MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार नाबाद 254 धावा केल्या.

2. तर त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने 600 धावांपार मजल मारली. 601 धावांवर भारताने डाव घोषित केला.

3. तसेच कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 336 चेंडूत 254 धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने 33 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराटने या खेळीसह कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

4. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच 250 धावांचा टप्पा ओलांडला. यासह विराटने ‘250+ क्लब’मध्ये प्रवेश केला.

5. कसोटी क्रिकेटमध्ये 250 धावांचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत विराटने स्थान पटकावले.

6. तर या यादीत चार वेळा 250 पेक्षा अधिक धावा करून माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग अव्वल आहे. याशिवाय, करूण नायर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी एकदा हा पराक्रम केला. त्या यादीत विराटने स्थान मिळवले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने 59व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

2. दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय द्युतीने 11.22 सेकंद अशी कामगिरी नोंदवत या वर्षी आशियाई स्पर्धेत रचलेला 11.26 सेकंदांचा विक्रम मागे टाकला.

3. तर पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमिया कुमार मलिक सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने मलेशियाच्या जोनाथन अनाकमायेपा याला मागे टाकत 10.46 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग याने कांस्यपदक प्राप्त केले.

4. तसेच एमपी. जबीर याने 400 मीटर अडथळा शर्यतीत 49.41 सेकंद अशी वेळ देत स्पर्धाविक्रमाची नोंद केली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

2. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

3. तर शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे.

4. तसेच 2019 चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्‍या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतात ब्रिटिश सरकारने सन 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

2. क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला.

3. क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 मध्ये झाला.

4. सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले.


Top