mp

  1. वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीवरुन तर्कवितर्क लावले जात असतानाच केंद्र सरकारने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून होणारच असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.
  2. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी जीएसटी कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. मात्र अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनीदेखील जीएसटीची अंमलबजावणी आणखी महिनाभराने पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे जीएसटी लागू होण्याची तारीख पुढे ढकलल्याची चर्चाही रंगली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले आहे. जीएसटी १ जुलैपासून देशभरात लागू होणार असून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
  3. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून अर्थ खात्याने राज्य सरकारच्या मदतीने जीएसटीसंदर्भात कार्यशाळा सुरु केल्या आहेत. प्रत्येक व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे असे अर्थ विभागाने म्हटले आहे.
  4. दरम्यान, जीएसटी परिषदेची १६वी बैठक रविवारी पार पडली होती. या बैठकीत अनेक उत्पादनांवरील करांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देताना समितीने ट्रॅक्टरच्या सुट्या भागांवर लावण्यात आलेला २८ टक्के कर कमी करून तो १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला होता.
  5. कॉम्प्युटर प्रिंटरवरील कर २८ वरून १८ टक्क्यांवर तर काजूवरील कर १८ वरून १२ टक्क्यांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


mpsc class

किरकोळ बाजारात भाज्या आणि डाळींच्या किंमती पडल्याने, मे महिन्यात देशाचा महागाईदर २.१८ टक्क्यांवर आला आहे. एप्रिलमध्ये महागाई दर २.९९ टक्के होता. मात्र खाद्यजन्य पदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्याने घट बघायला मिळाली.

२०१२ नंतरचा हा सगळ्यात कमी महागाई दर आहे असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. २०१२ पासून महागाई दरांसंदर्भातली आर्थिक सूची केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येते.

आज ही सूची जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये मे महिन्यात महागाई दर २.१८ टक्क्यांवर आल्याचे सरकारने नमूद केले आहे.

हा देशातला मागील पाच वर्षातला सर्वात कमी महागाई दर असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किरकोळ बाजारात खाद्यजन्य पदार्थांच्या किंमती १.५ टक्क्यांनी पडल्या. त्याचा परिणाम महागाई दर कमी होण्यात झाला आहे. भाज्या आणि डाळींचे दर मोठ्या प्रमाणावर घटले, तर फळांच्या दरात काही प्रमाणात तेजी बघायला मिळाली.

याचसोबत कपडे, घरे, इंधन आणि वीजेचे दरही काही प्रमाणात खाली आले ज्यामुळे महागाई दर कमी झाला असेही सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सूचीमध्ये म्हटले आहे.

जून ते सप्टेंबर २०१७ या काळात भारतात जर ७० टक्के पाऊस झाला तर महागाई आणखी नियंत्रणात येईल. डाळींचे दर १९.४५ टक्क्यांनी कमी झाले, तर भाज्यांचे दर १३ टक्क्यांनी पडले.

या सगळ्याचा परिणाम व्याजदरांवरही होऊ शकतो. ऑगस्टमध्ये होणाऱ्या द्वैमासिक धोरणात यासंदर्भात आरबीआय निर्णय करू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


mpsc class in thane

हरियानातील महाविद्यालये व विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विवाहितांना 45 दिवस प्रसूती रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केला.

गर्भवती विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये किंवा विनाअडथळा त्यांना शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील मार्गदर्शक आराखड्यास मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतीच मंजुरी दिली. ""या मार्गदर्शिकेनुसार विवाहित विद्यार्थिनीला एका वेळी सलग 45 दिवस प्रसूती रजा घेता येईल.

यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून विभागप्रमुखांची परवानगी घ्यावी लागेल.

या रजेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींना संबंधित शैक्षणिक संस्थांमधील वर्गांना उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन नसले तरी, नियोजित सर्व प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतील,'' अशी माहिती शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी दिली.

 


mpsc class 2018

  1. हीना सिद्धू आणि जितू रायने गॅबाला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या एअर पिस्तूल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धा प्रकाराचा टोकियो ऑलिंपिकमध्ये समावेश होणार असला, तरी या  कामगिरीची नोंद अद्याप पदक क्रमवारीत होत नाही.
  2. सुवर्णपदकाच्या लढतीत रशियाने ४-० अशी आघाडी घेत भारतास धक्का दिला; पण रोनक पंडितचे मार्गदर्शन लाभलेल्या भारतीय जोडीने या पिछाडीनंतर रशियाला ७-६ असे चकवले. ‘‘माझी आणि जितूची अंतिम फेरीत कामगिरी कायम उंचावते. 
  3. वैयक्तिक दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू; तसेच हीनाची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली होती. जितू बारावा आला होता; तर हीना नववी. मात्र या अपयशाची भरपाई दोघांनी मिश्र स्पर्धेत केली. या प्रकारातील त्यांचे हे दुसरे विश्‍वकरंडक सुवर्णपदक आहे. दिल्ली स्पर्धेतही त्यांनी हे सुवर्णपदक जिंकले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्यांनी अंतिम फेरीत रशियाच्या जोडीला ७-६ असे पराजित केले.
  4. भारतीय जोडीने प्राथमिक फेरीपासून हुकमत राखली. त्यांनी ४८५ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला होता. यात हीनाचा वाटा २४२ गुणांचा होता; तर जितूचा २४३ गुणांचा. या चुरशीच्या स्पर्धेत सर्बिया, युक्रेन आणि चीन ४८२ गुणांसह संयुक्त दुसरे आले होते. प्राथमिक फेरीत आठवे आलेल्या रशियाने अंतिम फेरीत भारतासमोर खडतर आव्हान उभे केले. अंतिम फेरीच्या टप्प्यात अव्वल क्रमांक मिळवताना भारताने (२४०.७) रशियाला (२३९.८) मागे टाकले. 


Top