New Five-Year Action Plan of the Government of India addressing this problem of drug addiction

  1. देशामध्ये अमली पदार्थ व औषधांचा गैरवापर या समस्येला संबोधित करणार्‍या भारत सरकारच्या नव्या पंचवार्षिक कृती योजनेचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  2. ‘अमली पदार्थांच्या मागणीत घट विषयक राष्ट्रीय कृती योजना 2018-23’ (National Action Plan for Drug Demand Reduction -NAPDDR) या नावाने ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने आखली आहे.
  3. मंत्रालयाने ‘अमली पदार्थांच्या मागणीत घट’ विषयक राष्ट्रीय धोरणाचा मसुदा रद्द केल्यानंतर हा पुढाकार घेतला गेला आहे. जवळपास साडेपाच वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या आणि कालांतराने दोनदा पुनर्रचना केल्यानंतर अंतिम मसुदा तयार केला गेला.
  4. ठळक बाबी:-
    1. केंद्र, राज्य आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे सेवा प्रदात्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता-बांधणी करण्यासोबतच प्रसार माध्यमांमधून व्यसनमुक्तीच्या संदर्भात जनजागृती करणे, निवारक शिक्षण, सल्ला देणे, उपचार आणि पुनर्वसन अश्या घटकांवर ही योजना केंद्रीत आहे.
    2. एक राष्ट्रीय टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यरत करणे.
    3. मुख्याध्यापक, कुलगुरू आणि शैक्षणिक संस्थांचे संचालक यांच्याकरवी संस्थेच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत नाही याची खात्री बाळगणे.


Organizing the Ninth 'International Micro Irrigation Council' in Aurangabad

  1. दि. 16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019’ (International Micro Irrigation Conference -9IMIC) भरविण्याचे ठरविण्यात आले आहे.
  2. या परिषदेत चर्चेचा विषय 'आधुनिक शेतीमधील सूक्ष्म सिंचन' (Micro Irrigation in Modern Agriculture) हा आहे.
  3. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत.
  4. आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (ICID), भारत राष्ट्रीय भुपृष्ठावरील जल समिती (INCSW) आणि WAPCOS लिमिटेड यांच्या सहयोगाने भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  5. आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (International Commission on Irrigation and Drainage -ICID):- 
    1. ही सिंचन आणि नाला या विषयक सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक आंतरराष्ट्रीय ना-नफा, अशासकीय संस्था आहे.
    2. हे जगभरातील तज्ञांचे एक व्यवसायिक जाळे आहे, जे ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सल्ला व तांत्रिक मदत देते.
    3. याचे नवी दिल्ली (भारत) येथे मुख्यालय आहे.


The government will set up an oil refinery at Gwadar Port in Saudi Arabia

  1. सौदी अरब या आखाती देशाने पाकिस्तान या आशियाई देशातल्या ग्वादर बंदरावर USD 10 अब्ज खर्चून एक तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची एक योजना तयार केली आहे.
  2. पाकिस्तानात चीनच्या मदतीने हिंद महासागर बंदर (Indian Ocean port) उभारण्यात येत आहे.
  3. या ठिकाणी एक कार्यक्रमात यासंबंधी घोषणा करण्यात आली.
  4. तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पाकिस्तानाची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मदत म्हणून सौदी अरब देशात गुंतवणूक करीत आहे.
  5. शिवाय चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (China Pakistan Economic Corridor -CPEC) या प्रकल्पामधून चीनने पाकिस्तानाला USD 60 अब्ज एवढी आर्थिक मदत देण्याचे वचन दिले आहे. त्यामधूनच हिंद महासागर बंदर उभारण्यात आले आहे.
  6. पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे.
  7. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत.
  8. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
  9. हा देश इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचा (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना/OIC) जनक राष्ट्र आहे.
  10. सौदी अरब हा एक आखाती देश आहे, ज्याने अरब खंडाचा 80% भाग व्यापलेला आहे.
  11. हा जगातला सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे.
  12. रियाध ही देशाची राजधानी आहे आणि सौदी रियाल हे चलन आहे.


Top