FAO's new guides for the United Nations to benefit from the future income of forests

 1. वनांच्या शाश्वत वापरासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनाने (FAO) "मेकिंग फॉरेस्ट कंसेशन्स इन द ट्रोपीक्स वर्क टू अचिव्ह द 2030 अजेंडा” या शीर्षकाखाली काही स्वैच्छिक मार्गदर्शके प्रसिद्ध केलेली आहेत.
 2. यामागील उद्देश अश्या संपत्तींना "जगातल्या सर्वात दरिद्री समुदायांसाठी अधिक पारदर्शी, जबाबदार आणि लाभदायक बनवणे", हा आहे.
 3. मार्गदर्शकांमधून काय साध्य केले जाऊ शकते?
  1. ही मार्गदर्शके त्या तथाकथित वन सवलती कायदे आणि धोरणांचा उल्लेख करीत आहे, जे स्थानिक समुदायांना आणि खासगी व्यक्तींना किंवा व्यवसायांना देयक किंवा सेवांच्या बदल्यात वन जमीनीचा वापर करण्याची परवानगी देतात.
  2. यामुळे उष्णकटिबंधीय क्षेत्रातल्या देशांचे खराब व्यवस्थापन; भ्रष्टाचार आणि लाचलुचपत; वादविवाद आणि स्थानिक समुदायांच्या छळामुळे वन जमिनीचा होणारा गैरवापर रोखता येईल.
  3. जर ते व्यवस्थितपणे हाताळले गेले तर वन संपत्ती अनेक सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे प्रदान करू शकतील आणि वर्तमान व भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत वनांची किंमत वाढू शकते.
  4. स्थानिक समुदायांमध्ये रोजगाराच्या संधि आणि सेवांना वाढविण्याच्या सोबतच, हे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करणे आणि हवामान बदलाच्या समस्येशी सामना करता येऊ शकणार.
  5. योग्य वन संपत्ती स्थानिक आणि राष्ट्रीय महसुलामध्ये देखील समाविष्ट केली जाते, ज्यांची बदल्यात विकास, आरोग्य आणि सेवांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.


 Union Cabinet reshuffle

 1. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.
 2. ते पुढीलप्रमाणे आहेत -
 3. वैद्यकीय कारणांमुळे अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या पदांचा कार्यभार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे.
 4. जेटली शारीरिकदृष्ट्या सक्षम होतपर्यंत केंद्रीय वित्तमंत्री तसेच कॉर्पोरेट कल्याण मंत्री पदांचा अतिरिक्त प्रभार गोयल यांना दिला गेला आहे.
 5. एस. एस. अहलुवालिया यांच्याकडील पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री पदाचा कार्यभार काढून घेत त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे.
 6. अल्फोन्स कन्ननथानम यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
 7. स्मृती इराणी यांच्याकडील माहिती व प्रसारण राज्यमंत्री पद काढण्यात आले आहे.
 8. आता त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रीपद आहे.
 9. क्रिडा मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांच्याकडे माहिती प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पद देण्यात आले आहे.


Top