MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ज्येष्ठ विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाच्या दस्तावेजांवर संपादित केलेल्या पुस्तकातून विद्यार्थी आता धडे घेऊ शकणार आहेत.

2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या पुस्तकाला ‘एम.ए.’ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमात लावण्यास मान्यता दिली आहे.

3. तर विशेष म्हणजे अगोदर याच पुस्तकाला त्याच्या नावामुळे अभ्यासक्रमात लावण्यास विद्यापीठाने नकार दिला होता. झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत राज्यशास्त्र अभ्यासमंडळाकडून यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला.

4. तसेच कुलगुरुंनी पुस्तकात दिलेल्या माहितीचे वाचन केले. तसेच यात कुठलीही आक्षेपार्ह बाब नसल्याची भूमिका मांडली. अगोदरदेखील या पुस्तकावर चर्चा झाली होती व त्यावेळी अभ्यासमंडळाकडून झालेल्या चुकीचा उल्लेखामुळेच हा गैरसमज झाला होता, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाने या प्रस्तावाला मान्यता दिली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या ‘टाईम नेक्स्ट 100’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

2. तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 100 व 200 मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. नेपोली येथे विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा
अनुभव गाठिशी घेऊन आता इस्रो 
चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे.

2. तर इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेवर काम सुरु केले आहे. माहितीनुसार, या मोहिमेसाठी नोव्हेंबर 2020 पर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

3. तसेच इस्रोने वेगवेगळया समित्या स्थापन केल्या असून ऑक्टोंबरपासून या समित्यांच्या आतापर्यंत चार उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत.

4. चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे नव्या मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.

2. तर या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

3. तसेच यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी स्वीकारले आहे.

2. ब्रिक्स परिषदेत मोदी आणि बोल्सोनारो यांची भेट झाली त्या वेळी मोदी यांनी बोल्सोनारो यांना निमंत्रण दिले. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये फलदायी चर्चा झाली. ब्राझीलच्या अध्यक्षांनी मोठय़ा व्यापारी शिष्टमंडळासह
भारतामध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन तसेच राष्ट्रीय बाल दिन म्हणून पाळला जातो.

2. वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1765 मध्ये झाला होता.

3. जेम्स ब्रूस यांनी सन 1770 मध्ये नाईल नदीचा स्रोत शोधला.

4. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला.

5. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना 14 नोव्हेंबर 1969 मध्ये झाली.


Top

Whoops, looks like something went wrong.