आरोग्य मंत्रालयाच्या ‘मिशन परिवार विकास’ ला सुरुवात

 1. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे मंत्री जय प्रकाश नड्डा यांच्या हस्ते उच्च TFR असलेल्या सात राज्यांचे 146 उच्च प्रजनन असलेल्या जिल्ह्यांना लक्ष्य करून ‘मिशन परिवार विकास’ सुरू करण्यात आले आहे.
 2. 11 जुलै 2017 रोजी साजर्या केलेल्या जागतिक लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात या अभियानाला सुरुवात केली गेली आहे.
 3. या अंतर्गत गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून लोकसंख्या स्थिर करण्यासाठी विशेष लक्ष्य आधारित पाऊल उचलले जातील.

देशामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये

 1. उत्तर प्रदेश,
 2. बिहार,
 3. राजस्थान,
 4. मध्य प्रदेश,
 5. छत्तीसगढ,
 6. झारखंड
 7. आणि आसाम यांचा समावेश होतो.

या राज्यांमध्ये एकूण प्रजनन दर 3 पेक्षा अधिक आहे.

अभियानाचे स्वरूप:-

 1. ‘मिशन परिवार विकास’ अंतर्गत सेवांच्या तरतुदी, प्रोत्साहनपर योजना, अन्नधान्य सुरक्षा, क्षमता निर्मिती, सुलभ वातावरण आणि गहन संनियंत्रण यांच्या माध्यमातून उत्तम पातळी प्राप्त करण्यावर लक्ष्य केन्द्रित केले जाईल.
 2. ‘अंतरा’ कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये नवे इंजेक्शन सामील केले गेले आणि ‘फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (FP-LMIS) या नव्या सॉफ्टवेयरचा शुभारंभ केला.
 3. हे सॉफ्टवेयर आरोग्य सुविधा आणि ASHA केंद्रांवर निरोधकांच्या मागणी-पुरवठा संबंधी संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी तयार केले गेले आहे.
 4. याशिवाय कुटुंब नियोजनावर नवे ग्राहकांना अनुकूल अश्या संकेतस्थळाचे आणि ‘52 वीक’ या रेडियो कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
 5. या रेडियो कार्यक्रमामध्ये विवाह आणि कुटुंब नियोजन या संबंधित मुद्द्यांवर पती-पत्नी चर्चा करतील, ज्याला देशभरात प्रसारित केले जाईल.


बांगलादेशची चीनकडून पाणबुड्यांची खरेदी

 1. भारताचा जवळचा सहकारी बांगलादेशने चीनकडून २०.३० कोटी अमेरिकन डॉलर्सना दोन पाणबुडया विकत घेतल्या आहेत.
 2. बांगलादेश नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी या दोन पाणबुडया विकत घेतल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले.
 3. ०३५जी मिंग क्लासच्या या पाणबुडया आहेत.
 4. बीएन नबाजत्रा आणि बीएन आग्राजत्रा अशी या पाणबुडयांना नावे देण्यात आली आहेत.
 5. २०१३मध्ये बांगलादेशने रशियाकडून युध्दसामग्री खरेदी करार केला.
 6. त्यावेळी शेख हसीना यांनी चीनकडून पाणबुडया विकत घेण्याची योजना जाहीर केली होती.
 7. सध्या सिक्कीम सीमेवरुन भारत आणि चीनमध्ये संबंध ताणले गेले आहेत.
 8. अशावेळी बांगलादेश चीनच्या जवळ जाणे भारताला परवडणारे नाही.


जलवाहतुक मंत्रालयाकडून क्रूझ पर्यटन उद्योगांमधील नियमात सुधारणा जाहीर

 1. पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने जलवाहतुक मंत्रालयाने देशभरात क्रूझ पर्यटन उद्योगांचे संचालन करणार्या नियामक प्रक्रियांमध्ये सुधारणा केल्या आहेत.
 2. या क्षेत्रात नियमांमध्ये सुलभता आणल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार.
 3. त्यामुळे सुरक्षा, इमिग्रेशन आणि सीमाशुल्क यासंबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
 4. क्राऊज टुरिझम उद्योगासाठी ग्राहकास अनुकूल आणि अडथळा नसलेल्या रसद प्रक्रियेसाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी मंत्रालयासोबत जुळलेल्या जागतिक सल्लागारांच्या शिफारशींवर आधारित या सुधारणा आहेत.

शिफारसी पुढीलप्रमाणे:- 

 1. व्यवसायासाठी भासणार्या संपूर्ण आवश्यकतांची आधीच पूर्तता करण्यासाठी क्रूज ऑपरेटरसाठी एकल खिडकी प्रणाली सुरू करणे.
 2. क्रूज टर्मिनल्ससाठी अलग समर्पित मार्ग आणि प्रवेशद्वार तयार करणे.
 3. सर्व बंदरांवर CISF द्वारे एकसमान आणि सुसंगत सुरक्षा पद्धती राबवणे.
 4. रात्री आणि स्थानिक स्थळांना भेट देते वेळेस प्रवाशांसाठी बंदरांना जास्तीतजास्त सुरक्षा पुरवणे आणि प्रवेश देणे.
 5. सर्वसाधारण औपचारिकता पूर्ण केल्यानंतर समोरासमोर तपासणी केली जाऊ नये.
 6. प्रवाश्यांची सुरक्षा तपासणी फक्त एकदाच केली जावी.
 7. ब्यूरो ऑफ इमिग्रेशन आणि CISF यांच्यात संयुक्त सहकार्य राखणे आणि भारताला भेट देणार्या क्रूझ पर्यटकांना सुखद अनुभव देण्यासाठी सध्याची पद्धत पुन्हा तयार करणे.
 8. प्रवाशांसमोर प्रक्रिया पार पाडणार्या कर्मचार्यांच्या प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी मानक कार्यान्वयन पद्धती तयार करणे.
 9. सुरक्षेसंबंधित प्रक्रियांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे.
 10. विमानतळावरील तपासणीप्रमाणेच अस्तित्वात असलेल्या टर्मिनलवर ग्रीन लेन/रेड लेन ची अंमलबजावणी करणे.
 11. क्रूज जहाजेच्या सूचीत केवळ मर्यादित वस्तूंना स्थान देणे.


Top

Whoops, looks like something went wrong.