Constitution of the Tanta Judgment Center for the Mahanadi Water Dispute by the Center

 1. केंद्र शासनाकडून महानदी जल विवादाला सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेत एकूण तीन सदस्यांचे तंटा न्यायाधीकरण गठित करण्यात आले आहे.
 2. न्यायाधीकरणाचे अन्य दोन सदस्य:-
  1. पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. रविरंजन
  2. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. इंद्रमीत कोर कोच्चर.
 3. ओडिशा शासनाने डिसेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि अशी मागणी केली की त्यांनी छत्तीसगडला महानदीच्या वरच्या भागात प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश द्यावे.
 4. त्यानंतर 23 जानेवारीला हे न्यायाधिकरण तयार करण्याचे आदेश केंद्राला देण्यात आले होते.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. महानदी:-
  1. महानदी ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमधील सर्वात मोठी नदी आहे.
  2. महानदीचा उगम रायपुरच्या जवळ धमतरी जिल्ह्यात सिहावा नामक पर्वतराजीत आहे.
  3. याचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे.
 2. आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा-1956 च्या तरतुदीनुसार, न्यायाधिकरणात एक अध्यक्ष तसेच भारताचे सर न्यायाधीशांनी, सर्वोच्च वा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांपैकी नियुक्त केलेल्या दोन इतर सदस्यांचा समावेश असेल.
 3. कायद्यानुसार, न्यायाधीकरणाने तीन वर्षात आपला अहवाल आणि निर्णय देणे आवश्यक आहे.


Improved TPP Trade Agreement by 11 Pacific Countries

 1. 11 प्रशांत देशांनी बहुचर्चित ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (TPP) वर अखेर स्वाक्षर्‍या केल्या. मात्र पुढाकार घेतलेल्या अमेरिकेने यामधून आपली माघार घेतली.
 2. TPP करारावर ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, चिली, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, कॅनडा आणि मेक्सिको यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
 3. ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (TPP):-
  1. जागतिक व्यापार धोरणात क्षेत्रीय व्यापाराला चालना देण्याच्या हेतूने 5 वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर संयुक्त राज्य अमेरिका व जपान यांसहित प्रशांत महासागर खंडातल्या 12 देशांच्यामध्ये एका महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराची रचना केली गेली.
  2. या कराराला ‘ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (TPP)’ हे नाव दिले गेले.
  3. TPP युरोपीय संघाच्या रचनेवर एकल बाजारपेठ बनविण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी करार आहे.
  4. TPP प्रशांत क्षेत्रातल्या 12 देशांमध्ये झालेला एक मुक्त व्यापार करार आहे. हा 5 ऑक्टोबर 2015 रोजी अमेरिकेच्या अटलांटा शहरात तयार केला गेला.
  5. मात्र अमेरिकेने जानेवारी 2017 रोजी TPP वाटाघाटीतून माघार घेतली.
TPP मध्ये आराखडीत समाविष्ट प्रदेश
 1. जपान, सिंगापुर, व्हिएतनाम, ब्रुनेई (आशिया) तसेच मलेशिया, उत्तर अमेरिका पासून ते संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको, दक्षिण अमेरिका पासून ते चिली तसेच पेरू आणि ऑस्ट्रेलिया पासून ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड.
 2. विवाद निराकरणासाठी तटस्थ न्यायाधिकरणाची तरतूद यामध्ये आहे. करारामुळे जवळपास 1800 कर रद्द होणार. सदस्य देश 800 दशलक्ष लोकसंख्या व एकूण जागतिक अर्थव्यवस्थेच्या 40% चे प्रतिनिधित्व करते.
 3. या करारामुळे देशांमध्ये एकसमान व्यापारी मानक लागू होतील, समान श्रमिक अधिकार असतील आणि पशूंच्या अवैध व्यापाराला आळा बसणार आहे.


 NASA searched for water cloud for the first time in the stars

 1. NASA च्या शास्त्रज्ञांना अवकाशात तार्‍यांच्यामध्ये पाण्याचा अंश असल्याचा नवीनच शोध लागला आहे.
 2. जेम्स वेब स्पेस दुर्बिणीच्या मदतीने केलेल्या शोधकार्यात असे आढळून आले की, एक असा ढग आहे ज्यामध्ये संपूर्ण विश्वात सर्वाधिक पाणी आहे.
 3. हा अणुंनी बनलेला एक ढग आहे, जो धूळ, वायु आणि छोट्या-छोट्या अणुंनी बनलेला आहे.
 4. हे पाणी तार्‍यांच्या ग्रहांच्या छोट्या कक्षेपर्यंत पोहचवल्या जाते. या ढगांच्या आतमध्ये छोट्या धुळीच्या कणांच्या पृष्ठभागावर पाणी बनण्यासाठी ऑक्सीजनसोबत हायड्रोजन अणु एकत्र येतात.
 5. हे कार्बन मिथेन बनविण्यासाठी हायड्रोजन सोबत जुळतात. हे हायड्रोजनसोबतच्या नायट्रोजन बंधपासून अमोनिया तयार करतात.
 6. हे अणु धुळीच्या कणांच्या पृष्ठभागावर चिकटतात, ज्यापासून लाखो वर्षांमध्ये बर्फाचे थर जमा होतात. आणि अश्या प्रकारे जीवनासाठी लागणारे साहित्य वितरित केले जातात.
 7. अश्या ढगांमधील या बर्फाची रासायनिक संरचना जाणून घेतल्यास, त्यांची कश्याप्रकारे एखाद्या तार्‍याच्या आणि त्याच्या ग्रहांच्या निर्मिती दरम्यान उत्क्रांती होते, हे समजून घेण्यास मदत होणार आहे. यासाठी पुढे विस्तारीत स्वरुपात अभ्यास करण्याची संशोधकांची योजना आहे.


