GSAT-11 launch of the country's largest satellite, Revolution in Internet Speed

 1. अखेर तो क्षण आलाच जेव्हा देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्यात आलं.
 2. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं.
 3. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचं सांगितलं जात आहे.
 4. याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 5. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवलं होतं. Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
 6. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
 7. यानंतर GSAT-11 चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 8. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
 9. हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचं काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल.
 10. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.


Ratan Lal's Glinka Global Soil Award 2018

 1. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रतन लाल यांनी ग्लिंका जागतिक मृदा पुरस्कार 2018 (वर्ल्ड सॉईल अवॉर्ड) जिंकला.
 2. शाश्वत माती व्यवस्थापनातील उत्कृष्ट योगदानांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 3. रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टंटिन डी. ग्लिंका यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कृषी क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 4. रतन लाल-
  1. प्रोफेसर रतन लाल यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये झाला होता, त्यांचे कुटुंब 1948 मध्ये भारतात आले.
  2. त्यांनी 1968 मध्ये अमेरिकेत मृदा क्षेत्रातील डॉक्टरेटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.


global climate risk index 2019

 1. स्वतंत्र विकास संस्था जर्मनवॉचने हवामानविषयक जोखीम निर्देशांक 2019 (Global Climate Risk Index 2019) प्रसिद्ध केला आहे.
 2. 1998 ते 2017 दरम्यानच्या 20 वर्षांच्या तीव्र हवामानासंबंधीच्या घटनांच्या आधारे या निर्देशांकात भारताला 14वे स्थान प्राप्त झाले आहे.
 3. हा निर्देशांक तीव्र हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या घटनांमुळे (पूर, चक्रीवादळ, उष्माघात इत्यादी) देशांवर होणाऱ्या प्रमाणात्मक परिणामांचे विश्लेषण करतो.
 4. हा निर्देशांक तयार करताना 1998 ते 2017 या 20 वर्षांच्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. 
 5. या क्रमवारीत भारत शेजारील 4 राष्ट्रांच्या तुलनेत चांगल्या स्थानी आहे.
 6. या क्रमवारीत म्यानमार तिसऱ्या, बांगलादेश सातव्या, पाकिस्तान 8व्या व नेपाळ 11व्या स्थानी आहे.


First organized the International Conference on 'Sustainable Water Management' at Mohali

 1. 'सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट' वरील प्रथम आंतरराष्ट्रीय परिषद 10 डिसेंबर 2018 
 2. ठिकाण :मोहाली (पंजाब) मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (ISB) येथे सुरू झाली.
 3. आयोजक :केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाच्या अंतर्गत भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) ने परिषदेचे आयोजन केले आहे. 
 4.  हे 11 डिसेंबरपर्यंत दोन दिवस आयोजित केले जाईल.
 5. या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय  : 'Sustainable Water Management' हा आहे.
 6. जलस्रोतांचे एकत्रित आणि टिकाऊ विकास आणि व्यवस्थापन याला प्रोत्साहन देणारी ही थीम आहे.
 7. परिषदेचा मुख्य उद्देश :
  1. जल व्यवस्थापनसाठी टिकाऊ धोरणे,
  2. जलविषयक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करणे,
  3. त्यांच्यासाठी उच्च पातळीवर वचनबद्धतेस उत्तेजन देण्यासाठी,
  4. शासकीय, वैज्ञानिक आणि शैक्षणिक समुदायांसह विविध हितधारकांमध्ये सहभाग आणि संवाद वाढविणे आहे.


'Late Smita Patil Smriti Award 2018' declared to Mukta Barve

 1. स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे. 
 2. मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर झाला आहे.
 3. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
 4. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.
 5.  शनिवार, दिनांक १५ डिसेंबर २०१८ला  दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 6. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 7. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटीलयांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.
 8. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल.
 9. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत.
 10. याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे असणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.
 11.  स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
 12. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
 13. पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ हा जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आला होता.
 14.  रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे.
 15. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.


Top