Renowned scientists and father of DNA technology in India, Lalji Singh passed away

 1. भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह (७०) यांचे दिल्लीला जात असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
 2. सिंह यांनी बीएचयूमधूनच त्यांनी बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवीधर होते.
 3. तसेच बीएचयूचे २५वे उपकुलगुरू असलेल्या सिंह यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
 4. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे.
 5. डॉ. लालजी सिंह यांनी १९८८ मध्ये डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचा शोध लावला.
 6. डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानासाठी त्यांना सर्वाधिक आठवले जाईल.
 7. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला.
 8. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होेते.
 9. सर्व उपाय निकामी ठरल्यानंतर डॉ. सिंह यांनीच डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला.
 10. त्यांच्याच निर्देशांवरून प्रियंका गांधी यांच्या नखाचा नमुना घेण्यात आला आणि त्याचा डीएनए मृतदेहाच्या डीएनएशी जोडून पाहिला.
 11. त्यावरून ओळख पटली.
 12. म्हणूनच सिंह यांना भारतातील डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचे जनक म्हटले जाते.


The second place in the World Heritage Site in the Taj Mahal

 1. ताजमहाल’ हे युनेस्कोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) असल्याचे एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने म्हटले आहे. 
 2. ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 3. या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळांमध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झु डा याने ख्रिस्तपूर्व १३६८ साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे.
 4. दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचु पिचुने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे.
 5. याशिवाय ब्राझीलमधील इगुआझु राष्ट्रीय उद्यान, इटलीतील ‘सासी ऑप मटेरा’, पोलंडमधील ऐतिहासिक क्रकॉओ, इस्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानमधील इस्तंबुलची ऐतिहासिक ठिकाणे यांचाही यादीत समावेश आहे.
 6. देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे ‘ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ने जगभरातून युनेस्कोच्या सर्वोत्कृष्ट  सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.

ताजमहालविषयी थोडक्यात माहिती :-

 1. ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते.
 2. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले.
 3. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले.
 4. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले.
 5. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
 6. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.


Announcing the UN's 'World Economic Position and the Probability 2018' report

संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्यता 2018’ अहवाल प्रसिद्ध केला आहे.

 

भारत:-

 1. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वर्ष 2017 मध्ये 6.7% आहे, तर वर्ष 2018 मध्ये 7.2% आणि वर्ष 2019 मध्ये 7.4% इतका असेल.
 2. भारतामधील महागाई दर वर्ष 2018 मध्ये 4.5% तर वर्ष 2019 मध्ये 4.8% राहील असा अंदाज आहे. RBI ने 6 डिसेंबरला आपल्या आथिर्क दराच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा अंदाज किरकोळ प्रमाणात 4.3-4.7% एवढा वाढविला होता.
 3. काही औद्योगिक क्षेत्रांत कमी क्षमतेचा उपयोग आणि बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तुटपुंज्या समस्या या भारतीय अर्थव्यवस्थेला भेडसावणार्‍या अडचणी आहेत, तर पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक गुंतवणूकीने एकंदर गुंतवणूकीत वाढ करण्यास प्राधान्य दिले आहे.

