1. दरवर्षी 16 ऑक्टोबरला जगभरात ‘जागतिक अन्न दिवस’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ‘चेंज द फ्यूचर ऑफ मायग्रेशन. इन्व्हेस्ट इन फूड सेक्युरिटी अँड रूरल डेव्हलपमेंट.’ या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे.
 2. जागतिक लोकसंख्या हळू हळू वाढत आहे आणि ती 2050 सालापर्यंत 9. 6 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढत्या संघर्षामुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे द्वितीय विश्वयुध्दीपासून अधिक लोकांना आपले घर सोडून जावे लागत आहे. परंतु उपासमार, दारिद्र्य आणि  हवामानातील बदलांशी संबंधित हवामानविषयक घटनांमध्ये झालेली वाढ ही 
 3. बर्‍याच स्थलांतरित विकसनशील देशांमध्ये पोहचले आहेत, त्यामुळे जेथे संसाधने आधीच दुर्लभ आहेत तेथे तणाव निर्माण होत आहे. परंतु बहुसंख्य, सुमारे 763   शलक्ष नाग रिक परदेशात जाण्याऐवजी आपल्या स्वतःच्या देशातच स्थलांतरित होत असतात.
 4. तीन तृतीयांश अत्यंत गरीब नागरिक शेती किंवा अन्य ग्रामीण उपक्रमांवर त्यांचे जीवनमान अवलंबून आहे. ग्रामीण लोक, विशेषत: तरुणांना राहत्या ठिकाणीच आपल्या गरजा भागविण्याची परिस्थिती निर्माण करून त्यांचे स्थलांतरण थांबवणे हा स्थलांतर आव्हानास हाताळण्यासाठी कोणत्याही योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
 5. 1945 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना ( Food and Agriculture Organization -FAO) चा स्थापना दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागली. या चित्राला पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने  16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘ अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून  16 ऑक्टोबरला 'जागतिक अन्न दिवस' साजरा करण्याचे सुरू केले गेले.


 1. आयएनएस किल्टन ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबादेखील उपस्थित होते.
 2. आयएनएस किल्टनमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे. समुद्राखालून जाणाऱ्या पाणबुड्या उद्ध्वस्त करण्याची क्षमता आयएनएस किल्टनमध्ये आहे.  कमोरटा वर्गात चार युद्धनौका आहेत. यातील किल्टन ही तिसरी युद्धनौका आहे,’ असे नौदलाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 3.  डायरेक्टोरेट ऑफ नेवल डिजाइनने किल्टनचे डिझाईन केले असून कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स ऍण्ड इंजीनियर्सकडून या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली आहे,’ असेदेखील प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
 4.  आता देश संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक स्वावलंबी होत आहे. किल्टनची निर्मिती ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत करण्यात आली आहे. देशाचे व्यापक हित लक्षात घेऊन आयएनएस किल्टनची उभारणी करण्यात आली आहे,’ असेही नौदलाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 5. कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स ऍण्ड इंजीनियर्सने किल्टनची बांधणी केली आहे.  शिवालिक श्रेणी,  कोलकाता श्रेणी,  आयएनएस कमोरटा आणि  आयएनएस कदमात यांच्यानंतरची सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौका म्हणून आयएनएस किल्टनचे नाव घेतले जाईल.
 6. आयएनएस किल्टनमध्ये घातक शस्त्रास्त्रांसह सेन्सर लावण्यात आले आहेत.  आयएनएस किल्टनच्या बांधणीत फायबरचा वापर करण्यात आला आहे. याआधी कोणत्याही भारतीय युद्धनौकेच्या उभारणीत फायबरचा वापर झालेला नाही. फायबरच्या वापरामुळे युद्धनौकेचे वजन कमी होते. याशिवाय युद्धनौकेची देखभाल करणेदेखील सोपे जाते.


 1. एकाचवेळी एक हजार विद्यार्थ्यांचा जीवशास्त्राचा वर्ग घेण्याचा ‘गिनीज बुक’ विक्रम येथील अण्णा विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान मंत्रालय व विज्ञान भारती या दोन संस्थांनी नोंदवला.
 2. गेल्यावर्षी अशाच प्रकारचा विक्रम रसायनशास्त्राच्या पाठ वर्गासाठी नोंदवला गेला होता. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. विज्ञान भारतीचे सरचिटणीस जयकुमार यांनी सांगितले की, जीवशास्त्राचा हा सर्वात मोठा पाठय़क्रम येथे यशस्वी करण्यात आला.
 3. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यात मुलांची संख्या, अध्यापनाची अचूकता, प्रयोग, वेळ या सर्व बाबींचे मूल्यमापन केले जाते. गिनीज बुक विक्रमाचा हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व विज्ञान भारतीचे जयकुमार यांना विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनाही सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात आली. चेन्नईतील वीस शाळांचे १०४ ९ विद्यार्थी यात सहभागी होते.
 4. चेन्नईच्या श्री शंकरी सीनियर सेकंडरी स्कूलच्या शिक्षिका एम. लक्ष्मी यांनी पेशी ते डीएनए वेगळा करणे (सेल टू डीएनए स्पूिलग) या विषयावर सुमारे दीड तास मुलांना रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देत विषय सोपा करून सांगितला. विद्यार्थ्यांनी यावेळेस अनेक शंका विचारल्या. त्याला श्रीमती लक्ष्मी यांनी उत्तरे दिली.


 1. दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे. दोन न्युट्रॉन ता-यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
 2. या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे.  या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांचेही महत्वपुर्ण योगदान आहे.
 3. दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ  13 कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे. 
 4. यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून  खुप दुर अंतरावर होत्या. ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे.
 5.  ता-यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला.  या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे. 
 6. यामुळे  दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.