Visions of 'Jaminid' Meteorite on 13-14 December

  1. उल्कावर्षाव ‘फाएथोन (Phaethon) मधील मोठ्या उल्कामुळे होतो.
  2. किमान दहा ते बारा उल्का दरवर्षी पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात.
  3. पृथ्वीवर आजपर्यंत सुमारे 150 उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत.
  4. पृथ्वीच्या सभोवती अजूनही काही उल्का प्रदक्षिणा घालत आहेत. त्यातील काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात.
  5. उल्कावर्षावाविषयी -
    1. अवकाशात फिरणाऱ्या छोट्या-छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी संबोधले जाते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात.
    2. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात.
  6. हे पुढीलप्रमाणे -
    1. ययाती (Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्कावर्षावाला पर्सीड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 1-20 ऑगस्ट दरम्यान)
    2. सिंह राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिओनिड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 11-20 नोव्हेंबर)
    3. स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्कावर्षावाला लिरिड्ज म्हणतात. (दरवर्षी 16-26 एप्रिल)
    4. देवयानी (Andromeda) यातून होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस म्हणतात. (दरवर्षी 24-27 नोव्हेंबर)
    5. मिथुन (Gemini) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. (दरवर्षी 9-14 डिसेंबर)
    6. मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्‌ज म्हणतात. (दरवर्षी 30 मे ते 14 जून)
    7. डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणाऱ्या उल्कावर्षावाला डेल्टा ॲक्वेरिड्‌ज म्हणतात.


The Indian Navy included a rescue system for the submarine that was found in the crash

  1. खोल समुद्रात दुर्घटनेदरम्यान पाणबुड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणारी मदत आणि बचाव प्रणाली दि. 11 डिसेंबर 2018 रोजी मुंबईत नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली.
  2. नौदलात प्रथमच दोन खोल सागरी बचाव वाहने (Deep Submergence Rescue Vehicles -DSRVs) समाविष्ट करण्यात आली आहेत.
  3. या प्रणालीमुळे खोल समुद्रात पाणबुडी बचाव कार्यात नौदलाची क्षमता वाढली आहे.
  4. भारतीय नौदलाच्या या नवीन क्षमतेचे संचालन आणि तैनात करण्याचे काम नौदलाच्या पाणबुडी बचाव गटाच्या चालक दलाकडून मुंबईतून केले जाणार आहे.
  5. या सुविधेमुळे भारत अपघातात सापडलेल्या पाणबुडीतून लोकांचे जीव वाचविण्यासाठी शोध आणि बचाव कार्य चालविण्यास सक्षमता असणार्‍या नौदलांच्या श्रेणीत सामील झाले आहे.
  6. सध्या भारतीय नौदलाकडे सिंधुघोष, शिशुमार, कलवारी श्रेणीच्या पारंपरिक पाणबुड्या तसेच अणुशक्तीवर चालणार्‍या पाणबुड्या आहेत.
  7. हे वाहन जेम्स फिशर अँड सन्स कंपनीच्या स्कॉटलंड येथील JFD उप-कंपनीकडून विकसित करण्यात आले आहे.
  8. हे वाहन पाण्याखाली 650 मीटर खोलीपर्यंत पाणबुडीतून बचाव करण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी 14 लोकांना वाचवू शकते.


In the nature of the word 'disaster' Japan was chosen as the 2018 year-old icon

  1. चीनी भाषेत लिहिल्या जाणार्‍या 'आपत्ती' (disaster) या शब्दाच्या वर्णाकृतीची निवड जपानने 2018 सालचे ‘परिभाषित चिन्ह’ (defining symbol) म्हणून केले आहे.
  2. क्योटो शहरात प्राचीन कायोमिझू मंदिराच्या परिसरात जपान सरकारतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सीहान मोरी यांनी कॅलिग्राफी ब्रशने एका मोठ्या पांढर्‍या पडद्यावर हा शब्द काढला.
  3. हा कार्यक्रम जपान कांजी अॅप्टीट्यूड टेस्टिंग फाउंडेशनने आयोजित केला होता.
  4. यावर्षी जपानला भयानक पूर परिस्थिती, भूकंप, उष्णलहरी आणि वादळ अश्या नैसर्गिक धोक्यांचा सामना करावा लागला आहे.
  5. त्यामुळे यावर्षी 1,93,214 लोकांपैकी एकूण 20,858 लोकांनी "आपत्ती" हा शब्द निवडला आहे.
  6. जपानी दरवर्षी गेल्या 12 महिन्यांत घडलेल्या घटनांना प्रदर्शित करणार्‍या चिनी वर्णाकृतीमधील एका शब्दाची निवड करतात.
  7. इतर प्रकारांच्या वर्णाक्षरासह चीनी वर्ण (किंवा कांजी) जपानी भाषेत मोठ्या प्रमाणात वापरले जातात.


Jharamthanga: New Chief Minister of Mizoram

  1. मिझोरमचे राज्यपाल कुमानम राजशेखरन यांनी औपचारिकपणे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) पक्षाचे अध्यक्ष झोरमथंगा यांना राज्य सरकार बनवण्यास आमंत्रित केले आहे.
  2. विधानसभा निवडणुकीचा निकाल -
  3. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर झालेत.
  4. मिझोरम (एकूण 40 जागा)
  5. पक्ष जागा
    मिझो नॅशनल फ्रंट (MNF) 26
    भाजप 1
    काँग्रेस 5
    अन्य 8
  6. विधानसभा निवडणूक-
  7. भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
  8. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
  9. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
  10. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


K. Chandrasekhar Rao: New Chief Minister of Telangana

  1. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी दि. 2 डिसेंबरला राज्य मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

  2. राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहा यांनी ही शपथ दिली.

  3. विधानसभा निवडणुकीचा निकाल -
  4. तेलंगणा (एकूण 119 जागा)
पक्ष जागा
तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) 88
भाजप 1
काँग्रेस 21
अन्य 9
  1. विधानसभा निवडणूक-
  2. भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
  3. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
  4. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
  5. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


For the Kumbh Mela, 41 projects worth Rs. 700 crores have been commissioned by the Railway Department

  1. आगामी कुंभ मेळाव्याच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे विभागातर्फे विकसित करण्यात आलेली 41 प्रकल्पे दि. 12 डिसेंबर 2018 रोजी कार्यरत करण्यात आली आहेत.
  2. या प्रकल्पांना एकूण 700 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे.
  3. कुंभ मेळावा 2019 साली जानेवारी महिन्यात उत्तरप्रदेश राज्याच्या अलाहाबाद शहरामध्ये भरणार आहे.
  4. यात्रेकरूंसाठी सार्वजनिक निवासस्थान, स्टॉल, वॉटर बूथ, तिकीटघर, दूरदर्शन संच, CCTV व शौचालये अश्याप्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
  5. मेळाव्यादरम्यान सुमारे 800 विशेष रेलगाड्या धावणार आहेत.
  6. कुंभ मेळावा विषयी -
    1. जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या ‘कुंभ मेळावा’ उत्सवाला संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ असल्याचे जाहीर करत गेल्यावर्षीच यादीत समाविष्ट केले आहे.
    2. भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभ मेळावा भरतो.
    3. कुंभ मेळावा हा धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वांत मोठा आणि शांततेत पार पडणारा मेळावा आहे. आता कुंभ मेळाव्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.
    4. UNESCO कुंभ मेळाव्याची दखल घेणार असून आता त्यासाठी आवश्यक उपाययोजना व संवर्धन संघटनेतर्फे केले जाणार आहे.


Top