8 agreement between India and Oman

 1. 11-12 फेब्रुवारी 2018 या कालावधीत ओमान देशाच्या दौर्‍यादरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओमानचे राजे कबूस बिन साद अल साद यांच्यासोबत झालेल्या एका द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील पॅलेस्टाईन, UAE आणि ओमान या देशांच्या दौर्‍यावर आहेत.
 3. ओमान हा त्यांच्या दौर्‍याचा शेवटचा पडाव होता. दोन दिवसांच्या चर्चेनंतर ते भारतात परतणार आहेत.  
 4. बैठकीचे फलित म्हणून दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांमध्ये आठ करारांवर स्वाक्षर्‍या केल्या.
 5. भारत-ओमन संबंध:-
  1. भारत-ओमन संबंध तसे म्हटले तर प्राचीन असल्याचे समजल्या जाते, बहुतेक तिसर्‍या शतकापासूनचे.
  2. मात्र आधुनिक स्वरुपात या संबंधाना 1955 साली नव्याने चालना मिळाली.
  3. भारताने फेब्रुवारी 1955 मध्ये ओमानची राजधानी मस्कटमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास उघडले आणि ते वर्ष 1960 मध्ये महावाणिज्य दूतावास (Consulate General) म्हणून विस्तारीत करण्यात आले.
  4. त्यानंतर 1971 साली ते पूर्ण दूतावासात रूपांतरित केले गेले.
  5. वर्ष 1972 मध्ये ओमानने नवी दिल्लीत दूतावासाची स्थापना केली आणि 1976 साली मुंबईत महावाणिज्य दूतावास उघडले.
भारत आणि ओमान यांच्यातील करार
 1. आठ सामंजस्य करार पुढीलप्रमाणे:-
  1. दिवाणी आणि व्यावसायिक प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि न्यायिक सहकार्यासाठी करार
  2. राजनैतिक, विशेष सेवा आणि अधिकृत पासपोर्ट धारकांना व्हिजामध्ये सामान्य अनुमतीपासून सूट मिळण्यासाठी करार
  3. आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार
  4. अंतराळाच्या शांतीपूर्वक उपयोगामध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार
  5. भारतात परराष्ट्र मंत्रालयांतर्गत परराष्ट्र सेवा संस्था आणि ओमान राजनैतिक संस्था यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार
  6. ओमानच्या नॅशनल डिफेंस कॉलेज आणि भारताच्या संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार
  7. पर्यटन सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार
  8. लष्करी सहकार्यासंबंधी सामंजस्य करारासाठीचे जोडपत्र


