The new indicator system has been found in the body's immune system

 1. स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधकांना शरीराच्या प्रतिकार प्रणालीत योगदान देणारी पूर्वी अज्ञात अशी सूचक प्रणाली आढळून आली आहे.
 2. पांढऱ्या रक्त पेशींमधील मिटोकॉंड्रिया DNA तंतूचे "इंटरफेरॉन टाइप 1" नामक एक जाळे बाहेर टाकतो, ज्यामुळे चेतावणी मिळते. 
 3. पांढऱ्या रक्त पेशी या शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे प्रमुख घटक आहेत.
 4. संशोधनात असे दिसून आले आहे की, या पेशींपैकी अनेक प्रकारच्या पेशी लहान डीऑक्सीरायबो-न्यूक्लिइक ऍसिड (DNA) च्या विघटनांच्या घटनेला प्रतिसाद देतात, जी की ही प्रक्रिया जिवाणू आणि विषाणू यांच्या DNA बाबतही आढळून येते.
 5. "इंटरफेरॉन टाइप 1" ची कार्यप्रक्रिया:-
  1. पांढर्‍या रक्त पेशी मिटोकॉंड्रियल DNA (mDNA) तंतूचे एक जाळे बाहेर टाकतात. 
  2. मिटोकॉंड्रिया सर्व पेशींमध्ये उपस्थित असते आणि पाणी आणि कार्बन डायॉक्साईड तयार करण्यासाठी शर्करा आणि चरबी जाळून सामान्यत: पेशीद्वारे आवश्यक ऊर्जेची निर्मिती करतात.
  3. हे बाहेर पडणारे जाळे आसपासच्या पेशींकडे सूचना पाठविते, की शरीरावर आक्रमण झाले आहे आणि इतर पांढर्‍या रक्त पेशींना "इंटरफेरॉन टाइप 1" नामक सूचक पदार्थ सोडण्यास मदत होते. 
  4. हा पदार्थ संक्रमणाशी लढा देण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीला मदत करतो.
  5. हा शोध पुढील अभ्यासांची शक्यता वाढवतो, ज्यामध्ये mDNA चे उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न केल्या जाईल आणि अशाप्रकारे सूज, जळजळ वा संक्रमण कमी होऊ शकणार आहे.
या शोधात नवीन असे काय आहे?
 1. पूर्वी "न्युट्रोफिल" म्हणून ओळखले जाणारे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये पांढर्‍या रक्त पेशींनी बनविलेले इतर प्रकारचे जाळे ज्ञात आहे. 
 2. या पेशी-उत्सर्जित पदार्थावर जिवाणू-रोधी प्रथिनाचा एक थर असतो. मात्र, नव्याने सापडलेले "इंटरफेरॉन टाइप 1" जाळे सैद्धांतिकदृष्ट्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.
 3. "इंटरफेरॉन टाइप 1" जाळे अगदी काही मिनिटांतच सक्रिय होतात, जे न्युट्रोफिल-आधारित जाळ्यापेक्षा वेगवान आहे. 
 4. शिवाय, मिसळण्यापूर्वी हे mDNA जाळे रक्तात अधिक काळ टिकून राहतात.
 5. या अभ्यासामुळे सूक्ष्मदर्शी रोग आणि कर्करोगाबद्दल ज्ञानात वाढ होऊ शकते.


Israeli Prime Minister Benjamin Netanyahu visits India

 1. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांचे स्वागत केले.
 2. भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
 3. भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान नेतन्याहू दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.
 4. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
 6. यापूर्वी २००३मध्ये एनडीए सरकारच्या काळात इस्रायचे तत्कालिन पंतप्रधान एरियल शेरॉन भारत भेटीवर आले होते.

भारत आणि इस्रायलदरम्यान ९ सामंजस्य करार

 1. बेंजामिन नेतन्याहू यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली.
 2. त्यानंतर मोदी आणि नेतान्याहू यांनी भारत आणि इस्रायलदरम्यान ९ सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
 3. सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत.
 4. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत.
 5. भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली.


Name of Trimurti Chowk of Delhi, named as "Trimurti Haifa Chowk"

