Two decades after India's successful Pokhran nuclear test

 1. सन 1998 मध्ये 11 मे या दिवशी भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिनिधीत्वात ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2) ही दुसरी अणुचाचणी यशस्वी केली होती.
 2. तेव्हा अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे भाभा अणू संशोधन केंद्राचे (BARC) संचालक होते.
 3. भारतीय इतिहासातली एक मुख्य घटना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले सर्वात मोठे यश म्हणून दरवर्षी 11 मे रोजी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो.
 4. पोखरण अणुचाचण्या:-
  1. इंदिरा गांधी यांनी प्रथम 1974 साली अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता.
  2. ऑपरेशन 'स्माइलिंग बुद्धा' अंतर्गत पहिली अणु-चाचणी (पोखरण-1) घेतली गेली.
  3. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात भारताने अणुचाचण्या केल्या.
  4. पोखरण क्षेत्रात 5 अणुचाचण्या केल्यानंतर भारत पहिला असा अणुशक्ती संपन्न देश बनला, ज्याने अण्वस्त्रांचा प्रसार रोखणारी संधि (NPT) यावर स्वाक्षरी केलेली नव्हती.
 5. अणुचाचण्या नंतर भारतापुढील आव्हाने:-
  1. पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील अणू-होड ही वैश्विक शांततेच्या दृष्टीने धोकादायक होती, कारण पाकिस्तानने देखील या स्पर्धेत भाग घेतलेला होता.
  2. त्या घटनांनंतर भारतावर अनेक देशांकडून मुख्यताः अमेरिकेकडून अनेक आर्थिक प्रतिबंध लादले गेले होते.
  3. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि शांततेच्या बाबतीत त्याचा दृष्टीकोण याबाबत सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले होते.
 6. त्यानंतरचे काही मुख्य घटनाक्रम:-
  1. आलेल्या दुराव्यानंतर भारत-अमेरिका संबंध सुधारण्यामध्ये अमेरिकेतले परराष्ट्र सचिव आणि भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  2. मनमोहन सिंग आणि जॉर्ज बुश जूनियर यांच्या भेटीत भारत NPT वर स्वाक्षरी न करताच सर्व व्यावहारिक हेतूंसाठी अणु-मंचावर जागा बनवीत होता.
  3. 18 जुलै 2005 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या संयुक्त घोषणापत्रात यासंबंधी दुजोरा देण्यात आला.
  4. त्यानंतर भारताने काही न्यूक्लियर रिएक्टरांना इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA) अंतर्गत देशात ठेवले आणि आण्विक पुरवठादार गट (NSG) या अणू-व्यापार व तंत्रज्ञानाच्या भागीदार देशांच्या प्रमुख गटापासून मुक्तता प्राप्त केली.
  5. सप्टेंबर 2008 मध्ये NSG पासून सूट मिळाल्याने भारतावरील तीन दशकांहून अधिक काळापासून लादण्यात आलेल्या वैश्विक बंदीना हटविण्यात आले, जे 1974 आणि 1998 साली अणु-चाचणीनंतर भारतावर लादण्यात आले होते.
  6. त्यानंतर भारताला सिव्हीलियन न्यूक्लियर तंत्रज्ञानासाठी व्यापाराचे हक्क देखील मिळालेत.
  7. भारत सरकारने जून 2017 मध्ये 9000 मेगावॉट क्षमतेचे 12 रिएक्टर आणि रिएक्टरांच्या प्रशासकीय मान्यता आणि वित्तीय मंजूरी दिली.
  8. अलीकडेच भारत आणि जपान संबंधातून शांतता राखण्याच्या उद्देशाने अणुऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक करार करण्यात आला, ज्याअंतर्गत जपान भारतात आण्विक तंत्रज्ञानाची निर्यात करू शकणार.
  9. यासोबतच NPT वर स्वाक्षरी न केलेला भारत असा करार करणारा पहिला देश ठरणार आहे.
  10. वर्तमानात अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, फ्रान्स, नामिबीया, अर्जेंटिना, कॅनडा, कझाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरही भारताने अणुकरार केलेला आहे.
 7. आज भारत सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
 8. भारतीय अर्थव्यवस्था $2.6 लक्ष कोटी (जवळजवळ 170 लक्ष कोटी रुपये) पर्यंत पोहचलेली आहे, जी फ्रांसपेक्षा अधिक आहे.
 9. आज जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.