India State Forest Report 2017

 1. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडून ‘भारत राज्य वन अहवाल 2017 (India State of Forest Report -ISFR)’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. देशात मागील 10 वर्षांमध्ये वन क्षेत्रात वाढ झाली आहे आणि भारत वन क्षेत्राच्या बाबतीत जगातल्या अग्रेसर 10 देशांमध्ये समाविष्ट झालेला आहे.
 3. ठळक बाबी:-
  1. भारताचा 24.4% भूभाग वन आणि झाडांनी आच्छादलेला आहे, तर जगात हे प्रमाण 2.4% एवढे आहे. या वनांवर 17% मनुष्यवस्ती आणि 18% प्राणी अवलंबून आहे.
  2. संयुक्‍त राष्‍ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, वार्षिक पातळीवर वन क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे अश्या जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा 8 वा क्रमांक आहे.
  3. देशात वन क्षेत्र व वृक्षावरणाच्या स्‍थितीत वर्ष 2015 च्या तुलनेत 8021 चौ. किलोमीटरची वाढ झाली आहे. यापैकी वन क्षेत्रात 6,778 चौ. किलोमीटरची तर वृक्षावरण क्षेत्रात 1243 चौ. किलोमीटरची वाढ झाली आहे.
  4. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रात वन आणि वृक्षावरण क्षेत्राचा वाटा 24.39% आहे. यामध्ये घनदाट वनांचे सर्वाधिक प्रमाण आहे.
  5. घनदाट वने वातावरणातून सर्वाधिक प्रमाणात कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेण्याचे काम करते. घनदाट वन क्षेत्राच्या विस्तारामुळे खुल्या वनांचे क्षेत्र देखील वाढलेले आहे.
 4. बाह्य वन व वृक्षावरण:-
  1. देशात बाह्य वन व वृक्षावरण यांचे एकूण क्षेत्र 582.377 कोटी घन मीटर अंदाजित आहे, ज्यापैकी 421.838 कोटी घन मीटर क्षेत्र वनांच्या अंदर आहे, तर 160.3997 कोटी घन मीटर क्षेत्र वनांच्या बाहेर आहे.
  2. वर्ष 2015 च्या तुलनेत बाह्य वन व वृक्षावरण क्षेत्रात 5.399 कोटी घन मीटरची वाढ झालेली आहे, ज्यामध्ये 2.333 कोटी घन मीटरची वाढ वन क्षेत्राच्या आतमध्ये तर 3.0657 कोटी घन मीटरची वाढ वन क्षेत्राच्या बाहेर झालेली आहे. हे प्रमाण मागील आकड्यांच्या तुलनेत 3.80 कोटी घन मीटर इतके आहे.
 5. बांबू आच्छादित क्षेत्र:-
  1. देशात एकूण बांबूचे क्षेत्र 1.569 कोटी हेक्‍टर एवढे आहे. वर्ष 2011 मधील आकड्यांच्या तुलनेत या क्षेत्रात 17.3 लाख हेक्‍टरची वाढ झालेली आहे. बांबूच्या उत्‍पादनात वर्ष 2011 मधील प्रमाणाच्या तुलनेत 1.9 कोटी टनची वाढ नोंदविण्यात आली आहे.
भारत राज्य वन अहवाल 2017
 1. राज्यनिहाय स्थिती:-
 2. वनांच्या बाबतीत आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ राज्यात अधिक वाढ झालेली आहे. आंध्रप्रदेशात वन क्षेत्रात 2141 चौ. किलोमीटरची वाढ झालेली आहे, जेव्हा की हे प्रमाण कर्नाटकसाठी 1101 चौ. किलोमीटर आणि केरळसाठी 1043 चौ. किलोमीटर एवढे आहे.
 3. क्षेत्राच्या तुलनेत, मध्‍यप्रदेशाकडे 77414 चौ. किलोमीटरचे सर्वाधिक प्रमाणात वन क्षेत्र आहे. तर या बाबतीत अरूणाचल प्रदेश (66964 चौ. किलोमीटर) आणि छत्‍तसीगड हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
 4. एकूण भूभागाच्या तुलनेत, लक्षद्वीपकडे 90.33% एवढे सर्वाधिक वनाच्‍छादित क्षेत्र आहे. त्यानंतर मिजोरम (86.27%) आणि अंदमान निकोबार बेटे (81.73%) यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.
 5. देशातील 15 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा 33% भूभाग वनाच्‍छादित आहे. यामध्ये मिजोरम, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, नागालँड, मेघालय आणि मणिपुर या राज्यांमधला 75% हून अधिक भूभाग वनाच्‍छादित आहे. तर त्रिपुरा, गोवा, सिक्‍किम, केरळ, उत्‍तराखंड, दादर नगर हवेली, छत्‍तीसगड आणि आसाम यांचा 33-75% भूभाग वनाच्‍छादित आहे.
 6. देशाचे 40% वनाच्‍छादित क्षेत्र 10000 चौ. किलोमीटर वा त्याहून अधिकच्या 9 मोठ्या क्षेत्रांच्या रूपात सध्या उपस्थित आहे.
 7. देशामध्ये कच्‍छचे वनस्‍पती क्षेत्र 4921 चौ. किलोमीटर आहे, ज्यामध्ये वर्ष 2015 च्या तुलनेत एकूण 181 चौ. किलोमीटरची वाढ झालेली आहे. कच्‍छ वनस्‍पती क्षेत्र असलेल्या सर्व 12 राज्यांमध्ये ही वाढ नोंदवली गेली आहे.

 


RBI has revised the revised guidelines for redressal of debt

 1. भारतीय रिझर्व बँक (RBI) ने ‘नादारी व दिवाळखोरी आचारसंहिता (IBC), 2016’ च्या नियमांनुसार सध्याच्या दिशानिर्देशांशी समन्वय साधत बुडीत कर्जाचे तातडीने निवारण करण्यासाठी सुधारित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत.
 2. नवे दिशानिर्देश बुडीत संपत्तीची पूर्व-ओळख पटवणे आणि नोंदणी करण्यासाठी निश्चित कार्यचौकट आहे.

