Tamilnadu is the most industrialized states: RBI

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2018-19' या दस्तऐवजाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 2. त्यानुसार, 2016-17 या वित्त वर्षापर्यंतच्या काळात देशातल्या एकूण कारखान्यांच्या संख्येच्या 15.84% कारखाने तामिळनाडू राज्यात असून तो त्यासंदर्भात अग्रस्थानी आहे.
 3. तामिळनाडूच्या पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश अश्या राज्यांचा क्रम लागतो आहे.
 4. अहवालानुसार -
  1. तामिळनाडू सर्वाधिक औद्योगिक राज्य ठरला. राज्यात 2016-17 या वित्त वर्षापर्यंत 37220 कारखाने कार्यरत होते.
  2. गुंतवणुकीचे भांडवल आणि उत्पादक भांडवल याच्यासंदर्भात, गुजरात अग्रस्थानी असून त्याच्यापाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर आहे.
  3. अंदमान व निकोबार 18 कारखान्यांसह सर्वात कमी कारखाने असलेला किमान औद्योगिक राज्य ठरला. त्याच्याआधी सिक्कीम (71), मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
  4. भारतातला सर्वात प्रदूषित शहर ठरलेल्या दिल्लीत 3507 कारखाने होते.


Dr. A. Of Mohanty: new director of Bhabha Atomic Research Center

 1. दिनांक 12 मार्च 2019 रोजी भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ. अजित कुमार मोहंती यांनी स्वीकारली.
 2. डॉ. मोहंती एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक आहेत.
 3. त्यांच्या 36 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.
 4. BARC:-
  1. भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) या संस्थेची दिनांक 3 जानेवारी 1954 रोजी अटॉमिक एनर्जी इस्टेब्लिशमेंट, ट्रॉम्बे (AEET) या नावाने स्थापना झाली.
  2. पुढे 1966 साली भाभा यांच्या मृत्यूनंतर, दिनांक 22 जानेवारी 1967 रोजी केंद्राचे वर्तमान नावाने नामकरण करण्यात आले.
  3. ही भारतातली प्रमुख अणू संशोधन विषयक सुविधा आहे. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे.
  4. डॉ. होमी जे. भाभा त्याचे संस्थापक मानले जातात.
  5. भारताचे पहिले-वहिले पॉवर रिएक्टर ‘तारापूर अणू वीज केंद्र’ येथे अमेरिकेच्या मदतीने स्थापन करण्यात आले.


World day against cyber censorship: March 12

 1. दरवर्षी 12 मार्च या दिवशी ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ (World Day Against Cyber Censorship) पाळला जातो, जो दरवर्षी आयोजित केला जाणारा एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे.
 2. सबंध आणि मुक्त इंटरनेट या संकल्पनेला समर्थन देणारी ही चळवळ सर्वांना मुक्त इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने चालविण्यात आली आहे.
 3. तसेच जगभरातल्या सरकारांकडून भाष्य-स्वातंत्र्यावर लादल्या जाणार्‍या बंधनाच्या प्रश्नाला संबोधित करण्यासाठी हा दिन पाळला जातो.
 4. दिनाविषयी:-
  1. रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (पॅरिसची आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था) आणि अॅमेनिस्टी इंटरनॅशनल या संस्थांच्या विनंतीवरून दिनांक 12 मार्च 2008 रोजी पहिल्यांदा ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ पाळला गेला होता.
  2. हा आता रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्या नेतृत्वात आयोजित केला जाणारा एक वार्षिक जागतिक कार्यक्रम बनला आहे.
  3. 2010 साली रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स तर्फे ‘नेटिझन पारितोषिक’ देण्याचे सुरू करण्यात आले.
  4. जो ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यात उत्कृष्ट योगदान देणारा इंटरनेट वापरकर्ता/ब्लॉगर/व्यक्ती/गट यांना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे.


On the way to shut down their immigration service offices outside the US

 1. संयुक्त राज्ये अमेरिकेच्या सरकारने देशाबाहेर कार्यरत असलेली त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे.
 2. अमेरिकेच्या सिटिजनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या विभागाने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, सरकार 20 देशांमधील त्यांची कार्यालये बंद करण्यासंबंधीच्या चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यावर आहे.
 3. देशांतर्गत प्रश्नांना संबोधित करण्यासाठी आणि त्यामधून वर्षभरात लाखो डॉलर्सची रक्कम बचत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
 4. सद्यस्थितीत ब्रिटन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इटली, भारत, फिलीपिन्स, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकेची इमिग्रेशन सेवा कार्यालये असून तिथे जवळपास 70 कर्मचारी कार्यरत आहेत.
 5. संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे.
 6. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे.
 7. यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.