Launch of "Dastak" campaign to eradicate Japanese encephalitis in Uttar Pradesh

 1. पूर्व उत्तरप्रदेशात पसरलेल्या जपानी एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि उपचारांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता 12 फेब्रुवारी 2018 रोजी ‘दस्तक’ अभियानाला सुरुवात केली गेली.
 2. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य शिक्षण अधिकार्‍यांना दोन दिवसांच्या प्रशिक्षणासोबतच अभियानामध्ये उपयोगात आणल्या जाणार्‍या ध्वनीमुद्रित चलचित्रपट, रेडियो जाहिराती, एन्सेफलायटीस संबंधी घेतल्या जाणार्‍या काळजी घेण्यासाठीचे साहित्य व स्वच्छता किट आणि अन्य माहिती प्रदान केले गेले. 
 3. जपानी एन्सेफलायटीस:-
  1. जपानी एन्सेफलायटीस या आजाराची लागण झाल्यास मेंदूला सूज येते. हा आजार ‘फ्लॅवी’ विषाणूमुळे होता.
  2. 1871 साली पहिल्यांदा जपानमध्ये आढळून आला, त्यामुळे त्याला ‘जपानी ज्वर’ असेही नाव दिले गेले आहे.
  3. हा प्रामुख्याने लहान बालकांना प्रभावित करतो. ‘फ्लॅवी’ विषाणू जंगली डुक्कर व पक्ष्यांच्या माध्यमातून पसरतो.

अभियानाच्या मुख्य बाबी

 1. हा अभियान मार्च-18 ते जून-18 तसेच जून-18 ते नोव्हेंबर-18 पर्यंत या कालावधीत चालवले जाण्याचे नियोजित आहे.
 2. प्रदेशातील पाच वर्षाखालील सर्व बालकांची रक्तचाचणी, 6 महीने ते पाच वर्ष वयोगटातील गंभीर कुपोषित बालकांची ओळख पटवणे आणि 9 महीने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना ‘अ’ जीवनसत्त्वाचे मिश्रण पाजणे अशी कार्ये चालवली जाणार आहे.
 3. सोबतच हगवण, निमोनिया आणि जन्मजात आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांची ओळख करून त्यांना निःशुल्क तपासणी उपचार आणि परिवहन सेवा दिली जाणार आहे.
 4. राज्याच्या आजाराने प्रभावित झालेल्या 38 जिल्ह्यांमध्ये दूरदर्शन, रेडियो आणि वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून जपानी एन्सेफलायटीस संबंधी माहिती व बचावाचे उपाय प्रसारित केले जाणार आहे. 
 5. आरोग्य सेवक गोरखपुर व बस्ती मंडल यांच्या सात प्रभावित जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन आजारासंबंधी उपचार व निगा राखण्यासंबंधी लोकांना सांगणार आहे.


'Port Logistics: Issues and Challenges in India' report of 'Dun & Bradstreet'

