daily uses 328 medicine ban

 1. ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने दैनंदिन वापरातील ३२८ औषधांच्या उत्पादन, विक्री किंवा वितरणावर बंदी घातली आहे.
 2. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
 3. आजार लवकर बरा व्हावा यासाठी अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
 4. औषधे आणि सौंदर्य प्रसाधन सामग्री अधिनियम १९४०च्या कलम २६-ए अंतर्गत एफडीसीच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.
 5. या निर्णयामुळे एबॉट, पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे.
 6. या औषधांचा भारतातील व्यवसाय ३८०० कोटी रूपयांचा आहे. भारताच्या फार्मा सेक्टरच्या तीन टक्के हा व्यवसाय आहे.
 7. एफडीसीजवर बंदी घातल्यास देशातील १ लाख रुपयांच्या औषध बाजारात सुमारे २ टक्के म्हणजेच २००० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
 8. अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसीवर बंदी आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये ही औषधे विकली जात आहे.
 9. भारतातील पुद्दुचेरी हे असे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने या औषधावर बंदी घातली आहे.
 10. देशात अजूनही अनेक इतर एफडीसी औषधे विकली जात आहेत. सरकार आणखी ५०० अशा औषधांवर बंदी आणण्याची शक्यता आहे.
 11. प्रतिबंधित औषधे: डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल, विक्स ॲक्शन ५००, पेन किलर, कोरेक्स, जिंटाप, सुमो, जीरोडॉल, मधुमेह आणि हृदय रोगावरील औषधे.

एफडीसी म्हणजे काय?

 • दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून जी औषधे तयार केली जातात त्यांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अथवा एफडीसी म्हंटले जाते.
 • ही औषधे शक्तिशाली प्रतिजैविकांचे (अँटीबायोटिक्स) मिश्रण म्हणून बाजारात विकली जातात.
 • देशातील हजारो एफडीसी औषधे तयार केली जातात आणि त्यापैकी अनेक औषधे परवानगीशिवाय तयार केली जातात. यामध्ये मुख्यत्वे वेदनाशामक औषधांचा समावेश आहे.
 • मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर शरीरासाठी धोकादायक आहे, त्यामुळे सरकारने या औषधांवर बंदी घातली आहे.
 • प्रतिजैविकंच्या अतिवापरामुळे चेतासंस्थेवर परिणाम होतो. तसेच ते यकृतासाठीही हानिकारक आहे. यामुळे ह्रदयविकाराचा धोकादेखील वाढतो.

पार्श्वभूमी

 • औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत मार्च २०१६मध्ये अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
 • मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली.


hockey player sardar singh declared retirement

 1. भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणारा दिग्गज खेळाडूसरदार सिंग याने १२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली.
 2. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सरदारसिंगलाही आपली छाप पाडता आली नाही.
 3. वय आता सरदार सिंगच्या बाजूने नाही. त्याचबरोबर हॉकीसाठी लागणारा वेगही आता तो राखू शकत नाही, म्हणूनही सरदारसिंग टीकेचा धनी ठरला होता. यामुळे त्याने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला.

सरदारसिंग...

 • २००६मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीद्वारे आंतरराष्ट्रीय हॉकीत पदार्पण केले.
 • ३५० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
 • २००८ ते २०१६ असे ८ वर्षे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार होता.
 • भारताचे नेतृत्व करणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला होता.
 • २०१२मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने, तर २०१५मध्ये पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे.
 • दोन ऑलिंपिकमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
 • भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेने सरदारवर बलात्काराचा आरोप केल्याने त्याच्या कारकिर्दीला वादाचे गालबोटही लागले होते. याप्रकरणी लुधियाना पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला क्लीन चिट दिली.


retired ST Staff will get free traveling in buses

 1. राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) निवृत्त कर्मचाऱ्यांना अखेर मोफत प्रवासाचा पास देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
 2. यामुळे राज्यातील 25 हजार निवृत्तांना वर्षातून सहा महिने सपत्नीक मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.
 3. एसटीच्या दरवर्षी निवृत्त होणाऱ्या चार हजार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
 4. कुटुंबासह धार्मिक पर्यटन करण्याची कर्मचाऱ्यांची इच्छा असते. त्यांची ही मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे.
 5. ऐन उमेदीच्या काळात एसटीची सेवा करणाऱ्यांचा निवृत्तीचा काळ वर्षातून सहा महिने सपत्नीक मोफत प्रवासाने आनंदात जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


pradhan mantri food donar i defence mission

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे.
 2. सरकारच्या शेतकरी कल्याण उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि अन्नदात्याप्रति कटिबद्धता लक्षात घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
 3. २०१८च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 4. शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देणे व त्यायोगे शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२पर्यंत दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
 5. पीएम-आशाचे घटक:

मूल्य समर्थन योजना

किमान मूल्य भरणा योजना

प्रायोगिक खासगी खरेदी आणि साठवणूक योजना

गहू, तांदूळ आणि अन्य धान्ये खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या, तसेच कापूस आणि ज्यूटसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना, शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील.

खर्च:

 • मंत्रिमंडळाने शेतमाल खरेदीच्या या नव्या पद्धतीस मंजुरी देताना केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या हमी रकमेत १६,५५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे एकूण हमी रक्कम ४५,५५० कोटी रुपये झाली आहे.
 • शेतमाल खरेदीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढविण्यात आली असून या योजनेसाठी वेगळे १५,०५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


india & malta has sign agreement about tourism

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि माल्टा यांच्यात सामंजस्य कराराला मंजुरी दिली.
 2. माल्टाच्या उपराष्ट्रपतींच्या आगामी दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
 3. या सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्ट्ये:
  1. उभय देशांदरम्यान पर्यटन उद्योगातील दर्जेदार ठिकाणांना प्रसिद्धी मिळवून देणे.
  2. दोन्ही देशांमध्ये जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणे.
  3. पर्यटनात मनुष्यबळ विकास तसेच दोन्ही देशातील प्रवाससंबंधी उद्योगांना प्रोत्साहित करणे.
  4. नैसर्गिक तसेच मूर्त अथवा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून पर्यटन सादरीकरण करणे.
  5. शाश्वत पर्यटन विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  6. उभय देशांच्या जनतेमधील संबंध दृढ करण्याचा उपाय म्हणून पर्यटनाला मान्यता देणे.
 4. या सामंजस्य कराराचे फायदे:
  1. या करारामुळॆ पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करण्यात उभय देशांना मदत मिळेल.
  2. यामुळे भारतात माल्टाहून येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यात मदत होईल. त्यामुळे आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधीत वाढ होईल.
  3. या करारामुळे सहकार्याच्या व्यापक क्षेत्रात सर्व संबंधितांच्या परस्पर लाभासाठी दीर्घकालीन पर्यंटन सहकार्यासाठी पूरक वातावरण तयार होईल.


Top