16000 crore Water network scheme For Marathwada

मराठवाडय़ातील दुष्काळाची तीव्रता वाढून त्याची वाटचाल वाळवंटीकरणाकडे होत असताना सरकारने या भागासाठी १६ हजार कोटी रुपयांची बंद नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच देशातील बहुतांश भागात तीन वर्षांत बंद नळातून  पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असताना मराठवाडय़ाला पाणीपुरवठा करण्यासाठी ११ प्रमुख धरणातून हजारो कि.मीची बंद पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

त्यामुळे ही धरणे जोडली जाणार आहेत. यात जलशुद्धीकरण प्रकल्प व पंपिंग स्टेशन या सुविधांचाही यात समावेश आहे.

मराठवाडयातील पाच जिल्ह्य़ांत मोसमी पावसाची तूट २० ते ४२ टक्के असून महाराष्ट्राच्या इतर भागात पूरस्थिती आहे.

सोळा हजार कोटींची नवी योजना ‘मराठवाडा जलसंजाल’ नावाने ओळखली जाणार असून त्याच्या पहिल्या निविदा या आठवडाभरात निघणार आहेत.

यात पहिल्या टप्प्यात ४५२७ कोटींच्या कामांचा समावेश आहे. मराठवाडय़ातील एकूण ११ प्रमुख धरणे यामुळे जोडली जाणार असून त्यासाठी १.६ मी. ते २.४ मी व्यासाची पाईपलाईन वापरली जाणार आहे.

प्राथमिक जाळ्यात अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणातील पाणी फिरवले जाणार आहे. ते कमी पातळीच्या धरणात आणले जाईल.

सध्या जायकवाडी या मोठय़ा धरणाचे दरवाजे थोडेसे उघडण्यात आले आहेत, पण इतर १०  धरणात पाण्याचा मृत साठाच शिल्लक आहे. आताच्या या प्रकल्पाचा हेतू हा  दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आहे.

या भागात नेहमीच दुष्काळ असतो, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारसू यांनी सांगितले.  ते म्हणाले, की मराठवाडा जलसंजाल हे या भागाची परिस्थिती एकदम बदलून टाकील यात शंका नाही.

पाइपलाइन व पंप हाऊस यामुळे हे संजाल हे वीज संजालासारखे काम करील. जास्त पाणी असलेल्या धरणांचे पाणी प्रक्रिया करून नंतर टंचाई असलेल्या तालुक्यांना दिले जाईल. जवळच्या धरणात आणून हे पाणी तालुक्यांना दिले जाणार आहे. ५ कि.मी ते १० कि.मी अंतरात यातील टॅपिंग केले जाईल.

मराठवाडा जल संजालास कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणीही मिळणार आहे, जे सध्या अरबी समुद्रात वाहून जाते. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणीही यात समाविष्ट केले जाईल.

सुरूवातीला औरंगाबाद-जालना व बीडसाठी निविदा काढण्यात येणार असून उर्वरित तीन भागांच्या निविदा या ऑक्टोबरमधील निवडणुकांनंतर काढण्यात येणार आहेत.

इस्रायलची सल्लागार कंपनी 

इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी यात सल्लागार असून त्यांनी जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्य़ाची इ.स.२०५० पर्यंतची पाण्याची गरज निश्चित करून योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 

यात सध्याच्या पाइपलाइन व इतर मुद्दय़ांचा विचार करून अहवाल सादर केला जाणार आहे. इस्रायलमध्ये पुरेसा पाऊस नसतानाही या कंपनीने गलिली सरोवरातून पाइपलाइनने पाणी उपलब्ध करून दिले आहे.


Jammu-Kashmir Article 370 UN Pak and China fail

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीर मुद्यावरुन चीन आणि पाकिस्तान अपयशी ठरले आहेत.

संयुक्त राष्ट्रात भारताची कोंडी करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न होता. पण त्यांना अन्य देशांचा पाठिंबा मिळाला नाही.

सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी काश्मीर मुद्यावरुन औपचारीक बैठक घेण्याची पाकिस्तानची मागणी आधीच फेटाळून लावली होती.

बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्मीरच्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा चीन आणि पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

चीनने मागणी केल्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. सुरक्षा परिषदेतील देशांसमोर चीनने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यामुळे त्या प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अन्य देशांची साथ मिळू शकली नाही.

रशियाने भारताला पाठिंबा दिला. रशियाने काश्मीरप्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचे समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली हा एकप्रकारे आमचा विजय असल्याचा दावा केला.

बैठक संपल्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सईद अकबरुद्दिन यांनी कलम ३७० हटवणे हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले.

काश्मीरमधील स्थिती सुरळीत आणि शांत व्हावी हीच आमची इच्छा आहे. काश्मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर आम्ही ठाम आहोत.

मात्र काही देश जिहादचा वापर करीत भारतात रक्तपाताला वाव देत आहेत. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दहशतवाद थांबवा, मगच आम्ही चर्चेला तयार आहोत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इम्रान आणि ट्रम्प यांची चर्चा :


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. काश्मीर प्रश्नावरून एकमेकांच्या संपर्कात राहण्यावरही या चर्चेत एकमत झाले, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी सांगितले.

सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी खान यांनी समितीच्या चार स्थायी सदस्य देशांशी चर्चा केल्याचा दावाही कुरेशी यांनी केला.


Minty Agarwal who guided Abhinandan during February 27 dogfight gets Yudh Seva Medal

बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे.

२७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते.

युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

 २७ फेब्रुवारीच्या सकाळी एकूण सात फाईटर कंट्रोलर डयुटीवर तैनात होते. मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.

 आकाशात नेमकी काय स्थिती आहे. पाकिस्तानी फायटर विमान कुठे, कुठल्या दिशेला आहेत त्याची माहिती त्या भारतीय वैमानिकांना देत होत्या. मिंटी अग्रवाल यांनीच विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना माघारी फिरण्यास सांगितले होते.

 पण पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम जॅम करण्याची यंत्रणा असल्यामुळे अभिनंदन यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचलाच नाही. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

१७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)

१८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)


Top