Environment Ministry's 'Strengthening Forest Fire Management in India' report

 1. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘स्ट्रेन्दनिंग फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट इन इंडिया’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. या अहवालात लोकसहभागाने वणवा संदर्भात व्यवस्थापनाविषयी शिफारसी सुचविलेल्या आहेत.
 3. देशाच्या इतिहासात प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे.
 4. वनातील वणवा रोखून वनसंपत्तीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने यात शिफारसी केल्या आहेत. वणव्यामुळे उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड (CO2) हे वैश्विक उष्णतेसाठी कारणीभूत ठरते.
 5. देशात लागणार्‍या वणव्याच्या 47% भाग 20 जिल्ह्यांमध्ये असमान रीतीने दिसून येतो.
 6. काही शिफारसी:–
  1. स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता ‘राष्ट्रीय वणवा रोधक व्यवस्थापन योजना’ तयार करणे.
  2. ही योजना वेळबद्ध प्रक्रियेतून सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकसहभागातून अंमलात आणणे.
  3. यात वणवा रोखण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित कार्यदल तयार केले जाणार आणि वणव्याशी लढण्यासाठी विविध पद्धती सरावात आणल्या जाणार.
  4. मंत्रालय, राज्य वन विभाग, समुदाय आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्या भूमिका आणि जबाबदार्‍या ठरवणे.
  5. ज्ञानामधील अंतर भरून काढण्यासाठी सुधारीत माहितीच्या मदतीने आणि संशोधन करून वणवा-रोधी व्यवस्थापनात मदत देणे आवश्यक आहे.
  6. व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय संशोधनासाठी विषय परिभाषित करणे आणि या क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनासाठी निधी संकलनाच्या संधी प्रदान करणे.


By 2023 Mumbai's famous 'Double Decker' bus service will be closed

 1. मुंबईचे आकर्षण ठरणारी ‘डबल डेकर’ बस इतिहासजमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. ऑक्टोबर 2023 पर्यंत ही बससेवा बंद केली जाणार आहे.
 3. सन 1937 मध्ये ‘डबल डेकर’ बससेवा लोकप्रिय बनल्या होत्या.
 4. सन 1947-48 या कालावधीत सुरुवातीला मुंबईत 141 डबल डेकर बस धावत होत्या.
 5. आणखी खरेदी केल्यानंतर सन 1993 पर्यंत या बसेसची संख्या 882 पर्यंत पोहोचली होती.
 6. सद्यस्थितीत केवळ 120 बस सेवेत आहेत. त्यापैकी डिसेंबर 2020 पर्यंत 72 बस बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 48 बस ऑक्टोबर 2023 पर्यंतच सुरू राहतील.
 7. वर्तमानात उपयोगात असलेल्या बसच्या तुलनेत या बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च आणि मुंबईच्या रस्त्यांवरील अपुरी जागा, यामुळे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय बृहमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रान्सस्पोर्टने (BEST) घेतला आहे.


Modern technologies like 'Dudhari' sword for developing countries: United Nations

 1. संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’ (WESS 2018) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 2. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते विजेवर चालणार्‍या वाहनापर्यंतचे सर्व आधुनिक तंत्रज्ञान 'दुधारी’ तलवारीप्रमाणे असू शकते, असे म्हटले गेले आहे.
 3. अन्य ठळक बाबी:-
  1. नव्या तंत्रज्ञानाला नियमित करण्यासाठी प्रभावी धोरणे आखणे अनिवार्य आहे. योग्य धोरणाशिवाय, निश्चित केलेले शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यात विद्यमान असमानता वाढण्याचा धोका आहे.
  2. अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि कार्यक्षम ऊर्जा साठवण प्रणालींमुळे ऊर्जा क्षेत्र अधिक शाश्वत बनत चालले आहे.
  3. सर्वाधिक संवेदनशील असणार्‍यांसाठी औषधे प्राप्त करण्यासाठी उपलब्धता वाढविली जात आहे आणि विकसनशील देशांतील लक्षावधी लोकांना त्यांच्या मोबाइल फोनद्वारे कमी किंमतीच्या आर्थिक सेवा उपलब्ध आहेत.


Ajit Kumar Doval: new chairman of Strategic Policy Group (SPG)

 1. राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींबद्दल पंतप्रधानांना सल्ला देणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना केली आहे.
 2. गटाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित कुमार डोवाल यांच्याकडे असेल.
 3. NITI आयोगाचे उपाध्यक्ष, कॅबिनेट सचिव, तीनही संरक्षण दलांचे प्रमुख, RBI गव्हर्नर, परराष्ट्र सचिव, गृह सचिव, वित्त सचिव व संरक्षण सचिव हे गटाचे अन्य सदस्य आहेत.
 4. विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी 1999 साली स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडे SPGचे अध्यक्षपद असायचे.
 5. सरकारमधील हे सर्वात वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात. मात्र, नव्या अधिसुचनेनुसार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या गटाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 6. दरम्यान, यापूर्वी SPGमध्ये 16 सदस्य होते. ज्यांची संख्या वाढवून आता 18 करण्यात आली आहे.


Top