This year's Pulitzer Prize announced

 1. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.

 2. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

 3. ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 4. दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी 2018 मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता.


 In light of thousand years ago

 1. गेल्या आठवडय़ात विटय़ाजवळील भाळवणी येथे चालुक्य राजवटीत जैन मंदिराला दान दिल्याचा शिलालेख उजेडात आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे याच कालखंडातील धारातीर्थी पडलेल्या वीर योद्धय़ाच्या स्मरणार्थ कोरण्यात आलेला वीरगळ लेख प्रकाशात आला आहे.

 2. मिरज इतिहास संशोधन मंडळाने हे ऐतिहासिक संदर्भ शोधल्यामुळे सांगली परिसर सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत महत्त्वाचा भाग होता हे स्पष्ट होत आहे.

 3. चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर उर्फ भ्वनेकमल्ल (इ.स. 1068 ते 1076) याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील एका योद्धय़ाला वीरमरण आले होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे.

 4. जिल्ह्यतील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे.


Day special:

 1. 17 एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिमोफिलिया दिन‘ म्हणून पाळला जातो.

 2. हिंदी कवी तसेच थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य ‘संत सूरदास’ यांचा जन्म 17 एप्रिल 1478 मध्ये झाला.

 3. बेसबॉल चे जनक ‘अलेक्झांडर कार्टराईट’ यांचा जन्म 17 एप्रिल 1820 रोजी झाला होता.

 4. बॅ. मुकुंदराव जयकर सन 1950 मध्ये पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते.

 5. सन 1952 मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

 6. सन 1971 द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.


Top

Whoops, looks like something went wrong.