 Indian Pharmacopoection Commission approved modern animal free trial for medicines

 1. भारतीय औषधीकोश आयोगाने (IPC) औषधांसाठी आधुनिक पशु-मुक्त चाचणी मंजूर केली आहे. या निर्णयामुळे औषधीनिर्माता उद्योग आता आधुनिक पशु-मुक्त चाचणी पद्धतीचा वापर करू शकतील.
 2. औषधनिर्मितीसाठी प्राण्यांवर होणार्‍या प्रयोगांपासून त्यांना संरक्षण देण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला गेला आहे.
 3. आदेशानुसार, पायरोजन चाचणीला जिवाणू-रोधी एंडोटॉक्सि न चाचणी या एका मोनोसाइट सक्रियकरण चाचणीद्वारे (activation test) प्रस्थापित केले जाईल, ज्यांना टेस्ट ट्यूब पद्धतीने संपन्न केले जाऊ शकते.
 4. हा आदेश 1 जुलै 2018 पासून भारतात लागू होईल.
 5. ‘इंडियन फार्माकोपिया’च्या 2018 सालच्या आवृत्तीत भारतात उत्पादित आणि विक्री केल्या जाणार्‍या औषधांच्या चाचणीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत.
 6. नवीन मार्गदर्शक तत्त्वे:- 
  1. सश्यांवर होणार्‍या पायरोजेन चाचणीला आणि गिनी पीग (डुकर) व उंदरांवर होणार्‍या अब्नोर्मल टॉक्झिसिटी चाचणीला बदलून या चाचणींच्या जागी आता परीक्षण नळींमध्ये (टेस्ट ट्यूब) चाचण्या चालवल्या जाऊ शकतात.
  2. पशु-चाचण्या संशोधकांना असंख्य रोगांचा अभ्यास करण्यास मदत करतात. चाचणी दरम्यान, प्राण्यांमध्ये कृत्रिमरित्या रोग प्रेरित केले जातात आणि प्रयोग चालवले जातात.
  3. मानवी रोगांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात प्रयोगशाळेत वेगवेगळे रोग कृत्रिमरित्या तयार केले जातात.
  4. यामुळे संशोधकांना मानवी शरीरात रोग कशा प्रकारे विकसित होतात यावरील संकेत मिळविण्याकरीता विविध पशु-चाचण्या करून नवीन औषधे विकसित केली जातात.
 7. भारतीय औषधीकोश आयोग:-
  1. भारतीय औषधीकोश आयोगाने (Indian Pharmacopoeia Commission) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.
  2. याची 1945 साली स्थापना करण्यात आली.
  3. याचे मुख्यालय उत्तरप्रदेशाच्या गाजियाबाद शहरात आहे.  
  4. भारताने IPC देशांमध्ये औषधींचे मानदंड तयार केलेले आहेत. ते मूलभूत कार्यांसाठी नियमितपणे या क्षेत्रात प्रचलित रोगांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे मानदंड नियमितपणे अद्ययावत करतात.
 8. भारतीय कायदा:-
  1. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम-1940 हा कायदा भारतामधील सौंदर्य प्रसाधने व औषधांची निर्मिती, वितरण, आयात या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवते.
  2. देशात या सामुग्रींची सुरक्षितता, प्रभावी आणि गुणवत्तेचे निकष पूर्ण करणे हे कायद्याने ध्येय आहे.
  3. पशू-प्रयोग निरीक्षणार्थ प्रयोजन समिती (CPCSEA) प्रयोगांदरम्यान पशूंच्या बाबतीत अधिक अत्याचार होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी जबाबदार आहे.


Top