The Prime Minister announced the research and development campaign in the field of solar technology

 1. फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या सहअध्यक्षतेत नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची प्रथम स्थापना परिषद पार पडली.
 2. परिषदेत पंतप्रधानांनी दस सूत्री कार्यायोजना प्रस्तुत केली.
 3. यामध्ये सर्व देशांसाठी स्वस्त सौर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, वीज उत्पादनात फोटोव्होल्टाइक सेल निर्मित ऊर्जेची भागीदारी वाढवणे आणि नियम व मानक तयार करणे, बँक कर्ज पात्र सौर प्रकल्पांसाठी सल्ला देणे आणि विशिषज्ञ केंद्रांचे जाळे तयार करणे समाविष्ट आहे.
 4. याप्रसंगी, पंतप्रधानांनी सौर तंत्रज्ञान अभियान (solar technology mission) याची घोषणा केली. भारत सौर तंत्रज्ञान क्षेत्रातली तफावत भरून काढण्यासाठी ‘सौर तंत्रज्ञान अभियान’ सुरू करणार आहे. सौर तंत्रज्ञान अभियान या क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे नेतृत्व करणार. अभियान देशातल्या सर्व शासकीय तांत्रिक आणि शैक्षणिक संस्थांसह सौर क्षेत्रात संशोधन व विकास कार्य चालविण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये नेतृत्‍व करणार आहे.
 5. परिषदेतील घोषणा:-
  1. ISA च्या सदस्य देशांसाठी 500 प्रशिक्षण शिबीर तयार केली जाणार आहे.
  2. सन 2030 पर्यंत 1 टेरावॉट (1,000 GW) सौर ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी एक लक्ष कोटी डॉलरची आवश्यकता भासणार आहे.
  3. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वित्त आणि नियम कायद्यांशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे.
  4. आतापर्यंत 121 देशांतील 61 जण युतीमध्ये सामील झाले आहेत आणि 32 देशांनी ISA च्या कार्यचौकटी कराराला मान्यता दिली आहे.
  5. याशिवाय भारताने जगभरात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी USD 1.4 अब्जची वचनबद्धता घोषित केली, जी की सौर ऊर्जा क्षेत्रातली जगातील सर्वात मोठी गुंतवणूक योजना असेल.
  6. यामधून 15 देशांतल्या 27 प्रकल्पांना वित्त पुरवठा केला जाईल. तर फ्रांसने कर्ज स्वरुपात 700 दशलक्ष युरोचे अतिरिक्त सहाय्य देण्यास वचनबद्ध झाले.
आंतरराष्ट्रीय सौर युती
 1. पार्श्वभूमी:-
 2. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
 3. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे.
 4. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.
 6. ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे.
 7. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि 48 देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.


West Bengal pioneer to implement MNREGA scheme

 1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA / मनरेगा) अंतर्गत रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यामध्ये पश्चिम बंगाल हा अग्रेसर राज्य ठरला आहे.
 2. आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सन 2017-18 मध्ये आतापर्यंत 28.21 कोटी कामकाज दिवस निर्माण झाले असून त्यासाठी 7,335.31 कोटी रुपये खर्च केले आहेत.
 3. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यांमध्ये तामिळनाडू (22.17 कोटी कामकाज दिवस) दुसर्‍या स्थानी तर आंध्रप्रदेश (18.16 कोटी कामकाज दिवस) तिसर्‍या स्थानी आहे.
 4. गोवा 94,000 कामकाज दिवसांसह यादीत तळाशी आहे आणि तत्पूर्वी गुजरात आणि उत्तरप्रदेश ही राज्ये आहेत.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 (आत्ताचे MGNREGA) हा एक भारतीय कामगार कायदा आहे आणि कामाचा अधिकार याची हमी देणारा सामाजिक सुरक्षा उपाय आहे.
 2. प्रत्येक कुटुंबाच्या प्रौढ सदस्याला अकुशल कामाकरिता दर आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचा रोजगार प्रदान करून ग्रामीण भागात उदरनिर्वाह भागवण्यासाठी सुरक्षा प्रदान करते.
 3. 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यांत या उपक्रमाला सुरुवात झाली.
 4. 1 एप्रिल 2008 पासून या उपक्रमात भारतामधील सर्व जिल्ह्यांना आणले गेले. 
 5. या कायद्यांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (MGNREGS) ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना रोजगाराची हमी दिली जाते आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.


