current affairs, loksatta chalu ghadamodi

1. इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.

2. ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो.

3. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.

4.याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी ४५० अर्ज आले होते. ही संख्या आता ६५० वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. 

2. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. अ‍ॅमेझॉन इंडियाने विद्यार्थी, गृहिणी आणि निवृत्त व्यावसायिकांना अर्ध-वेळ रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

2. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे  शिखर हंगामात (पीक सिझन) वितरण गतिमान राहण्यास मदत होईल आणि उबेरप्रमाणे लवचिक रोजगारांची निर्मितीही करता येईल.

3. गतिमान आणि विश्वसनीय वितरण हा ई-कॉमर्स व्यवसायाचा आत्मा आहे. . अ‍ॅमेझॉनच्या ‘प्राईम आॅफर्स’मध्ये दुसऱ्या दिवशी वस्तू ग्राहकाच्या घरी पोहोचते. ठराविक वस्तूंवर ही योजना लागू आहे. ‘प्राईम नाऊ’मध्ये दोन तासांत पोहोच दिली जाते. किराणा सामान पोहोचविण्यासाठी प्राईम नाऊचा प्रामुख्याने वापर होतो. 


Top