1. HIV च्या नव्या प्रकरणांच्या संख्येत कमतरता आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एका नव्या अभिनव योजनेला सुरुवात केलेली आहे, ज्यात 10 बाबींवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे.
 2. एड्सच्या समूळ उच्चाटणाच्या हेतूने चाललेल्या वैश्विक प्रयत्नांचा भाग म्हणून, UN प्रोग्राम ऑन HIV/एड्स (UNAIDS), UN पॉप्युलेशन फंड (UNFPA) आणि अन्य भागीदारांनी ‘ ग्लोबल HIV प्रिव्हेंशन कोलिशन’ च्या पहिल्याच बैठकीत ‘ HIV प्रिव्हेंशन 2020’ मार्गदर्शिका जाहीर केली, जे 2020 सालापर्यंत नवीन HIV संक्रमणामध्ये 75% नी कमतरता आणण्याच्या उद्देशाने आहे.
 3. जास्तीत जास्त शक्यता असलेल्या क्षेत्रात मूल्यांकन करण्यासाठी अद्ययावत विश्लेषणात्मक अभ्यास आयोजित करणे तफावत ओळखण्यासाठी मार्गदर्शके आणि जलद विकासासाठी कृती विकसित करणे तरुण आणि महत्त्वाच्या लोकसंख्येच्या समावेशासह  HIV मुळे प्रभावित होणार्‍या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कायदेशीर आणि धोरणसंबंधी अडचणींना हाताळणे. किशोरवयीन मुली, तरुण महिला आणि त्यांचे पुरुष साथीदार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे. कंडोमची उपलब्धता आणि वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. HIV चा अधिक धोका असलेल्या लोकांसाठी प्रतिबंधात्मक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे.
 4. HIV प्रतिबंधात्मक प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रतिबंधक नेतृत्व मजबूत करणे आणि संस्थात्मक बदल करणे.  मार्गदर्शके विकसित करणे, हस्तक्षेपासंबंधी सूत्र विकसित करणे आणि सेवा वितरण व्यासपीठ ओळखणे आणि कृती योजनेला अद्ययावत करणे.

 5. एकत्रित प्रतिबंध क्षमता बांधणी आणि  एक तांत्रिक मदत योजना  विकसित करणे. अंमलबाजवणीत भाग घेणार्‍या नागरी संस्थांसाठी सोशल कॉन्ट्रॅक्टिंग यंत्रणा स्थापन करणे किंवा बळकट करणे आणि समुदाय निहित कार्यक्रमाचा विस्तार करणे.

 6. प्रतिबंधकतेसाठी उपलब्ध स्त्रोतांच्या मूल्यांकन करणे आणि निधी वाटपामधील तफावत दूर करण्यासाठी धोरणे विकसित करणे.  HIV प्रतिबंध कार्यक्रमासाठी देखरेख यंत्रणेची स्थापना करणे किंवा वर्तमान यंत्रणा मजबूत करणे.

 7. 2010 सालापासून बालकांमधील नवीन HIV संक्रमणात 47% ने घट झाली आहे तर प्रौढांमध्ये हे प्रमाण केवळ 11% ने घटलेले आहे.सर्व भागधारकांसह प्रतिबंधकतेसाठी जबाबदारी वाढवणे.


 1. विवाहाच्या आधी पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींना नरेंद्र मोदी सरकारकडून 51 हजारांचा निधी दिला जाणार आहे. 'मौलाना  आझाद एज्युकेशन फाऊंडेश ' ने दिलेला प्रस्ताव केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला असून त्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 2. अल्पसंख्याक गटातील मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे आणि वैचारिक प्रगल्भता त्यांच्यात यावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. मौलाना आझाद फाऊंडेशनच्या ' बेगम हजरत महल' शिष्यवृत्तीचा लाभ सध्या मुली घेत आहेत. शादी शगुन योजना ही याच योजनेचा पुढचा भाग आहे.
 3. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या अल्पसंख्य गटासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली. मात्र त्यावेळी अल्पसंख्य गटाच्या  शिक्षणाची अट बारावीपर्यंतच होती
 4. तसेच आता आणलेल्या शगुन योजनेत गुणवंत मुलींसाठी शिक्षणाची अट पदवीपर्यंत ठेवण्यात आली आहे.  अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी या संदर्भातली माहिती दिली. 


 1. भारतीय वंशाच्या अमेरिकी दंतवैद्य आणि वैज्ञानिक डॉ. निशा डिसिल्वा यांना अमेरिकेत ‘सस्टेनिंग आऊटस्टॅण्डिंग अचिव्हमेंटअंतर्गत ५२.७३ कोटी रुपयांचा अनुदान स्वरूपातील पुरस्कार प्राप्त झाला आहे. मान व डोक्याच्या कर्करोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या संशोधन करीत आहेत, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
 2. कुठल्याही कर्करोगात रुग्णांचे मरण्याचे प्रमाण जास्त असते याचे कारण म्हणजे त्यात रोगनिदान लवकर होत नाही. त्यामुळे डिसिल्वा यांच्या संशोधनाचा भर हा रोगनिदानाच्या नवीन पद्धती शोधण्यावर आहे. उपचाराच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी त्यांना  आठ वर्षांत पुरस्काराची रक्कम टप्याटप्याने दिली जाणार आहे.
 3. मानेचा व डोक्याचा कर्करोग जगात दरवर्षी सहा लाख लोकांना होतो, त्यामुळे त्याचे रोगनिदान व उपचार यावर भर देणे गरजेचे होते. जगातील हा सर्वत्र आढळणारा सहाव्या प्रकारचा कर्करोग आहे. डिसिल्वा या  बीडीएस,  एमएसडी पीएचडी आहेत. सध्या त्या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम करतात. 
 4. दंतवैद्यकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. नंतर त्या अमेरिकेला गेल्या. तेथे इंडियाना विद्यापीठातून पीएचडी केली. रोगनिदानशास्त्राच्या ख्यातनाम प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याच्या जोडीला त्या कर्करोग  जीवशास्त्रज्ञही आहेत.
 5. मिशिगन विद्यापीठातील कर्करोग संशोधन केंद्राच्या त्या सदस्य असून त्यांनी बायोमार्कर्स व रेणवीय रचनांच्या माध्यमातून  कर्करोगाच्या गाठीची वाटचाल कशी होते व उपचारांना कर्करोग का दाद देत नाही यावर संशोधन केले आहे.
 6. त्यांच्या या संशोधनातून जे फलित हाती येईल त्यातून मान व डोक्याच्या कर्करोगावर प्रभावी उपचार कालांतराने शक्य होतील. त्यांना यापूर्वी रोगनिदान संशोधनासाठी  रॉड कॉसन पुरस्कार व विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी क्रॉसबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


Top