जागतिक:-

 1. जागतिक अर्थव्यवस्था आता मजबूत झाली आहे. वर्ष 2017 मध्ये, जागतिक आर्थिक वृद्धीदर 3% असा राहिला आहे, जी की 2011 सालापासूनची सर्वाधिक वाढ आहे आणि आगामी वर्षांमध्ये ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
 2. वर्ष 2017 ते वर्ष 2019 या दरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सरासरी 3% वार्षिक इतका राहण्याचा अंदाज आहे.
 3. वर्ष 2016 च्या तुलनेत जगभरातील दोन-तृतीयांश देशांमध्ये वर्ष 2017 मध्ये मजबूत वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये जागतिक आर्थिक हालचालीमधील वाढीच्या सुमारे 60% वाटा सकल निश्चित भांडवल निर्मितीचा आहे.
 4. वाढती मालमत्तेची किंमत, अपवादात्मकपणे कमी अस्थिरता आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे वाहती पोर्टफोलिओमधील पुनबांधणी अश्या बाबींसह जागतिक वित्तीय परिस्थिती 2017 साली सौम्य होती.
 5. सर्व विकसनशील क्षेत्रांमध्ये 2011 सालानंतर प्रथमच वर्ष 2017 मध्ये सकारात्मक श्रनिक उत्पादनक्षम वाढीची नोंद अपेक्षित आहे.
 6. जागतिक आर्थिक संकटानंतर प्रथमच जागतिक व्यापारामध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे, जी की मुख्यतः पूर्व आशियामधील मजबूत आयात मागणीमुळे चालविली जात आहे.
 7. सर्व नवीन प्रस्थापित ऊर्जा क्षमतेत नविकरणीय ऊर्जेचा अर्ध्यापेक्षा अधिक वाटा आहे, परंतु केवळ जागतिक ऊर्जा उत्पादनाच्या 11.3% इतकेच आहे.
 8. आंतरराष्ट्रीय नौवहन व विमानचालन क्षेत्रातून उत्सर्जन दूषित वायू वाढतच गेले आहे आणि ते हवामान बदलासंबंधी पॅरिस कराराच्या कक्षेच्या बाहेर आहेत. 
 9. वर्ष 2017 मध्ये सर्वाधिक तेजीत चीनचा 6.8% वृद्धीदर आहे, जी सहा वर्षांतली वार्षिक वाढीमधील पहिलीच घटना आहे.
 10. पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि पूर्व आफ्रिका या क्षेत्रात वर्ष 2018 आणि वर्ष 2019 मध्ये 5% पेक्षा जास्त वार्षिक वृद्धीदर कायम असेल.
 11. वर्ष 2017 मध्ये पूर्व आणि दक्षिण आशिया येथील वाढ ही जागतिक स्तराच्या तुलनेत जवळजवळ निम्मी आहे.
 12. पश्चिम आशियाची संभावना तेल बाजारपेठेच्या विकासामुळे आणि भौगोलिक-राजकीय कारकांमुळे चिंतेत राहिली आहे.
 13. सुधारित जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे, आता देशांना कमी कार्बन उत्सर्जनाने आर्थिक वाढ, कमी असमानता, आर्थिक विविधता आणि विकासातील अडथळ्यांना दूर करणे अश्या दीर्घकालीन समस्यांवर केंद्रित धोरण तयार करण्यासाठी संधी मिळत आहे.
 14. याशिवाय गुंतवणूक परिस्थितीत सुधारणा झाली आहे तसेच वर्ष 2017 मध्ये जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये दाद देण्याजोगी लवचिकता आली आहे.


Establishment of Action Team from Government for review of Income Tax Law

 1. वस्तू आणि सेवा कर- जीएसटीच्या रूपाने अप्रत्यक्ष कराच्या व्यवस्थेत सुधारणा केली गेली असताना, आता सरकार प्रत्यक्ष करातील सुधारणेकडेही वळलेली आहे.
 2. म्हणुन सरकारने प्राप्तिकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी  समितीची घोषणा केली आहे.
 3.  ५० वर्षे जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सरकारने समितीची घोषणा केली आहे.
 4. सदस्य संख्या :- सहा.
 5. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य (विधान) अरबिंद मोदी हे निमंत्रक असतील.
 6. अन्य सदस्यांमध्ये गिरीश आहुजा (सनदी लेखाकार), राजीव मेमानी (‘ईवाय’चे अध्यक्ष) आणि मानसी केडिया (सल्लागार, आयसीआरआयईआर) यांचा समावेश असेल.
 7. या व्यतिरिक्त देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन हे समितीचे कायम विशेष निमंत्रित सदस्य असतील.
 8.  या कृतिदलाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 
 9. विविध देशांमधील प्रचलित प्रत्यक्ष करप्रणाली, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धती आणि देशाच्या आर्थिक गरजा या पैलूंना ध्यानात घेऊन कृती दलाला नव्या प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


