Chennai tops the list of Internet broadband speeds

 1. ऊकला या इंटरनेट 'स्‍पीड टेस्‍ट' च्या मूळ कंपनीने इंटरनेट ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीत केलेला अभ्यास ‘इंडियाज डिजिटल डिव्हाईड: होऊ ब्रॉडबॅंड स्पीड स्प्लिट्स द नेशन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीत चेन्नई अग्रस्थानी आहे.
 3. चेन्नईमध्ये सर्वाधिक स्थिर ब्रॉडबॅंड डाऊनलोड स्पीड उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले. मात्र ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये ब्रॉडबॅंड स्‍पीड सर्वाधिक कमी दिसून आला आहे.
 4. भारतात सध्या 100 दशलक्षाहून अधिक सक्रिय इंटरनेट वापरकर्ते आहेत, जे स्‍मार्टफोन, लॅपपटॉप वा डेस्‍कटॉप अश्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून इंटरनेट वापरतात. याबाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे.
 5. भारतातल्या सर्व इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 12 दशलक्ष जणांकडे फिक्स्ड ब्रॉडबॅंड कनेक्‍शन आहे. त्यांना भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी इंटरनेट स्‍पीड मिळतो.
‘इंडियाज डिजिटल डिव्हाईड: होऊ ब्रॉडबॅंड स्पीड स्प्लिट्स द नेशन’
 1. ठळक बाबी:-
 2. चेन्‍नईमध्ये ब्रॉडबॅंड कनेक्‍शनवर डाउनलोडिंग स्‍पीड 32.67 Mbps आहे, जी इतर शहरांच्या तुलनेनी 57.7% अधिक आहे. त्यानंतर 27.2 Mbps सह बेंगळुरूचा क्रमांक लागतो.
 3. ब्रॉडबॅंड इंटरनेट स्‍पीडच्या बाबतीत दिल्‍ली 18.16 Mbps सह पाचव्या क्रमांकावर आहे, जेव्हा की चार मेट्रो शहरांच्या यादीत 12.06 Mbps सह मुंबई सर्वात शेवटी आणि एकूणच यादीत आठवा आहे. देशातील सरासरीपेक्षा 62.4% इतक्या धीम्या गतीसह पटना हे देशातील सर्वात कमी इंटरनेट स्‍पीड असणारे शहर आहे.
 4. राज्यांच्या बाबतीत, देशात सर्वाधिक वेगवान बॉडबॅंड इंटरनेट स्‍पीड कर्नाटकमध्ये मिळतो, जी की सरासरी डाउनलोडिंग स्‍पीड 28.46 Mbps एवढी आहे. त्यानंतर 27.94 Mbps सह दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू आहे. मिजोरममध्ये ब्रॉडबॅंडवर डाउनलोडिंग स्‍पीड 3.62 Mbps आहे, जी की संपूर्ण देशात उपलब्‍ध इंटरनेट स्‍पीडच्या 82.5% कमी आहे.
 5. मोबाइल इंटरनेट स्‍पीडच्या बाबतीत भारत जगामध्ये 109 व्या स्थानी आहे. तर ब्रॉडबॅंड कनेक्‍शनच्या बाबतीत 67 व्या क्रमांकावर आहे.


The Union Cabinet approved four mutually agreed agreements with Iran

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान 17 फेब्रुवारी 2018 रोजी पुढील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

 1. पारंपारिक औषध प्रणालीच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
 2. दुहेरी कर टाळण्यासाठी करार (DTAA):-
  1. कराराच्या माध्यमातून उत्पन्नावरचा दुहेरी कर टाळण्यासाठी आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी माहितीची देवाण घेवाण केली जाणार. सध्याच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माहितीची देवाण घेवाण करण्यात येणार आहे. हा करार G 20 OECD बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग (BEPS) प्रकल्पाच्या किमान मानकांची पूर्तताही करत आहे. 
  2. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 90 अनुसार केंद्र सरकार, एखाद्या देशाबरोबर दुहेरी कर टाळण्यासाठी किंवा प्राप्ती कर कायद्याअंतर्गत करपात्र उत्पन्नासंदर्भात, कर चुकवेगिरी टाळण्यासाठी माहितीची देवाण घेवाण  करण्यासाठी DTA करार करू शकते.
 3. कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  1. पिके, कृषी विस्तार, बागायत, यंत्र सामग्री, कापणी नंतरचे तंत्रज्ञान, पत, सहकार्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य लाभणार आहे. याशिवाय मृदा संवर्धन आणि जल व्यवस्थापन, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, बियाणे तंत्रज्ञान आणि विपणन या क्षेत्रातही सहकार्य करण्यात येईल.
  2. पशुधन सुधारणा, दुग्ध विकास, पशु आरोग्य आणि सामंजस्य कराराच्या कक्षेत येणाऱ्या आणि परस्पर संमतीच्या  इतर क्षेत्राचाही यात समावेश आहे. तज्ञाचे आदान प्रदान, साहित्य आणि माहिती, प्रशिक्षणार्थी आणि वैज्ञानिकांचे अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांची देवाण घेवाण, उपयुक्तपरिषद आणि कार्यशाळा यांचे आयोजन तसेच परस्पर सहमतीने मान्य झालेल्या मुद्द्यांवरही सहकार्य करण्यात येईल.
 4. आरोग्य आणि औषधी क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य करार:-
  1. आरोग्य आणि औषधी क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.
  2. डॉक्टर आणि इतर आरोग्य विषयक व्यावसायिकांना प्रशिक्षणामधल्या अनुभवांची देवाण घेवाण; मनुष्यबळ विकास आणि आरोग्य सेवा, औषधी निर्माण, वैद्यकीय उपकरणे, प्रसाधने यासाठी नियमन आणि यासंदर्भात माहितीचे आदान प्रदान वैद्यकीय संशोधन, आदी कार्ये चालवली जाणार आहे.
 5. इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराणचे पूर्वीचे नाव ‘पर्शिया’ असे होते. तेहरान हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि इराणी रियाल हे चलन आहे. पर्शियन ही देशाची अधिकृत भाषा आहे.


Top