Done in the fourth 'ASEAN-India Ministerial Meeting on Agriculture and Forestry

 1. 12 जानेवारी 2018 रोजी ASEAN देशांचे आणि भारत सरकारचे कृषी मंत्र्यांनी नवी दिल्लीत एकत्र जमून कृषी व वनीकरण विषयावर चौथी ‘ASEAN-भारत मंत्रिस्तरीय बैठक’ संपन्न झाली.
 2. पशुपालन व मत्स्यपालन सोबतच खाद्य, कृषी या क्षेत्रांमध्ये ASEAN देशा आणि भारताचे सहयोग अधिक व्यापक करणे तसेच 2015 सालच्या नंतर शाश्वत विकास लक्ष्य आणि संयुक्त राष्ट्रसंघ शून्य भूखमरी आव्हानांना संबोधित करणारे लक्ष्य अर्जित करण्यात योगदान देण्याच्या दिशेने सहकार्य चालविणे, हा या बैठकीचा उद्देश्य होता.
 3. बैठकीमध्ये सहमती असलेले मुद्दे:-
  1. भारत आणि ASEAN राष्ट्रांनी एकत्रितपणे हवामान बदलांच्या आव्हानांचे उपशमन करण्यासाठी, कृषी-वनीकरणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, कृषी यंत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि हेटरोटीक तांदूळाचे संकरित प्रकार विकसित करण्यासाठी एकत्र कार्य करण्यास मान्य केले गेले.
  2. ASEAN आणि भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्ष 2018 दरम्यान अधिक क्षमता निर्माण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसोबतच अन्नसुरक्षा आणि किंमत अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्याच्या संयुक्त प्रयत्न करण्यास आवाहन केले गेले.
  3. भारत आणि ASEAN देशांनी त्यांच्या संयुक्त घोषणापत्रात तीन प्रमुख क्षेत्रांत संयुक्त प्रकल्पांना प्राधान्य देण्यास सहमती दिली.
  4. आजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी कृषी-वनीकरण हस्तक्षेप करणे.
  5. शेतीची अंमलबजावणी आणि यंत्रणेसंबंधी प्रात्यक्षिक व देवाणघेवाण करणे.
  6. मूळ वाणाच्या ओळींची आनुवांशिक सुधारणा आणि हेटेरोटीक तांदूळाच्या संकरित विकासावर लक्ष केंद्रित करणे.
  7. माहिती सामायिक करण्यामधून अधिक कार्यक्षम शेतीपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्ये शिकण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी ASEAN आणि भारतातील शेतकरी आणि मच्छिमारांना संधी प्रदान करण्याच्या हेतूने तिसरी आदानप्रदान भेट आयोजित करण्यास मान्य केले गेले.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. ASEAN-भारत भागीदारीचा आढावा:-
  1. ASEAN-भारत कृतीयोजना (POA) 2011-15 च्या क्रियान्वयनामध्ये केल्या गेलेल्या प्रगतीवर संतुष्टी मानण्यात आली.
  2. "क्षमता निर्माण, तंत्रज्ञान हस्तांतरण व कृषी क्षेत्रांमध्ये वैश्विक क्षमतेसाठी परस्पर रूपात सहमत विकास व संशोधन” यावरील कृतीयोजनेंतर्गत सन 2013-15 या काळात कृषीक्षेत्रात विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित उपयोगिता (ई-विस्तार), राष्ट्रीय बियाणे गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, फळे व भाज्या यांसाठी जैविक प्रमाणन आणि सीमापार पशुरोगांच्या निदानासाठी पारंपरिक व आण्विक तंत्रज्ञानांचे कार्यान्वयन या क्षमता निर्माणासंदर्भात चार कार्ये केली गेली.
  3. प्रजनन जैव-तंत्रज्ञानाचा उपयोग करत म्हशीच्या प्रजननासंबंधी प्रशिक्षण आयोजित केले गेले.
  4. सन 2016-2020 या कालावधीसाठी अन्न, कृषी आणि वनीकरणामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी एक व्यापक ASEAN-भारत कृतीयोजना आधीच सुरू आहे.
 2. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN):-
  1. हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.
  2. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.


