'eat Right India' movement

 1. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'ईट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वस्थ भारत यात्रा' चे देशात दिनांक १६ ते २७ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
 2. स्वस्थ भारत यात्रा १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात येणार आहे.
 3. या यात्रेचा 'ईट राइट इंडिया' हा मुख्य उद्देश असून 'आरोग्यदायी खा,सुरक्षित खा, पौष्टिक खा' ( ईट हेल्दी,ईट सेफ, ईट फोर्टीफाईड) या त्रिसूत्रावर आधारित आहे.
 4. 'ईट हेल्दी'या संकल्पनेमध्ये 'आज से थोडा कम'म्हणजेच आहारातील साखर, मीठ व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करणे,आरोग्यदायी अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करणे विशेष करुन अखंड कडधान्य, तृणधान्याचा वापर वाढवण्याबाबतचा कार्यक्रमाचा अंतर्भाव होतो.
 5. 'ईट सेफ' या संकल्पनेमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेवर भर देणे, खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे, भेसळ रोखण्यासाठी सोप्या अन्न भेसळ ओळखणाऱ्या पद्धतींबाबत जनजागृती करणे आदींचा अंतर्भाव होतो.
 6. 'ईट फोर्टीफाईड' या संकल्पनेत ॲनिमियामुक्त भारत हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
 7. यामध्ये फोर्टिफाईड मीठाचा वापर वाढवणे,त्यास मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच विविध शासकीय योजना व कार्यक्रमामध्ये फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.


The city of 'Allahabad' in Uttar Pradesh is now known as Prayagraj

 1. उत्तर प्रदेशात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरु असून या कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयागराज करण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत.
 2. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली, यावेळी त्यांनी अलाहाबादच्या नामकरणाची घोषणा केली.
 3. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अलाहाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी देखील यापूर्वीच सहमती दर्शवली होती.
 4. त्यानंतर शनिवारी कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, योगींच्या आजच्या घोषणेनंतर अलाहाबादचे नाव बदलण्यावरुन त्यांना विरोधही हाऊ लागला आहे.
 5. समाजवादी पक्षाने याला विरोध दर्शवला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.
 6. आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ही खेळी सुरु असल्याचा आरोप सपाने केला आहे.
 7. दरम्यान, योगींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभ मेळ्याची तयारी समाधानकारक पद्धतीने सुरु असून सरकार ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करेल. कुंभमेळ्यासाठी १ लाख २२ हजार शौचालये तयार केली जाणार आहेत.
 8. कुंभमेळ्यादरम्यान लोकांना स्वच्छ भारतचा संदेश दिला जाणार आहे.
 9. कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे नाव यापूर्वीच प्रयागराज झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अलाहाबाद जिल्ह्याचे नावही प्रयागराज होईल.


2g ethanol bio-refinery

 1. देशातील पहिली दुसर्या पिढीतील इथॅनॉल बायो-रिफायनरी
 2. ठिकाण :- बारगड (ओडिशा)
 3. 2020 पर्यंत स्थापन होणार
 4. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) द्वारा स्थापना
 5. अंदाजित खर्च :- 100 कोटी
 6. 10 ऑक्टोबर 2018 रोजी भूमिपूजन
 7. क्षमता :- वार्षिक 3 कोटी लीटर इथॅनॉल
 8. कच्चा माल :- तांदळाचा पेंढा
 9. याशिवाय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्येही बीपीसीएल बायो-रिफायनरी सुरू करणार आहे.
 10. राष्ट्रीय जैव-इंधन धोरण 2018 नुसार 2030 पर्यंत 20% इथॅनॉल पेट्रोलमध्ये मिसळणे अनिवार्य आहे.
 11. सध्या 2 ते 4% इथॅनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते.


Microsoft's co-founder Paul Allen passed away

 1. जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.
 2. त्यानंतर सोमवारी (15 ऑक्टोबर) कर्करोगाने त्यांचे निधन झाले आहे.
 3. पॉल यांच्या 'वल्कन इंक' या कंपनीने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
 4. 2009 पासून ते कर्करोगावर उपचार घेत होते.
 5. पॉल अॅलन आणि त्यांचा बालपणीचा मित्र बिल गेट्स यांनी मिळून 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीचा पाया रचला होता.
 6. 1975 मध्ये त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट'ची स्थापना केली आणि काही काळातच 'मायक्रोसॉफ्ट' ही एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी बनली.


India's ninth place with 72 medals in 'Para Asian Games 2018'

 1. दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी ‘पॅरा आशियाई खेळ 2018’ या बहू-क्रिडास्पर्धेची सांगता झाली.
 2. या संपूर्ण स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्यपदकांची कमाई केली आहे आणि तो पदकतालिकेत नवव्या स्थानी राहिला.
 3. स्पर्धेत चीनने 172 सुवर्ण, 88 रौप्य आणि 59 कांस्यपदकांसह तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे.
 4. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि इराण यांचा क्रम लागतो.
 5. पॅरा आशियाई खेळ ही शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या खेळाडूंसाठी दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान आयोजित केली जाणारी एक बहु-क्रिडा स्पर्धा आहे.
 6. ह्या स्पर्धेचे आयोजन आशियाई पॅरालंपिक समिती (APC) करते.
 7. सर्वप्रथम खेळांचे आयोजन चीनमध्ये 2010 साली केले गेले.


Top