 1. ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या खाजगी संशोधन संस्थेने त्याचा 'पोर्ट लॉजिस्टिक्स: इश्यूज अँड चॅलेंजेस इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. भारतामधील दळणवळण व्यवस्थेसंदर्भात मुख्य बुमिका बजावणार्‍या बंदरांच्या पायाभूत सुविधांमध्ये येणारे अडथळे आणि त्यांचे निवारण या बाबतीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने आपले निष्कर्ष या अहवालात नोंदविलेले आहेत. या अहवालात धोरण आणि विनियमन सहित 60 हून अधिक मुद्द्यांवर शिफारसी प्रदान करण्यात आल्या आहेत.
 3. ठळक बाबी:-
  1. 13 बंदरांपैकी जवाहरलाल नेहरू फोर्ट ट्रस्ट (JNPT), कामराज, वीझाग या 3 बंदरांनी सर्वाधिक ‘उत्तम’ गुण मिळविलेली आहेत.
  2. कोचीन, कांडला, परादीप, चेन्नई, मोरमूगाव, नवा मेंगलोर आणि VOC या 7 बंदरांनी  ‘सरासरी’ गुण तर हल्दिया, कोलकाता आणि MbPT या 3 बंदरांनी ‘खराब’ गुण मिळवलेले आहेत.
  3. पश्चिम सागरी किनार्‍याच्या तुलनेत पूर्व सागरी किनार्‍यावर सरासरी बंदरांमधील गुंतवणूक खर्च थोडा अधिक होता.
  4. सर्व बंदरांमध्ये एकसमान समस्या आहेत. अडथळ्यांमध्ये पाच बाबींना रेखांकीत करण्यात आले आहे. ते आहेत –  दाटीकरण, सीमाशुल्क मंजूरी, शिपिंग लाइन संबंधी मुद्दे आणि बदल, कागदपत्रे आणि कागदी प्रक्रिया आणि नियामक मंजूरी.
 4. अहवालातील तीन महत्वाचे निष्कर्ष:-
  1. बंदरांमध्ये चालविल्या जाणार्‍या प्रक्रिया आणि कार्य मानकीकृत किंवा एकसमान नाहीत,
  2. महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी लागणारा खर्च आणि वेळ अनपेक्षित आहे तसेच बंदरांमध्ये आढळणारी भिन्नता ही स्वीकारण्याजोगी नाही,
  3. कार्य पूर्ण होण्याकरता अनेक शासकीय पुढाकार घेणे आवश्यक आहेत.
'इश्यूज अँड चॅलेंजेस इन इंडिया' अहवाल
 1. पार्श्वभूमी:-
  1. जागतिक निर्यातीमध्ये 5% चे भारतीय लक्ष्य साध्य करण्यासाठी, येणार्‍या पाच वर्षांमध्ये भारतीय निर्यातला वार्षिक 26% या दराने वाढविण्याची आवश्यकता आहे.
  2. यासाठी उत्पादनासंदर्भात स्पर्धात्मकतेत वाढ करणे आवश्यक आहे. अहवालात ‘पोर्ट परफॉर्मेंस निर्देशांक’ दिला आहे, जो विविध बंदरांच्या मानक चिन्हांकित कामगिरीत मदत करणार.
  3. अहवालात 13 बंदरांची माहिती दिली आहे, जे भारताचा 67% सागरी व्यापार नियंत्रित करतात.
  4. केलेल्या अभ्यासात बंदरांवर नियंत्रित कंटेनर आणि बल्क कार्गो एवढ्यापुरताच मर्यादित आहे आणि यामध्ये लिक्विड कार्गो सामील करण्यात आलेले नाही.


Chandrasekhar Comber nominated as president of Sahitya Akademi

 1. साहित्‍य अकादमीच्या अध्‍यक्ष पदावर चंद्रशेखर कंबार यांची निवड करण्यात आली आहे.
 2. चंद्रशेखर कंबार कन्‍नड भाषेचे कवी आणि लेखक तसेच चित्रपट दिग्दर्शक आहेत.
 3. पूर्वी ते हम्‍पीमधील कन्‍नड विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू देखील होते.
 4. शिवाय, हिंदी कवी माधव कौशिक यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.
 5. अनंथामुर्थी यांच्यावेळी झालेल्या निवडणुकीनंतर ही या पदासाठीची दुसऱ्यांदा निवडणूक होती.
 6. साहित्य अकादमी:-
  1. साहित्य अकादमी ही भारतीय साहित्याच्या विकासासाठी सक्रिय कार्य करणारी राष्ट्रीय संस्था आहे.
  2. याची स्थापना 12 मार्च 1954 रोजी भारत सरकारकडून केली गेली.
  3. उच्च साहित्यीक मानदंड स्थापित करणे आणि साहित्य क्षेत्राला पोषक वातावरण देणे या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली.
  4. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते.
  5. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. 
  6. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.


