India's 'Namami Gange' initiative got 'Public Water Agency of the Year' book

 1. दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी लंडन (ब्रिटन) या शहरात झालेल्या ‘जागतिक जल शिखर परिषद 2019’ येथे जागतिक जल पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
 2. ‘ग्लोबल वॉटर इंटेलिजेंस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) (ऊर्फ ‘नमामि गंगे’) या पुढाकाराला 'पब्लिक वॉटर एजन्सी ऑफ द इयर' हा किताब देण्यात आला आहे.
 3. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय जल उद्योगातल्या उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी तसेच पाणी, सांडपाणी व खार्‍या पाण्याचे रूपांतरण अशा क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांना पुरस्कृत करण्यासाठी दिला गेला.
 4. अभियानाविषयी:-
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये ‘नमामि गंगे’ अभियानाची सुरुवात केली.
  2. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) द्वारा चालवले जात आहे. 
  3. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे.
  4. यात नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा तसेच घाट आणि श्मशान जागांचे निर्माण अशी कार्ये चालवली जात आहेत. 


Indian Navy's first visual strength center was set up in Delhi

 1. नवी दिल्लीत दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी पहिलेच अत्याधुनिक व्हिज्युअल रिॲलिटी सेंटर (म्हणजेच आभासी वास्तव केंद्र) याचे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी उद्‌घाटन केले.
 2. भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका संरचना क्षमतांना त्यामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
 3. नौदल संरचना महासंचालनालय 1960 साली सुरू करण्यात आले.
 4. तेव्हापासून युद्धनौका संरचना आणि निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने युद्धनौका संरचना क्षमतेत महासंचालनालयाने मोलाचे योगदान दिले आहे.
 5. भारतीय नौदल:-
  1. भारतीय नौदलाच्या स्थापनेची सुरूवात 1934 साली ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलापासून झाली. भारतीय नौदल हे जगातले पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.
  2. 1971 सालाच्या भारत-पाकिस्तान युद्धामधील नौदलाच्या कामगिरीला स्मरणात ठेवत दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
  3. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची ‘INS अरिहंत’ ही पहिली अणू पाणबुडी सामील करण्यात आली.


World's third largest stock market became Hong Kong behind Japan

 1. जपानला मागे टाकत हाँगकाँग हे एकूण मूल्याच्या बाबतीत जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट म्हणून तयार झाले आहे.
 2. तर अमेरिका आणि चीन (मुख्य भूभाग) हे जगातल्या सर्वात मोठ्या स्टॉक मार्केटच्या यादीत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी आहे.
 3. संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगचे एकूण भागभांडवल 5.78 लक्ष कोटी डॉलर तर जपानचे भागभांडवल 5.76 लक्ष कोटी डॉलर होते.


India will run a campaign to promote the sale of coffee

 1. जागतिक कॉफी उत्पादक मंचाने (WCPF) कॉफी विकत घेणार्‍या जगभरातल्या देशांमध्ये पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. भारत सरकार जागतिक कॉफी उत्पादकांच्यावतीने कॉफीच्या वापरासंदर्भात मोहिमेची योजना तयार करणार आहे.
 3. 2020 सालाच्या मध्यकाळापर्यंत ही मोहीम भारतात चालविण्यास सुरूवात केली जाईल.
 4. मोहिमेचे स्वरूप:-
  1. या मोहिमेमधून भारतातल्या सुमारे 450 दशलक्ष लोकांपर्यंत पोहचले जाणार.
  2. 50 पेक्षा अधिक देशांमध्ये विविध कॉफी प्रकल्प चालविणारे कार्लोस ब्रँडो भारताच्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होतील.
  3. योजनेनुसार ब्राझील, कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशांमधून भारतात कॉफीची अतिरिक्त आयात केली जाणार आणि भारत सरकार कॉफीवर असलेला 105% एवढा आयात कर माफ केला जाणार.
 5. कॉफी बाजारपेठ:-
  1. जागतिक बाजारपेठेत कॉफीच्या किंमती पडल्याने आणि मजुरीवरील खर्च वाढल्याने कॉफी उत्पादकांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
  2. आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेनुसार (ICO) जगभरातल्या 60 देशांमध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते आणि त्यात 25 दशलक्ष शेतकरी गुंतलेले आहेत.
  3. भारतात 3 लक्षाहून जास्त कॉफी उत्पादक आहेत. त्यापैकी 90% पेक्षा जास्त उत्पादक लघु भू-धारक आहेत आणि त्यांना कॉफी कमी किंमतीत विकावी लागत आहे.
  4. या परिस्थितीमुळे कॉफी उत्पादक व त्यांचे कुटुंब कर्जात बुडत आहेत आणि त्यांना शेती सोडून शहराकडे वळावे लागत आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.