1. 14 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF)’ चे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
 2. वाणिज्य मंत्रालयांतर्गत भारत व्यापार जाहिरात संघटना (ITPO) या संस्थेकडून 1980 सालापासून या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
 3. व्हिएतनाम हा या मेळाव्याचा भागीदार देश आहे आणि किरगिझस्तान हा लक्ष केंद्रित देश आहे.
 4. जगातल्या विविध देशांमधून 225 हून अधिक कंपन्यांनी तसेच देशातल्या राज्यांमधील स्थानिक उद्योगांनी या मेळाव्यात सहभाग घेतला आहे.


 1. 2014 साली सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)’ अंतर्गत आतापर्यंत बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांच्या संख्येत, सर्वाधिक खाती उत्तरप्रदेशात उघडण्यात आली आहे.
 2. देशात उघडलेल्या एकूण पाच कोटीहून अधिक नवीन PMJDY खात्यांच्या संख्येच्या एक पंचमांश वाटा केवळ उत्तरप्रदेशचा आहे. PMJDY खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या एकूण ठेवींचा सहावा भाग तर एकट्या उत्तरप्रदेशाचा आहे.
 3. त्यानंतर यामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यांमध्ये एकत्रितपणे 3400 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्या.
 4. बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल यांनी एका वर्षात एकत्रितपणे आणखी 2.2 कोटी नवीन खाती उघडलीत. तर आसाम, गुजरात, झारखंड आणि कर्नाटक मध्ये एका वर्षात 1 कोटीहून अधिक नवीन खाती उघडलीत.
 5. 26 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)’ ची घोषणा केली होती.


 1. महिला व बाल विकास मंत्रालय 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2017 या काळात बाल अधिकार सप्ताह - हौसला 2017 – पाळणार आहे.
 2. देशात 14 नोव्हेंबरला ‘बाल दिवस’ साजरा केला जातो आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिवस 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो.
 3. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय बालगृह संस्थांमध्ये राहणार्‍या मुलांसाठी आंतर बाल निगा संस्था (CCI) महोत्सवाचे आयोजन करीत आहे.
 4. ‘हौसला 2017’ महोत्सवात देशातल्या विविध बालगृहांच्या मुलांच्या प्रतिभा पाहायला मिळणार. शिवाय मुलांकडून विविध कार्यक्रमे, जसे की बाल संसद, चित्रकला स्पर्धा, अॅथलेटिक मीट, फुटबॉल, बुद्धिबळ स्पर्धा आणि भाषण लेखन, यांमध्ये भाग घेतला जाणार आहे.


 1. 12 नोव्हेंबर 2017 रोजी आकाशवाणी/प्रसारभारती कडून ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ साजरा केला गेला. प्रसारभारतीचा हा 20 वा वर्धापन दिवस आहे.
 2. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला 12 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा भेट दिली होती. त्यामुळे त्या दिवसापासून 12 नोव्हेंबर हा ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
 3. या दिवसाचे औचित्य साधून आकाशवाणीकडून (ऑल इंडिया रेडिओ) वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
 4. तसेच या दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा कली जाते, ते म्हणजे - सर्वात्तम सार्वजनिक प्रसारण सेवा करणारे आकाशवाणी केंद्र आणि गांधीवादी विचारांचा प्रचार करणारे आकाशवाणी केंद्र.
 5. 12 नोव्हेंबर 2012 रोजी केंद्र सरकराने यासंबंधित औपचारिक घोषणा केली आणि भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले.
 6. आकाशवाणी लवकरच ‘अॅमेझॉन इको डॉट’ वर त्यांची सेवा उपलब्ध करणार आहे. तसेच आकाशवाणी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ पुरवण्यासाठी काम करीत आहे, जे देशभरातील कोणत्याही भागाला विनाव्यत्यय प्रसारण सेवा प्रदान करेल.


Top

Whoops, looks like something went wrong.