Approval of 'Prime Minister's Annanada Income Conservation Campaign' (PM-AASHA)

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे.
 2. सरकारने यापूर्वीच खरीप पिकांसाठी किमान हमी भाव उत्पादन खर्चाच्या दीड पट वाढवला आहे.
 3. 2018 सालच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 4. या नवीन एकीकृत योजनेत शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची यंत्रणा समाविष्ट असून यात - मूल्य समर्थन योजना (PSS), मूल्य तफावत भरणा योजना  (PDPS), प्रायोगिक खासगी खरेदी आणि साठवणूक योजना (PPPS) अंतर्भूत आहेत.
 5. भात, तांदूळ आणि पोषक धान्ये/ भरड धान्ये खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या तसेच कापूस आणि ज्यूट यांसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील.
 6. प्रायोगिक तत्वावर खरेदीत खासगी क्षेत्राचा सहभाग चाचपून पाहण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याआधारे त्यांचा खरेदी प्रक्रियेतील सहभागाची व्याप्ती वाढवता येईल.
 7. म्हणूनच तेलबियांसाठी निवडक जिल्ह्यात खासगी खरेदी साठा योजना सुरु करण्याचा पर्याय राज्य सरकारांकडे आहे.
 8. याद्वारे निवडक खासगी संस्था अधिसूचित कालावधीत अधिसूचित बाजारपेठेत किमान हमी भावाने खरेदी करू शकतील आणि जेव्हा बाजारातील भाव कोसळतील तेव्हा अधिसूचित किमान हमी भावाच्या 15% कमाल सेवा शुल्क आकारले जाईल.


Manoj Jhalani received UNIATF award

 1. भारतीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि अभियान संचालक (NHM) मनोज झालानी यांना प्रतिष्ठित ‘संयुक्त राष्ट्रसंघ आंतर-विभागीय कृतीदल (UN Interagency Task Force -UNIATF) पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
 2. असंसर्गजन्य रोगांच्या (NCDs) प्रतिबंध आणि नियंत्रणात आणि संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 3. 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघ आंतरविभागीय कृतीदलातर्फे (UNIATF) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नियोजित एका समारंभात संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या (UNGA) तृतीय उच्चस्तरीय बैठकीत हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ आंतरविभागीय कृतीदल (UN Interagency Task Force -UNIATF) जगभरात असंसर्गजन्य रोगांच्या महामारीविरोधात प्रतिसाद देण्यासाठी उच्चस्तरीय वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकारांना पाठिंबा देण्यासाठी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटना आणि इतर आंतरसरकारी संघटनांच्या उपक्रमांशी समन्वय साधते.
 5. ही वचनबद्धता 2011 सालच्या ‘NCDs संदर्भात राजकीय घोषणापत्र’ यामध्ये नमूद केलेली आहे.
 6. UNIATFची स्थापना जून 2013 मध्ये करण्यात आली आणि त्याची धुरा जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडे सोपवली.


30th national youth parliament competition distribution of prizes

 1. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते 30व्या ‘राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2017-18’ साठी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आहे.
 2. पुढाकार घेण्याच्या बाबतीत रनिंग पार्लीमेंटरी ढाल आणि करंडक विजेता - केंद्रीय विद्यालय, AFS मनौरी, इलाहाबाद.
 3. स्पर्धेचे पहिले तीन विजेता (अनुक्रमे) -
  1. केंद्रीय विद्यालय, बजाज नगर, जयपूर
  2. केंद्रीय विद्यालय CRPF, भुवनेश्वर
  3. केंद्रीय विद्यालय, CLRI, चेन्नई
 4. केंद्रीय विद्यालयांसाठी आयोजित केली गेलेली ही स्पर्धा संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते.
 5. मंत्रालय गेल्या 30 वर्षांपासून केंद्रीय विद्यालयांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करत आहे.
 6. देशात 25 विभागांमध्ये एकूण 125 केंद्रीय विद्यालये आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.