यामधील ठळक बाबी

 1. बुडीत खातींच्या निराकरणासाठी संस्थात्मक यंत्रणा म्हणून असलेल्या संयुक्त कर्जदाता मंच (JLF) ला रद्द करण्यात येईल.
 2. सर्व खाती, ज्यामध्ये कोणत्याही योजना लागू करण्यात आली आहे परंतु अद्याप अंमलात आलेली नाही, अशी सर्व खाती सुधारित आराखड्याने नियंत्रित केल्या जातील.
 3. बँकांना डीफॉल्ट कालावधीच्या आधारावर बुडीत खाती ओळखून, त्यांचे वर्गीकरण विशेष नमूद खाती (SMA) म्हणून करणे आहे.
 4. सर्व कर्जदात्यांना या नव्या कार्यचौकटी अंतर्गत बुडीत मालमत्तेचे निराकरण करण्यासाठी संचालक मंडळाकडून मंजूर करण्यासंदर्भात एक धोरण तयार करणे गरजेचे आहे.


NHAI's initiative to sort order for tolane system

 1. भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 10 फेब्रुवारी 2018 रोजी एक राष्ट्रव्‍यापी अभियान सुरू केले आहे, जेणेकरून महामार्गांचा वापर करणार्‍यांवर प्रतिकूल प्रभाव टाकणार्‍या मुद्द्यांना हाताळल्या जाऊ शकणार आहे.
 2. अभ्यासाअंती NHAI टोल नाक्यासाठी एक क्रमवारी प्रणाली सुरू करणार आहे.
 3. प्रत्येक तिमाहीत, तीन सर्वोत्कृष्ट टोल नाक्यांची निवड केली जाणार आणि प्रसिद्ध केले जाणार आहे.
 4. सामील असलेले मुद्दे:-
  1. टोल देण्यासंबंधी सुलभता,
  2. इलेक्‍ट्रॉनिक टोल/फास्टेग लेन,
  3. टोल नाक्यावरची स्वच्छता,
  4. टोल नाक्यावर कार्यरत लोकांचा व्‍यवहार,
  5. मार्शलांची नियुक्ती,
  6. शौचालयांची साफसफाई,
  7. हायवे नेस्‍ट (मिनी) चे कार्यान्वयन,
  8. महामार्गांच्या किनारी सुविधा आणि महामार्गांवर कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीवर रुग्णवाहिका
  9. क्रेनची उपलब्‍धता


Charlotte Kallah of Sweden won the first gold medal at the Winter Olympics

 1. स्वीडनच्या चार्लोट काल्ला हिने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे आयोजित हिवाळी ऑलंपिकमध्ये महिलांच्या स्किअॅथलॉन क्रास कंट्री रेस खेळात पहिले सुवर्णपदक आपल्या नावे करून घेतलेले आहे.
 2. काल्ला हिने महिलांच्या स्किअॅथलॉन क्रास कंट्री रेसमध्ये नॉर्वेच्या मेरिट ब्जॉर्गेनचा पराभव केला.
 3. 9-25 फेब्रुवारी या काळात IOA कडून आयोजित हिवाळी ऑलंपिकमध्ये 92 देशांमधून जवळपास 3000 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे.
 4. खेळांमध्ये सात क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
 5. भारताकडून क्रॉस कंट्री स्कायर जगदीश सिंह आणि ल्यूज अॅथलीट शिवा केशवन यांचा सहभाग आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

 1. भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यास जबाबदार संघटना आहे.
 2. याची स्थापना 1927 साली करण्यात आली.


Georra in Dubai - The world's tallest hotel

 1. संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी दुबईत जगातील सर्वाधिक उंच ‘हॉटेल गेवोरा’ 12 फेब्रुवारी 2018 पासून ग्राहकांसाठी खुले झाले आहे.
 2. ‘हॉटेल गेवोरा’ मध्ये 75 मजले आहेत.
 3. या हॉटेलची उंची 356 मीटर आहे.
 4. यापूर्वी जगातील सर्वाधिक उंच हॉटेल म्हणून दुबईतल्याच ‘हॉटेल JW मेरियट (355 मीटर)’ ची नोंद होती.
 5. हॉटेलमध्ये 528 खोल्या, 4 रेस्टोरंट, ओपन एअर पूल, 71 व्या मजल्यावर लक्झरी स्पा, हेल्थ क्लब आहे.
 6. ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात उंच इमारत आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.