 Principal Visharad Balkrishna Doshi received pritzker awards

 1. स्थापत्य विशारद बाळकृष्ण दोशी स्थापत्यशास्त्रातील नोबेल समजला जाणारा अत्यंत मानाचा ‘प्रित्जकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
 2. हा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय स्थापत्य विशारद ठरले आहेत. १ लाख डॉलर्स (६५ लाख रुपये) व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 3. दोशी यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यात झाला. मुंबईतील जे जे महाविद्यालयात शिक्षण घेतलेले दोशी आज ९० वर्षांचे आहेत.
 4. १९४७च्या सुमारास त्यांनी स्थापत्य कलेचा अभ्यास सुरू केला. कोरबिझियर हे स्वीस-फ्रेंच स्थापत्य विशारद त्यांचे गुरू.
 5. चंदीगढ शहराच्या स्थापत्यरचनेत त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. लुईस कान यांच्यासमवेत त्यांनी अहमदाबादच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची इमारत सुंदर पद्धतीने साकारली.
 6. कमकुवत वर्गासाठी चांगली घरे बांधण्याच्या उद्देशाने त्यांनी अरण्य लो कॉस्ट हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इंदोर येथे साकार केला. त्यासाठी त्यांना आगाखान पुरस्कार मिळाला होता.
 7. मध्यप्रदेश वीज मंडळाची इमारत, बेंगळूरुतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेची इमारत त्यांनी साकारल्या.
 8. त्यांच्या वास्तू या भारतीय स्थापत्य, इतिहास, संस्कृती, स्थानिक परंपरा व बदलता काळ यांची सांगड घालणाऱ्या आहेत.
 9. १९५६मध्ये त्यांनी वास्तुशिल्प ही संस्था स्थापन केली. तीच आता वास्तुशिल्प कन्सल्टंटम्हणून काम करीत आहे.
 10. अहमदाबाद येथे त्यांनी दी स्कूल ऑफ आर्किटेक्चर ही संस्था सुरू केली तीच आता सेंटर फॉर एन्व्हरॉन्मेंट प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाने प्रसिद्ध आहे.
 11. शहर रचनाकार, शिक्षक, स्थापत्य विशारद अशा अनेक भूमिकांतून त्यांनी काम करत आधुनिक स्थापत्यकलेत त्यांनी भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.


Jingping made way for living as the lifelong national president

 1. चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा २ कार्यकाळांची निर्धारित मर्यादा संपुष्टात आणली आहे.
 2. त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे, जो २०२३ मध्ये संपणार आहे.
 3. चीनच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पदांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सलग दोन कालावधींची कमाल मर्यादा होती.
 4. राज्यघटनेतील ही कमाल मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीपीसी) ठेवला होता.
 5. राष्ट्रीय पीपल्स काँग्रेस या चीनच्या संसदेने तो २,९७३ विरुद्ध २ अशा बहुमताने मंजूर केला.
 6. सातत्याने पक्षाच्या प्रस्तावांचे समर्थन करत असल्यामुळे चीनच्या संसदेला रबर स्टँम्प संसद म्हटले जाते.
 7. यापूर्वी माओ व डेंग शियाओ पिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते म्हणून ओळखले गेले. परंतु त्यांच्या सत्तेलाही राज्यघटनेचे कमाल १० वर्षांचे बंधन होते.
 8. अनिश्चित काळापर्यंत एखाद्याकडून सत्ता मिळवण्याचा धोका ओळखून ज्येष्ठ नेते डेंग शियाओ पिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी २ कार्यकाळ म्हणजेच १० वर्षांपर्यंत सत्तेत राहण्याची मर्यादा निश्चित केली होती. 


The first national academy for coastal policing(nacp) to be set up in Gujarat - Home Ministry

 1. भारताची किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलीसांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी गुजरातमध्ये ‘नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग (NACP)’ उभारले जाणार आहे.
 2. ही तटिय पोलीस प्रबोधिनी सुरू करण्यास गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे.
 3. ही भारतातली प्रथम तटिय पोलीस प्रबोधिनी असणार आहे.
 4. पुढील महिन्यापासून ही संस्था नुकत्याच तयार केलेल्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात ओखा गावात स्थित गुजरातच्या मत्स्यपालन संशोधन केंद्राच्या परिसरात तात्पुरते आपले कार्य सुरू करणार आहे.
 5. अर्धसैनिक दल आणि संरक्षण दलांच्या बहू-संस्था चमूंकरवी ही संस्था चालवली जाणार आहे.
 6. ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) या वैचारिक संस्थेकडून NACP ची उभारणी केली जाणार आहे.
 7. सीमा सुरक्षा दल (BSF) कडून नौदल आणि तटरक्षक यांच्या समवेत संस्था चालवली जाणार आहे.


The Importance of Today's Day in History 14 march

 1. महत्वाच्या घटना:-
 2. १९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
 3. १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
 4. २००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.
 5. २०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

जन्म:-

जन्म
 1. १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)
 2. १९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)
 3. १९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.
 4. १९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८८३: जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)
 2. १९३२: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)
 3. १९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)
 4. २००३: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९३२)
 5. २०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)


Top

Whoops, looks like something went wrong.