India's economic growth rate in 2018-19: 7.3 percent: ADB

 1. आशियाई विकास बँकेच्या आउटलुक सप्लीमेंटने चालू आर्थिक वर्ष 2018 - 19 मध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर 7.3% राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.
 2. तर अर्थिक वर्ष 2019 - 20मध्ये मध्ये आर्थिक विकास दर ७.६ टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे.
 3. भारताची वाढती निर्यात आणि उच्च औद्योगिक आणि कृषी उत्पादन ही याची मुख्य कारणे आहेत.
 4. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर 7.1% होता तर पहिल्या तिमाहीत तो 8.2% होता.
 5. खाद्य पदार्थांच्या किंमतीतील वाढ, ग्रामीण उपभोगात घट आणि कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ जास्त किंमत यामुळे विकास दरात ही घट झाली होती.


Yellow West movement

 1. अलीकडेच फ्रान्समध्ये सुरु असलेले ‘यलो वेस्ट आंदोलन’ खूप चर्चेत आहे. या आंदोलनाची सुरुवात मे 2018 मध्ये झाली. यानंतर 17 नोव्हेंबरपासून फ्रान्समध्ये प्रदर्शने सुरू झाले.
 2. यलो वेस्ट:
  1. या आंदोलनात निषेध दर्शविण्यासाठी पिवळ्या रंगांच्या वस्त्राचा वापर केला जात आहे.
  2. याद्वारे आंदोलक नेत्यांचे लक्ष आपल्या अजेंड्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
  3. या आंदोलनाची मुख्य कारणे सामाजिक-आर्थिक आहेत.
  4. इंधनाच्या वाढत्या किंमती आणि मध्यमवर्गीयावरील असंतुलित कराच्या प्रमाणात वाढ ही याची मुख्य कारणे आहेत.
 3. आंदोलनाची कारणे :-
  1. इंधनावरील कारमध्ये वाढ.
  2. कार्बन कर लागू करणे.
  3. ट्रॅफिक एन्फोर्समेंट कॅमेरा.
  4. 2017 मध्ये संपत्ती करावरील solidarity कर काढून टाकणे.
  5. जागतिकीकरण आणि नव-उदारवाद.
 4. आंदोलकांच्या मुख्य मागण्या :-
  1. इंधनावरील लागू केलेला कर कमी करणे.
  2. मध्यम वर्गावरील असंतुलित कराचा भार कमी करणे.
  3. किमान वेतनाचा दर वाढविणे.
  4. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या फ्रान्सचे अध्यक्षपदाचा राजीनामा.


'Jeet' Project: TB-Free Maharashtra: 13 Cities in the State

 1. ‘जीत’ प्रकल्प : क्षयरोगमुक्त महाराष्ट्र: राज्यातील १३ शहरांचा समावेश
 2. 'जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे.
 3. या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.  
 4. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे 'राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम' अंतर्गत 'जीत' प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.


Signature on bilateral annual Hajj 2019 agreement in India and Saudi Arabia

 1. 13 डिसेंबर 2018 रोजी भारत आणि सौदी अरेबिया यांनी जेद्दाह येथे द्विपक्षीय वार्षिक हज 2019 करारावर स्वाक्षरी केली.
 2. केंद्रीय अल्पसंख्यक खात्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि हज आणि सौदी अरेबियाचे मंत्री डॉ. मोहम्मद सालेह बिन ताहर बेंटन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
 3. महत्त्वाचे मुद्दे-
  1. मेहरम (पुरुष साथी) शिवाय मोठ्या संख्येने मुस्लिम महिला हज 2019 मध्ये जाण्याची शक्यता आहे. 2100 पेक्षा जास्त महिलांनी आत्तापर्यंत यासाठी अर्ज केला आहे.
  2. 2017 मध्ये पहिल्यांदा पुरुष सहकार्याशिवाय हज येथे जाण्यावर घातलेली बंदी भारत सरकारने उचलली होती.
  3. सुमारे 1300 भारतीय मुस्लिम महिला 2018 मध्ये पुरुष सहकार्याशिवाय हजला गेल्या होत्या.
  4. सध्या भारताच्या हज कमिटीला हज 2019 साठी 2 लाख 47 हजार अर्ज मिळाले आहेत, ज्यातील 47 टक्के स्त्रिया आहेत.
  5. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतातून 1,75,025 मुस्लिम हज 2018 मध्ये गेले होते.


P. V. Sindhu won the World Tour Finals title

 1. भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ग्वांगझूमधल्या वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
 2. तिनं अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचं कडवं आव्हान 21-19, 21-17 असं मोडीत काढलं.
 3. सिंधूचं वर्ल्ड टूर फायनल्सचं हे पहिलंच विजेतेपद ठरलं.
 4. याआधी 2017 च्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
 5. सिंधूचा हा कारकिर्दीतील 300 वा विजय ठरला. सलग सात पराभवानंतर अखेर सिंधूने आज विजेतेपद पटकावले. 


Top