.
 8. हे सदर त्यांचे विशेष गाजले होते. सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे हे सदर होते. त्यांच्या या सदराची तेव्हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही विशेष दखल घेतली होती.
 9. त्यानंतर मात्रा व वेलांट्या या नावाने पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्याला पाडगावकर यांनी खास अशी प्रस्तावनाही दिला होती. अनेक जण आरती मासिकातील मात्रा व वेलांटी हे सदर वाचण्यासाठी उत्सुक असायचे. त्यामुळे मात्रा व वेलांटीमुळे सरांचे विशेष नाव झाले आणि ते साहित्य क्षेत्रात नावारूपास येऊ लागले.
 10. सावंतवाडीत मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या आयोजनातही सरांचा मोठा वाटा होता. सर फु. मा. भावे या राज्यस्तरावर संस्थेचे सहकार्यवाह म्हणून काम पाहात होते. ते आणि कै. प्रा. रमेश चिटणीस यांच्यात चांगला स्नेह होता.
 11. चिटणीस यांचे निधन झाल्यानंतर प्रा. वाडेकर यांनी त्यांच्यावर विशेष असे आनंदयात्री हे पुस्तक लिहले होते. आणि ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले होते.
 12. सावंतवाडीत असताना त्यांनी अनेक कथा कादंबऱ्याही लिहील्या आहेत. अनेक लेखकांच्या कथा कादंबऱ्यांवर समिक्षा किंवा चर्चा ते घडवून आणत असत. सावंतवाडीतील नाट्यदर्शन चळवळीशी त्यांचा जवळचा संबध होता. त्यानी अनेक नाटकात स्वत: हून काम केले आहे.
 13. साहित्य चळवळीशी जोडले गेल्याने त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते. सावंतवाडीत झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाला वाडेकर सर यांनी खास उपस्थिती लावली होती. सिंधुदुर्गमध्ये साहित्याच्या संबधित कोणतेही काम असले की वाडेकर सर पुढे असायचे.
 14. आपली ३५ वर्षे त्यानी प्राध्यापक म्हणून सावंतवाडीत घालवली. या काळात ते शहरातील माठेवाडा भागात राहात असत. पंचम खेमराज महाविद्यालयातून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ सांगली येथे जाणे पंसत केले. मात्र त्यांचे सावंतवाडीवरचे प्रेम कमी झाले नाही.
 15. कोकण मराठी साहित्य परिषद असो अगर सावंतवाडीतील साहित्यातील कोणतीही घडामोड असू दे वाडेकर सर हे सावंंतवाडीत येणारच, असे ठरले होते.

 


Top