 1. भारत आणि इस्रायल यांमधील संबंधांना मजबूत बनविण्याच्या दिशेने इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत भेटीवर आले आहेत.
 2. त्यावेळी हैफाच्या स्वातंत्र्य चळवळीत वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे नामंतरण करण्यात आले.
 3. हैफा हे उत्तर इस्राइलचे बंदर शहर आहे.
 4. हैफाची लढाई पहिल्या विश्वयुद्धाच्या दरम्यान 23 सप्टेंबर 1918 रोजी शरोनची लढाई संपवण्यासाठी लढली गेली.
 5. या लढाईत भारतीय 15 वे (इम्पेरियल सर्व्हिस) कॅव्हेलरी ब्रिगेड, 5 वे कॅव्हलरी डिव्हिजन आणि डेझर्ट माउटेड कॉर्प्सचा भाग या भारतीय सैन्य तुकडीने ओट्टोमन साम्राज्यावर हल्ला चढवून हैफा आणि एकर या शहरांना ताब्यात घेतले.
 6. जोधपूर, हैदराबाद, म्हैसूर येथील जवान युद्धासाठी इस्रायलला गेले होते. या युद्धात ४४ भारतीय जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता.
 7. युद्धानंतर या जवानांच्या नावाने दिल्लीत ‘तीन मूर्ती चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. परंतु आता त्याचे नाव बदलून मोदींनी ‘तीन मूर्ती हाइफा मार्ग’ असे केले आहे.
 8. बेंजामीन नेतान्याहू, त्यांची पत्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन मूर्ती हायफा चौक येथे जाऊन या शहिदांना आदरांजली वाहिली.
 9. हैफाच्या स्वातंत्र्य चळवळीत वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हैफा दिवस साजरा केला जातो. 


15th January: Indian Military Day

 1. भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. यावर्षी 70 वा लष्कर दिन साजरा होतोय.

 2. १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिनानिमित्त देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील अमर जवान ज्योति येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
 3. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत, नौदलाचे प्रमुख सुनील लांबा आणि हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
 4. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
 5. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती.
 6. त्यावेळी के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचे 'कमांडर-इन-चीफ' बनविण्यात आले होते आणि ते पहिले प्रजासत्ताक भारताचे प्रथम लष्कर प्रमुख बनले.
 7. या ऐतिहासिक क्षणानिमित्त भारतीय सेनेकडून दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते.
 8. ‘लष्कर दिन’ हा देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वीरांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूने साजरा करतात.
 9. 15 जानेवारी 1949 पासूनच भारताचे लष्कर ब्रिटिश लष्करापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले.
 10. या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो.


A 7-member committee of the BCI to resolve the disputes between Supreme Court judges

 1. भारतीय बार मंडळाकडून 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामधील वादात समेट घडवण्याचे काम ही समिती करणार आहे.
 2. सर्वोच्च न्यायालयातल्या चार जेष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारतीय बार मंडळाने हा पुढाकार घेतला.
 3. समितीचे सदस्य जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ या चारही न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील.
 4. यांनी 12 जानेवारीला एका पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
 5. या प्रकारची घटना न्यायपालिकेच्या इतिहासात प्रथमच घडून आलेली आहे.
 6. भारतीय घटनेच्या परिच्छेद 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे.
 7. वर्तमानात न्यायालयात एक भारतीय सरन्यायाधीश (CJI) आणि कमाल 30 अन्य न्यायाधीश पदांची तरतूद आहे.
 8. याचे मुख्यपीठ नवी दिल्लीत आहे. भारतीय सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून (परीच्छेद 124) केली जाते.


Girls 'birth rate increased in Haryana - 914 girls' ratio per thousand boys

 1. हरियाणात मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत आहे.
 2. वर्ष 2017 मध्ये 1000 मुलांमागे 914 मुलींचे सर्वोच्च नवजात लिंग गुणोत्तर (sex ratio at birth -SRB) नोंदवले गेले आहे.
 3. जेव्हा की हे प्रमाण 2016 साली 900 आणि 2015 साली फक्त 876 एवढे होते.
 4. राज्याच्या 17 जिल्ह्यांमध्ये 900 हून अधिक मुलींचा जन्मदर दिसून आलेला आहे.
 5. वर्ष 2017 मध्ये कोणताही जिल्हा 880 च्या आकड्याखाली नाही.
 6. जानेवारी-डिसेंबर 2017 या काळात राज्यात जन्मलेल्या 5,09,290 बाळांपैकी 2,66,064 मुले आणि 2,43,226 मुली होत्या.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पानीपत 945 च्या SRB च्या आकड्यासह सर्वोच्च स्थानी राहिले.
 2. त्यानंतर यमुनानगरचा (943) क्रमांक लागतो. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार महेंद्रगड, रेवाडी, सोनीपत आणि जज्जर जिल्ह्यात नवजात लिंग गुणोत्तर 800 हून कमी होते.
 3. ज्यांचे SRB आकडे सध्या अनुक्रमे 136, 91, 88, 96 असे आहेत.
 4. भारत सरकारने वर्ष 2015 मध्ये 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेची सुरुवात केली होती.
 5. जेव्हा ही मोहीम सुरू केली गेली, तेव्हा हरियाणा राज्याच्या 20 मधील 12 जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर अत्याधिक कमी होते.


Top

Whoops, looks like something went wrong.