A new form of 'exacytium' was discovered

 1. ‘एक्ससायटोनियम’ चा सिद्धांत मांडल्यानंतर जवळजवळ 50 वर्षानंतर शास्त्रज्ञांना याप्रकारचे पदार्थाचे नवे स्वरूप अस्तित्वात असल्याचे सिद्ध करता आले आहे.
 2. ‘एक्ससायटोनियम’ हे मॅक्रोस्कोपीक क्वांटम स्वरूपाचा स्वभाव दर्शवते, म्हणजेच एखाद्या सुपरकंडक्टर प्रमाणे आपले गुणधर्म दर्शवते आणि हे ‘एक्ससायटन्स’ पासून बनलेले असते.
 3. ‘एक्ससायटन्स’ म्हणजे असे कण जे अगदी विचित्र क्वांटम मेकॅनिकल पेयरींगमधून बनलेले असतात.
 4. 1960 च्या दशकात हार्वर्डचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ बर्ट हॅल्पएरिन यांनी सर्वप्रथम ‘एक्ससायटोनियम’ ही संज्ञा जगापुढे मांडली होती.
 5. तेव्हापासून शास्त्रज्ञ त्याचे अस्तित्व शोधण्यास मागे लागले होते.
 6. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि इलिनॉय विद्यापीठ येथील संशोधकांनी एका ट्रांजिशन धातूच्या ‘डायकॅल्कोजेनाईड टिटॅनियम डायसेलेनाईड (1T-TiSe2)’ नामक नॉन-डोप्ड क्रिस्टलचा अभ्यास केला.
 7. संशोधकांनी अभ्यासासाठी ‘मोमेंटम रिजोलव्ह इलेक्ट्रॉन एनर्जी-लॉस स्पेक्ट्रोस्कोपी (M-EELS) नावाचे अभिनव तंत्र वापरले. 
 8. या नवीन तंत्रामुळे, कमी ऊर्जा असलेले बोसोनिक कण (इलेक्ट्रॉन आणि होल्स यांची जोडी) च्या सामूहिक उत्तेजनाला मोजण्यासाठी संशोधक सक्षम झालेत.
 9. या शोधामुळे पुढील क्वांटम मेकॅनिक्स संबंधीची रहस्ये जाणून घेण्यास मदत होणार आहे.


In Nepal, opposition parties won two-thirds of the parliamentary elections

 1. नेपाळमध्ये संसदेच्या खालच्या सभागृहातील सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत 165 मतदारसंघापैकी डाव्या आघाडीने 113 जागा जिंकल्या आहेत.
 2. तसेच सभागृहात सत्ताधारी नेपाळी कॉंग्रेस पक्षाला फक्त 21 जागा मिळाल्या.
 3. तर राष्ट्रीय जनता पक्ष (नेपाळ) ने 11 आणि संघिया समाजवादी फोरम (नेपाळ) ने 10 जागा मिळवल्या. 
 4. याशिवाय आतापर्यंत 330 जागांपैकी 323 जागा सात प्रांतीय विधानसभा निर्वाचित झाल्या आहेत. 
 5. CPN (UML) आणि CPN (माईस्ट सेंटर) च्या डाव्या आघाडीने 235 जागा मिळवल्या आहेत.
 6. तर नेपाळी कॉंग्रेस पक्षाने 40 आणि इतरांनी 48 जागांवर विजय मिळविला आहे.
 7. नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वबाजुने भूमिने वेढलेला मध्यवर्ती हिमालयी देश आणि भारताचा शेजारी आहे.
 8. या देशाची काठमांडू ही राजधानी असून देशाचे चलन नेपाळी रुपया हे आहे.
 9. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बिध्या देवी भंडारी या आहेत.


Top