India's decline in child mortality rate of under-five by 9% - Health Ministry

 1. भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या SRS बुलेटिन (2016) मधील महितीनुसार, देशातले पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे. 
 2. 2030 सालापर्यंत पाच वर्षांखालील बालमृत्यूची संख्या 25 पर्यंत आणण्याचे लक्ष्य भारताने ठेवलेले आहे.
 3. देशातील सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीच्या उद्देश प्राप्तीसाठी चालवलेल्या मिशन इंद्रधनुष व तीव्रतेने मिशन इंद्रधनुष यांसारख्या उपक्रमांचे परिणाम दिसून येत आहे.
 4. हे यश केवळ एक वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रमाण आहे.
 5. भारत सरकारकडून चालविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांमध्ये सेवा वितरण सुदृढीकरण, गुणवत्तेची हमी, RMNCH+A हस्तक्षेप, मनुष्यबळ आणि समुदाय प्रक्रिया बळकटीकरण, माहिती आणि ज्ञान, औषधे आणि रोगनिदान, पुरवठा शृंखला व्यवस्थापन आदींचा समावेश आहे.
SRS बुलेटिनमधील मुख्य बाबी:-
 1. ठळक बाबी:-
 2. भारतात पाच वर्षांखालील बालमृत्यूच्या प्रमाणात (U5MR) 9% ची घट झाली आहे. म्हणजेच, वर्ष 2015 मध्ये हे प्रमाण 1000 जन्मांमध्ये 43 होता तर वर्ष 2016 मध्ये हा आकडा 39 वर होता. गेल्या वर्षात हा दर घटण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढलेला आहे.
 3. बाळाच्या जीवनासंदर्भात लिंगबाबतीतली तफावत कमी होत आहे. नवजाताचा मृत्युदर 1 ने कमी होत जन्मलेल्या दर 1000 मध्ये 24 एवढा आहे.
 4. मुलगा-मुलगी पाच वर्षांखालील बाल मृत्यूदरामधील लिंगबाबतीतली तफावत कमी होऊन 11% आहे, जी 2014 साली 17% इतकी होती.
 5. मुलामधील पाच वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण जन्मलेल्या दर 1000 मध्ये 37 एवढे आहे, तर मुलीमध्ये हे प्रमाण 41 एवढे आहे. 
 6. तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब आणि दिल्ली या प्रदेशांमध्ये मुलींचे मृत्युदर 5% पेक्षा कमी आहे. बिहारमध्ये (46%) मुलींचे जिवंत राहण्याच्या प्रमाणातली लिंगबाबतची तफावत सर्वात जास्त आहे. त्याखालोखाल हरियाणा (23%), केरळ (20%), आसाम, कर्नाटक (19%) आणि राजस्थान (17%) यांचा क्रम आहे.
 7. वर्ष 2015 च्या तुलनेत देशात प्रथमच पाच वर्षांखालील बाल मृत्यू संख्या ही 1 दशलक्षांवरून खाली आली आहे, जी वर्ष 2016 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी जवळपास 120000 इतकी होती.
 8. बहुतांश राज्यांनी कमी पाच वर्षांखालील बाल मृत्यूदर दर्शविण्यात चांगली प्रगती साधली आहे. मात्र मागील वर्षी छत्तीसगड , दिल्ली आणि उत्तराखंड येथे हे प्रमाण थोडक्यात वाढले आणि तेलंगणामध्ये या बाबतीत 2016 साली कोणताही बदल दिसून आला नाही.


Setting up committee of the Election Commission to suggest changes in the Representation of People Act

 1. लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 126 मध्ये बदल सुचविण्यासाठी निवडणूक आयोगाने एक 14 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
 2. निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि ते तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करतील.
 3. लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 126 अन्वये, प्रसार माध्यमांचा व्यापक विस्तार लक्षात घेता, मतदानासाठी उरलेल्या शेवटच्या 48 तासांत मतदान मोहिमेवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
 4. समिती "शांतता काळात" वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमांमुळे होणार्‍या प्रभावाचा अभ्यास करणार आणि कलम 126 बाबतीत त्यांचे मत देणार आणि त्यानुसार आदर्श आचारसंहिता (MCC) यामध्ये बदलांची शिफारस करणार आहे.
 5. बहू-टप्प्यात होणार्‍या निवडणुकीत प्रतिबंधित 48 तासांच्या काळात प्रसार माध्यमांच्या व्यासपीठांच्या नियमनामध्ये येणाऱ्या अडचणींचे अन्वेषण करणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था आहे.
 3. ECI ची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी केली गेली. आयोगात वर्तमानात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात.
 4. ECI ची संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
 5. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
 6. पूर्वी आयोगाचे एक सदस्य असलेले मंडळ होते, परंतु 1989 सालानंतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त पद निर्माण करण्यात आले.


The country will be organizing 'Competitive-2018' festival

 1. महिनाभर चालणाऱ्या ‘सक्षम–2018’ या उपक्रमांचा 16 जानेवारी 2018 ला दिल्लीत शुभारंभ होणार आहे.
 2. या मोहिमेअंतर्गंत समाजाच्या विविध स्तरांवरील व्यक्तींशी इंधन बचतीबाबत चर्चा करणे, जागरुकता निर्माण करणे आदींचा समावेश आहे.
 3. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) हा केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक  वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या (PCRA) वतीने राबवण्यात येणारा वार्षिक उपक्रम आहे. 
 4. राज्य शासनासारख्या अन्य भागधारकांसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू कंपन्यांच्या सक्रीय सहभागातून सर्वसामान्यांमध्ये इंधनाच्या बचतीबाबत  तसेच पेट्रोलियम पदार्थांचे जतन या संदर्भात जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (Petroleum Conservation Research Association -PCRA) ही 1978 साली स्थापित भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली एक संस्था आहे.
 2. जी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यामध्ये गुंतलेली आहे.
 3. हे सरकारला तेल आणि त्यावर भारताच्या अवलंबित्वाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने धोरणे आणि धोरणांचा प्रस्ताव मांडण्यास मदत करते.
 4. तेल वापरण्याच्या पर्यावरणीय प्रभावाला कमी करण्यासाठी कार्य करते आणि जीवाश्म इंधनाचे संरक्षण देखील करते.


Scientist appointed as Chairman of Sivan Istro

 1. प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
 2. ते ए एस किरण कुमार यांची जागा घेतील. २ जानेवारी २०१५ रोजी कुमार यांची इस्त्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती.
 3. सिवन यांनी १९८०मध्ये मद्रास इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती.
 4. त्यानंतर १९८२साली त्यांनी बंगळुरूमधील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनियरिंगमधून पदव्युत्तर पदवी मिळवली होती.
 5. २००६साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून त्यांनी एअरोस्पेर इंजिनियरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली होती.
 6. सिवन यांनी १९८२साली इस्रोमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पावर काम केलेले आहे.
 7. तसेच त्यांनी एंड टू एंड मिशन प्लानिंग, मिशन डिझाइन, मिशन इंटिग्रेशन आणि अॅनॅलिसिस यामध्ये विपूल योगदान दिले आहे.
 8. सिवन हे सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


Top