mpsc class in thane

  1. भारत-अमेरिका संबंध पुढे नेण्यासाठी राजस्थानातील एका खेडय़ास अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याचे सामाजिक कार्यकर्ते व सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक प्रमुख बिंदेश्वर पाठक यांनी जाहीर केले आहे.
  2. वॉशिंग्टन येथील एका सामुदायिक कार्यक्रमानंतर बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले, की भारतातील एका खेडय़ास ट्रम्प यांचे नाव देण्यात येईल.
  3. हे खेडे राजस्थानातील मेवात भागात विकसित केले जात आहे. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी या खेडय़ास ट्रम्प यांचे नाव देण्यात येईल.
  4. स्थानिक समुदायाला व राजकीय नेत्यांना सादरीकरणादरम्यान पाठक यांनी सांगितले, की ते किफायतशीर दरात स्वच्छता व्यवस्था व प्रसाधनगृहे उपलब्ध करून देत आहेत व मैला डोक्यावरून वाहून नेण्याची प्रथा बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत.
  5. भारतीय अमेरिकी समुदायाला त्यांनी असे आवाहन केले, की स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे.
  6. एका प्रसाधनगृहाची (टॉयलेट) किंमत २५ ते ५०० अमेरिकी डॉलर्स असते. ती किंमत त्यातील तंत्रज्ञान, स्वरूप व रचना यावर अवलंबून असते.


mpsc current affairs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाचशे रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे.

पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. यानंतर रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या.

रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर जारी केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून आता चलनात आणल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची रचना सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील असणार आहेत.


Top