nadela-madraid

  1. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह राफेल नदालने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आगेकूच केली आहे. अंतिम फेरीत त्याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिइमवर ७-६ (१०-८), ६-४ अशी मात केली.
  2. या स्पर्धेचे नदालचे हे पाचवे जेतेपद आहे. मास्टर्स १००० स्पर्धाचे नदालचे हे ३०वे जेतेपद आहे. यंदाच्या वर्षांत  क्ले कोर्टवरील १५ पैकी १५ लढतीत नदालने विजय मिळवला आहे.
  3. इंग्लंडच्या अँडी मरेने जागतिक टेनिस क्रमवारीतील पुरुष गटात अव्वल स्थान राखले आहे. नुकतीच माद्रिद ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या रॅफेल नदालने चौथे स्थान मिळविले आहे.
  4. महिलांच्या विभागात जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सेरेना विल्यम्सला मागे टाकून अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.


PAI

भारत सरकारने वर्ष 2017 साठी सर्वाजनिक कामाकाज सुचंकाक प्रसिद्ध केला आहे.हा सुचंकाक राज्यातील प्रशासनाची स्थिती दर्शविते.

पब्लिक अफेयर्स सेंटर(PAC), बंगळूरु या वैचारिक संस्थेने याबाबतीत सर्वेक्षण केले.

PAC च्या हा सर्वेक्षण 10 संकल्पना, 26 लाक्ष्यित विषय,८६ निर्देषक यांवार आधाराला आहे.

ठळक मुद्दे:

PAI 2017 मध्ये पहिल्या पाच स्थानी:

1) केरळ

2) तामीळनाडू

3) गुजरात

4) कर्नाटक

5) महाराष्ट्र

तर शेवटी बिहार(18) ठरले आहे.

 

महत्वपूर्ण पायाभूत सुविधा मध्ये पंजाब प्रथमस्थानी,

2) तामिळनाडू 3) आंध्रप्रदेश ४) गुजरात.

 

मानव विकास वर्ग:

1) केरळ 2) महाराष्ट्र 3) पंजाब

तर शेवटी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम हि राज्ये आहेत.

 

सामाजिक सुरक्षा धोरण अंमलबजावणी:

1) केरळ 2)आसाम 3)मध्यप्रदेश

तर शेवटी तेलंगणा,हरयाणा,पंजाब आहेत.

 

स्त्री आणि मुले:

1) केरळ 2) ओडिशा 3) कर्नाटक

तर शेवटी झारखंड, हरयाणा, महाराष्ट्र आहेत.

 

वित्तीय व्यवस्थापन: प्रथम तेलंगणा तर शेवटी आंध्रप्रदेश आहे.

 

आर्थिक स्वंतत्र वर्ग: प्रथम स्थानी गुजरात तर शेवटी बिहार राज्य आहे.


OPERATION CLEAN MONEY

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत 16 मे 2017 रोजी अधिकृतपणे “ऑपरेशन क्लीन मनी” म्हणजेच www.cleanmoney.gov.in या संकेतस्थळाचे अनावरण केले आहे.

आयकर विभागाने 31 जानेवारी 2017 पासून ”ऑपरेशन क्लीन मनी” उपक्रम सुरु केला आहे.हा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये चालविला जाणार आहे.

उपक्रमाचा पहिला टप्पा:

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 18 लाख व्यक्तींची ओळख करण्यात आली आहे,ज्यांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आढळून येत नाही आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

पडताळणी प्रक्रिया आणि इतर मुद्यांसंबधित विस्तृत मार्गदर्शन, FAQs, मार्गदर्शिका,त्वरित संदर्भ मार्गदर्शिका आणि पप्रशिक्षण टूलकीट यांची एकाच जागी विस्तृत माहिती प्रदान करणे.

कर भरण्यास प्रवृत्त समाजाची निर्मिती करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे.येथे करदात्यांचे अनुभव आणि अभिप्राय प्रदान करण्यास नागरिक सक्षम असतील.

स्थितीचा अहवाल आणि विषयानिहाय विश्लेषण अहवाल सामायिक करून पारदर्शी कर प्रशासनास सक्षम करणे.

आयकर विभागाकडे माहितीचे विश्लेषण करणारी दोन विशेष संस्था कार्यरत आहे आणि एक व्यावसायिक प्रक्रिया व्यवस्थापन संस्था आहे आणि जी मोठ्या प्रमाणावर रोख भरणाची माहिती,करदात्यांची अनुपालन स्थिती आणि अहवाल यांचे विश्लेषण करण्यासाठी विभागाला सक्षम करते.

उपक्रमाचा दुसरा टप्पा:

उच्च जोखमीची प्रकरणे योग्य अंमलबजावणीद्वारे (सत्यापन,शोध,सर्वेक्षण,छाननी) हाताळली जातील.

ओळखलेल्या समस्येसह प्रकरणामध्ये लाक्ष्यित मोहीम सुरु केली जाईल.

लाक्ष्यित मोहिमेच्या मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत:

डिजिटल(ई-मेल, SMS आदी) वाहिन्याच्या माध्यमातून विशिष्ट्य समस्येचे संप्रेषण करणे.

पारदर्शकता आणण्यासाठी विस्तृत स्पष्टीकरण प्रदान करणे.

विशिष्ट विभांगासाठी तपासणीमधून आढळलेले परिणाम सामायिक करणे.

अंमलबजावणी कारवाईसाठी अपुऱ्या प्रतिसाद प्रकरणी केंद्रीय देखरेख व क्रमिक वाढ कायम ठेवणे.


Top

Whoops, looks like something went wrong.