1. देशभरात मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन झाल्याने केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या डाळींवरील साठवणूकीच्या मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता मोठ्या व्यापाऱ्यांनाही डाळ घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 2. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना डाळवर्गीय पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदा देशभरात सर्व प्रकारच्या डाळींचे विक्रमी उत्पादन झाले. पण डाळीचे उत्पादन वाढल्याने भाव कमालीचे घसरले होते. यामुळे डाळ उत्पादक शेतकरी हवालदील झाला होता. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी ट्विटरवरुन महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहता राज्यांनी सर्व प्रकारच्या डाळीवरील साठवणूक क्षमतेवरील मर्यादा हटवाव्यात असे निर्देश पासवान यांनी दिले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे त्यांनी म्हटले आहे.
 3. साठवणूक मर्यादेमुळे व्यापाऱ्यांना ठराविक प्रमाणातच डाळ खरेदी करता येत होती. पण आता ही मर्यादा हटल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 4. साठवणूक मर्यादा हटल्याने डाळीचे भाव पुन्हा वाढतील अशी चर्चा सुरु झाली होती. पण या चर्चा निरर्थक असून डाळीचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
 5. दोन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. २०१५ साली तूरडाळीचे भाव २४० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते.
 6. डाळ महागल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते. जगातील विविध देशांतून डाळ आयात करूनही पुरेशी डाळ बाजारपेठेत उपलब्ध होत नव्हती.
 7. यानंतर सरकारने शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. सुदैवाने निसर्गानेही साथ दिली अन् डाळवर्गीय पिकांचे उच्चांकी उत्पादन झाले आहे.


UJJWALA YOJANA 1

१३ मे २०१७ रोजी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आसाममध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा(PMYU) शुभारंभ केला आहे.

PMYU(१ मे २०१६) योजने अंतर्गत BPL कुटुंबाना आणि महिलांच्या नावाखाली कुटुंबाना ५ कोटी LPG जोडणी दिली जाईल.

केंद्र सरकारच्या प्रती LPG जोडणी १६०० रुपये अनुदानासोबातच आसाम सरकार आणखी १००० रुपये देणार आहे.


 1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी करमळकर यांच्या नियुक्तीबाबतची घोषणा केली आहे.  
 2. कुलगुरूपदाच्या अंतिम मुलाखती मंगळवारी राजभवनात पार पडल्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या मुलाखती घेतल्या.
 3.  
 4. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील कुलगुरू शोध समितीकडे ९० उमेदवारांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी करून समितीने ३२ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले. त्यातून ५ जणांची शॉर्टलिस्ट तयार करून समितीने राज्यपालांकडे सोपविली.
 5. या समितीमध्ये काकोडकर यांच्यासह जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार आर. यरागट्टी व सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचा समावेश होता.

 डॉ. नितीन करमळकर यांचा परिचय

 1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम पाहिले आहे.


Top