Performed 6th 'World Government Shikhar Parishad' in Dubai

 1. 11-13 फेब्रुवारी 2018 रोजी सहावी ‘जागतिक सरकार शिखर परिषद (WGS)’ दुबई (संयुक्त अरब अमीराती) मध्ये संपन्न झाली.
 2. भारत यावर्षी या कार्यक्रमाचा अतिथी देश होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले गेले होते.
 3. या परिषदेत 140 देशांमधून 4,000 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.
 4. याप्रसंगी आयोजित पुरस्कार सोहळ्यात UAE ने सर्वोत्कृष्ट मोबाईल सेवांकरिता दोन पुरस्कार पटकावले;
  1. दुबई पोलीसचे अॅप (प्रोटेक्टिंग ह्यूमन लाइफ श्रेणी)
  2. UAE ह्यूमन रिसोर्सेज अँड एमिरेटायझेशन मिनिस्ट्रीचे अॅप (अनेबलिंग बिजनेस श्रेणी).
जागतिक सरकार शिखर परिषद (WGS)
 1. पार्श्वभूमी:-
  1. जागतिक सरकार शिखर परिषद (WGS) हा विश्वव्यापी सरकारच्या भवितव्याला आकार देण्यासाठी समर्पित वैश्विक मंच आहे.
  2. येथे शासकीय प्रशासनासंबंधी वैश्विक संवाद राखण्यासाठी नेतृत्व, तंत्रज्ञान आणि अभिनव आदी मुद्द्यांवर लक्ष देण्याकरिता सरकारच्या नेत्यांना एकत्र आणते.
  3. मानवी विकासामध्ये धोरण निर्माता, विशेषज्ञ आणि नेत्यांसाठी नेतृत्व मंच आणि नेटवर्किंग केंद्राच्या रूपात हा मंच कार्य करतो.
  4. वर्ष 2013 मध्ये पहिल्यांदा ही परिषद आयोजित केली गेली होती.


For the first time in India, the 'Global theater Olympics' will be held

 1. 17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2018 या कालावधीत भारतात आठवे ‘वैश्विक रंगभूमी ऑलंपिक (Global Theatre Olympics)’ चे आयोजन केले जाणार आहे.
 2. हा कार्यक्रम ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या विषयाखाली चालणार आहे.
 3. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (NSD) वतीने करण्यात येणार आहे.
 4. यावर्षी भारतात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
 5. या कार्यक्रमात जगभरातील 30 देशांचा सहभाग असणार आहे.
 6. दिल्लीत लालकिल्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
 7. 25 हजारांहून अधिक कलाकारांचा यात सहभाग असणार आहे.
 8. याचे आयोजन दिल्ली, चेन्नई, बेंगळूरू, भोपाल, चंदीगड, कोलकाता, तिरुअनंतपुरम, पटना, आगरतळा, गुवाहाटी, जयपुर, जम्मू, अहमदाबाद आणि मुंबई याखेरीज देशाच्या आणखी 17 शहरांमध्ये होणार आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. वैश्विक रंगभूमी ऑलंपिक:-
 2. पार्श्वभूमी:-
  1. वर्ष 1995 मध्ये ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम वैश्विक रंगभूमी ऑलंपिक आयोजित करण्यात आले होते.
  2. जपान (1999),
  3. रशिया (2001),
  4. टर्की (2006),
  5. दक्षिण कोरिया (2010),
  6. चीन (2014),
  7. पोलंड (2016) मध्ये ऑलंपिकचे आयोजन केले गेले.


India's silver medal in Asian Games

 1. जकार्ता (इंडोनेशिया) मध्ये सुरू असलेल्या ‘आशियाई खेळ’ मध्ये भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने 5x5 बास्केटबॉल चाचणी प्रकारात रौप्यपदक पटकावले.
 2. भारतीय संघाचा थायलंडकडून पराभव झाला.
 3. आशियाई खेळ (Asian Games) किंवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे.
 4. या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलंपिक मंडळाकडून केले जाते.
 5. आशिया ऑलंपिक मंडळ ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक मंडळाची (IOA) एक पाल्य संस्था आहे.
 6. 1951 साली नवी दिल्ली (भारत) मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांचे आयोजन केले गेले होते. 


Top

Whoops, looks like something went wrong.