1. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा  बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे.
  2. तसेच  विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), यश रूईकर (पुरूषोत्तम करंडक विजेते), चंद्रशेखर देशपांडे (ऑर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर (अभिनेत्री व गायिका) आणि  दत्तात्रय शिंदे (सेटिंग) यांना बालगंधर्व विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
  3. बालगंधर्व पुरस्काराची निवड करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यामध्ये या पुरस्कारांची निवड करण्यात आली. या निवड समितीत अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांचा समावेश होता.


  1. सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि पद्मविभूषण पी एन भगवती यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. २००७ मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये पी एन भगवती यांचा समावेश होता. प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते.
  2. जनहित याचिकांसाठी ते नेहमीच चर्चेत असायचे. भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते.भगवती यांनी गुजरात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले होते. यानंतर १९७३ मध्ये ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून आले.
  3. १२ जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या कालावधीत ते सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


Top