The stored blood can be vulnerable to severely injured patients: research

 1. दीर्घकाळापासून साठवून ठेवलेले रक्त आघात झालेल्या वा मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेलेल्या गंभीर जखमी अवस्थेत रुग्णांसाठी असुरक्षित असू शकते, असा शोध एका अभ्यासात लागला आहे.  
 2. मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेलेल्या गंभीर रूपात जखमी असलेल्या रुग्णांसाठी साठवलेल्या रक्तांचा वापर केल्यास रक्ताभिसरणात शिथिलता आणण्यासोबतच गंभीर रूपाने प्रभावित अवयवांमध्ये सूज वाढवते आणि सोबतच फुफ्फूसाच्या संक्रमणाला वाढवू शकतो.
 3. संशोधकांना रूग्णांच्या शरीरात जुन्या साठवलेल्या रक्ताच्या लाल पेशींची संरचना आणि त्यानंतरच्या न्युमोनियाच्या जीवाणू यांच्यामध्ये संबंध आढळून आला आहे.
 4. शोधानुसार, ताज्या रक्ताच्या तुलनेत साठवलेल्या रक्ताच्या वापराने न्युमोनियाच्या जीवाणूमुळे होणार्‍या फुफ्फुसाच्या संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे
 5. तसेच फुफ्फुसामध्ये अत्यधिक प्रमाणात द्रव पदार्थ जमा होण्यासोबतच त्यामध्ये जिवाणुंच्या संख्येत देखील अधिक प्रमाणात वाढ होते.
 6. हा शोधाभ्यास PLOS मेडिसिन या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे.


Uttar Pradesh's largest solar photovoltaic project

 1. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे उद्घाटन व  लोकार्पण मिर्झापूर जिल्ह्यात छानवे गटात पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले.
 2. पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन व त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांचे येथे स्वागत केले.
 3. पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन यांनी एक कळ दाबून सौरप्रकल्पाचे उद्घाटन केले. ७५ मेगावॉटचा हा प्रकल्प आहे.
 4. त्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पात ५०० कोटी रुपये खर्च झाले असून फ्रान्सच्या एन्जी या कंपनीने तो उभारला आहे.
 5. विंध्य पर्वतराजीत दादर कलान खेडय़ातील उंचावरील भागात हा प्रकल्प असून त्याला ११८६०० सौर पट्टय़ा आहेत. एकूण ३८० एकर भागात तो पसरलेला आहे.
 6. यातील वीज उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये असलेल्या जिगना उपकेंद्रात सोडली जाईल.
 7. वार्षिक १५.६ कोटी युनिट विजेची निर्मिती त्यात होणार असून महिन्याला १.३० कोटी युनिट वीज निर्मिती होईल.
 8. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे आयएसएच्या परिषदेत काल मोदी यांनी असे सांगितले होते की, सौर प्रकल्पांना सवलतीच्या दरात आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे एकूण ऊर्जेत सौरऊर्जेचा वाटा वाढले.
 9. आयएसएची संकल्पना मोदी यांची असून त्यासाठी १२१ देश एकत्र आले आहेत. भारत त्यात २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे.
 10. सध्याच्या शाश्वत वीजनिर्मिती क्षमतेच्या हे प्रमाण  दुप्पट असणार आहे. त्यामुळे भारत युरोपीय समुदायाला मागे टाकील.
 11. भारताला २०१८ ते २०२२ दरम्यान ८३ अब्ज डॉलर्सचा निधी  १७५ गिगावॅट च्या वीज निर्मितीसाठी लागणार आहे.
 12. सध्या भारताची शाश्वत ऊर्जा क्षमता ६३ गिगावॅट  आहे. सौर व पवन ऊर्जेचे दर युनिटला २.४४ रुपये व ३.४६ रुपये इतके कमी आहेत,
 13. जगात हे दर सर्वात नीचांकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयएसए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॅरिस जाहीरनाम्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली होती.


 Veteran artist, Sadanand Chandekar passed away

 1. 'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन करणारे एकपात्री क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी  सदानंद चांदेकर यांचे डोंबिवलीत निधन झाले.
 2. आपल्या एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवले.
 3. 'आम्ही दिवटे' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
 4. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नाट्य परिषदेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे.
 5. गेल्या काही दिवसांपूर्वी ते डोंबिवलीमध्ये मुलाच्या घरी राहत होते. यावेळी ते घरात पडले.
 6. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील आल्याचे समजते. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 68 वर्षांचे होते.


Karnataka state flag unveiled

 1. कन्नड अस्मितेचे प्रतीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्याच्या ध्वजाचे ८ मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनावरण केले.
 2. यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 3. राज्य ध्वज बनवणारे कर्नाटक हे  देशातील पहिले राज्य ठरले आहे.
 4. पिवळा, पांढरा व लाल असा हा तिरंगा राज्यध्वज असून, मध्य भागातील पांढऱ्या रंगावर दोन शीर असलेल्या पौराणिक पक्ष्याची मुद्रा आहे.
 5. कर्नाटकच्या सर्व क्षेत्रांतील कन्नड मान्यवरांच्या सूचनांनुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे.


The Importance of Today's Day in History 13 march

महत्वाच्या घटना:-

 1. १९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
 2. १९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
 3. १९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
 4. १९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
 5. २००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

जन्म:-

जन्म
 1. १७३३: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)
 2. १८९३: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल१९८५)
 3. १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)
 4. १९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.

 

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)
 2. १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)
 3. १९६९: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
 4. १९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.
 5. १९९६: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)


Top