1. आशियाई – पॅसिफीक इकाॅनाॅमिक काॅर्परेशन (APEC) परिषद व्हिएतनामधील ना दांग येथे नुकतीच पार पडली आहे.
 2. ’Creating New Dynamism, Fostering a Shared Future’ ही या परिषदेची थीम होती.
 3. पॅसिफीक रिम देशातील २१ नेते या परिषदेला उपस्थित होते.. परिषदेच्या शेवटी 21 सदस्य देशांच्या नेत्यांनी ‘दा नांग घोषणापत्र’ जाहीर करण्यात आले.
 4. व्हिएतनाममध्ये APEC परिषद आयोजनाची ही दुसरी वेळ होती. या अगोदर सन २००६ साली आयोजन करण्यात आले होते.
 5. पुढल्या वर्षी या परिषदेचे आयोजन पापुआ न्यू गिनी येथे होणार आहे.
 • APEC शिखर परिषद 2017: दा नांग घोषणापत्र जाहीर
 1. ‘दा नांग घोषणापत्र’ आशिया-प्रशांत प्रदेशात स्थायी आर्थिक वृद्धी आणि समृद्धीचे समर्थन करणार्‍या APEC च्या मोहिमेसंदर्भात नेत्यांच्या दीर्घकालीन बांधिलकीची पुष्टी करीत आहे.
 2. विकासाच्या दृष्टीने आव्हानांना हाताळण्यासाठी एकत्र कार्य करण्यासाठी ओळखण्यात आलेल्या विषयांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो–
 3. नाविन्यपूर्ण वृद्धी, समावेशक आणि शाश्वत रोजगाराला प्रोत्साहन देणे.
 4. प्रादेशिक आर्थिक एकात्मतेसाठी प्रोत्साहन देणार्‍या नवीन बाबींना तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची क्षमता आणि अभिनवता बळकट करणे.
 5. हवामान बदलासंदर्भात अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि सामायिक भविष्याला अंगिकारणे.
 6. APEC सदस्यांना अधिक चांगले रोजगार वातावरण आणि श्रमिक बाजारपेठ तयार करण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षणाची गुणवत्ता वर्धित करणे आणि कौशल्याने प्रादेशिक कामगारांना सुसज्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.
 7. प्रादेशिक दुवे आणि कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी APEC अर्थव्यवस्थेच्या मोहिमेचे उद्दिष्ट असलेल्या मुक्त आणि खुल्या व्यापारासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार.
 8. आशिया-प्रशांत मुक्त व्यापार क्षेत्राच्या (FTAAP) निर्मितीच्या दिशेने प्रयत्न म्हणून पूर्वी निश्चित केलेले ‘बोगोर ध्येय’ गाठणे.


 1. सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराने यंदा सर्वाधिक वाहनांचे शहर, असा लौकीक मिळविला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या महानगरांपेक्षाही पुण्यामध्ये नवीन वाहनांची अधिक भर पडत आहे. एवढेच नाही, तर या वर्षात आतापर्यंत देशात सर्वाधिक नव्या वाहनांची नोंदणी पुण्यात झाली आहे.
 2. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज ‘परिवहन’ या एकाच वेबपोर्टल आणि ‘वाहन ४’ या प्रणालीद्वारे केले जात आहे.
 3. देशातील २३ राज्यांच्या परिवहन विभागांचा यामध्ये समावेश आहे. या २३ राज्यांत एक जानेवारी ते तीन नोव्हेंबर या कालावधीत ८१ लाख ७८ हजार ८२४ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक वाहन नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे.
 4. महाराष्ट्रात आतापर्यंत २० लाख चार हजार ४८४ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्या पाठोपाठ गुजरातमध्ये १३ लाख आठ हजार ७८२, पश्चिम बंगालमध्ये आठ लाख ४१ हजार २५३, हरियाणामध्ये सहा लाख सात हजार ८६०, दिल्लीला पाच लाख ५८ हजार, उत्तर प्रदेशात पाच लाख ६२ हजार २०७, राजस्थानमध्ये पाच लाख ४१ हजार आणि झारखंडमध्ये चार लाख ५५ हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, अद्यापही काही राज्यांमध्ये पूर्णतः किंवा काही आरटीओ कार्यालयांमध्ये ‘वाहन ४’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या वाहन नोंदणीचा यामध्ये समावेश नाही.
 5. ‘वाहन ४’ नोंदणी अहवालामध्ये आरटीओ कार्यालयनिहाय माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक दोन लाख २१ हजार ९८० वाहनांची नोंदणी झाली आहे. अहमदाबाद आरटीओ एक लाख ६५ हजार ६२४, सुरत आरटीओ एक लाख ६२ हजार ९६ आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एक लाख १८ हजार ८७८ वाहनांची नोंदणी झाली आहे.


 1. आशियाई परिषदेत एकूण ११ देश सदस्य आहेत. या परिषदेत विविध मुद्यावर चर्चा केली जाते. आणि प्रामुख्याने व्यवसाय व राष्ट्रविकास यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येतात.
 2. सदस्य देश – इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, पूर्व तिमोर.
 3. दक्षिण आशियाई परिषदेची पहिली बैठक इंडोनेशिया मधील बाली येथे १९७६ रोजी घेण्यात आले होते.
 4. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १५ व्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या [आशियन] भारत शिखर परिषदेसाठी आणि १२ व्या ईस्ट आशिया परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी  फिलिपाइन्सला रवाना झाले.
 5. दोन्ही परिषदेत अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बैठक महत्वाची होणार आहे. तीन दिवसीय या परिषदेत आशियानच्या व्यवसायात आणि गुंतवणुकीसाठी चर्चा करतील.
 6. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोडिनो डुपरटे हे मोदींशी चर्चा करतील. सध्या रोडिनो हे आशियानचे अध्यक्ष आहेत.
 7. आशियानच्या त्यावेळेसच्या परिषदेला ५० वे वर्धापन याच्यानिमित्त रोडिओ यांच्यातर्फे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
 8. भा रत, अमेरिका, जापान, व ऑस्ट्रेलिया यांचा एक संयुक्त गट तयार करण्याच्या प्रस्तावानंतर दोघांमधील हि पहिलीच बैठक असेल.
 9. आशियान राष्ट्रासोबत भारताचा व्यापार हा इतर देशांच्या तुलनेत १० टक्क्याहून अधिक आहे. मनिला येथे प्रादेशिक परिषद होणार असून यात मोदीजी भारतासोबत व्यापार वाढविण्यावर भर देतील.


Top