Playing the National Anthem in the cinema is not compulsory - the Supreme Court

 1. चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच आंतरमंत्रालयीन समितीला सहा महिन्यात नवे नियम जाहीर करण्याचे आदेश दिलेत.
 2. चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी आता राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे नसेल.
 3. न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य केले होते, ज्यातून केवळ शारिरीकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली होती. त्या आदेशात भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेत खंडपीठाने बदल करत हा निर्णय दिला आहे. 
 4. मात्र यासंदर्भातला अंतिम निर्णय केंद्र सरकारने स्थापन केलेली 12 सदस्यीय समिती घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही समिती पुढच्या सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. 
 5. मात्र सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्याची अनिवार्यता तोपर्यंत पाळली जाणार, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आपल्या आदेशात दुरूस्ती करत त्यामध्ये सवलत देत नाही किंवा आंतरमंत्रालय समितीचा अहवाल तयार होत नाही.
 6. गृहमंत्रालयाचे विशेष सचिव बी. आर. शर्मा यांच्या नेतृत्वात 12 सदस्यीय आंतरमंत्रालयीन समिती विद्यमान कायद्यात जर बदल करण्याची आवश्यकता भासल्यास तसेच सिनेमागृहात आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजविण्यासंबंधी अंतिम निर्णय घेतील आणि गरज पडल्यास शिफारस करतील.
 7. 1 डिसेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात चित्रपट सुरू करण्याअगोदर राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे आहे यासंबंधी देशभरातील सर्व चित्रपटगृहासाठी आदेश दिला. या आदेशन्वये, राष्ट्रगीत दरम्यान सर्व उपस्थित उभे राहतील आणि पडद्यावर राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित केला जाणार आहे.
 8. हा निर्णय न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि अमिताभ रॉय यांच्या खंडपीठाने दिला आहे. खंडपीठाने राष्ट्रीय सन्मानाचा अपमान रोखण्याचा कायदा, 1951 अन्वये हा निर्णय दिला आहे.
 9. त्यानंतर, 9 डिसेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीतावरील त्यांच्या आदेशामध्ये सुधारणा केली आणि देशभरात सिनेमा हॉलमध्ये चित्रपट प्रदर्शनाआधी गायल्या जाणार्‍या गीतावेळी शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना उभे राहण्यापासून सूट दिली आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
  1. आर्थिक फायदा किंवा कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यासाठी यामध्ये व्यावसायिक फायदा घेतला जाणार नाही. म्हणजेच, कोणताही व्यावसायिक फायदा किंवा इतर कोणताही फायदा करून घेण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी व्यक्तीकडून राष्ट्रगीताचा वापर केला जाऊ नये.
  2. राष्ट्रगीतामध्ये कोणत्याही प्रकारचा नाटकीपणा राहणार नाही आणि ते कोणत्याही कार्यक्रमाचा भाग म्हणून समाविष्ट केले जाऊ नये. राष्ट्रगीताचे नाट्यीकरण प्रदर्शन करण्यास विचार करणे हे पूर्णपणे अकल्पनीय आहे.
  3. राष्ट्रगीत किंवा त्याचा काही भाग कोणत्याही वस्तूवरछापल्या जाणार नाही आणि अशा कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित केले जाणार नाही,ज्यामुळे त्याचा अनादर होईल आणि लज्जास्पद बाबठरू शकते. राष्ट्रगीताचे गायन हे राष्ट्रीय ओळख, राष्ट्रीय एकात्मता आणि घटनात्मक राष्ट्रभक्ती प्रदर्शित करते.
  4. भारताच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू करण्याआधी राष्ट्रगीत गायन झाले पाहिजे आणि सभागृहामधील सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीताला आदरार्थ उभे राहणे भाग आहे.
  5. चित्रपटगृहाच्या पडद्यावर राष्ट्रगीत गायनाआधी, चित्रपटगृहाचे दरवाजे बंद राहतील,जेणेकरून कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. राष्ट्रगीत झाल्यानंतर, दरवाजे उघडतील.
  6. राष्ट्रगीत गायनादरम्यान चित्रपटगृहात पडद्यावर राष्ट्रीय ध्वज झळकेल.
  7. कोणत्याही कारणास्तव कोणाकडूनही तयार केलेली राष्ट्रगीताची संक्षिप्त आवृत्ती गायली किंवा प्रदर्शित केली जाणार नाही.
 2. भारताचे राष्ट्रगीत:-
  1. भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नोबेल विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे.
  2. 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानिक सभेने हिंदी भाषेत भाषांतर केलेले हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
  3. 27 डिसेंबर 1911 रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सत्रात सार्वजनिकरित्या गायिले गेले.


Appeal against Section 377 IPC has been referred to a larger bench

 1. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 याच्या विरोधात परस्पर सहमतीने दोन वयस्कांच्या समलैंगिक संबंधांना गुन्हा न मानण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
 2. सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर गंभीरपणे चर्चा होण्यासाठी ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे संदर्भित केली आहे.
 3. भारतीय सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
 4. याचिकेनुसार IPC कलम 377 ही असंवैधानिक असल्याचे मानले जात आहे.
 5. यापूर्वी 2009 साली दिल्ली उच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हाच्या श्रेणीमधून हटविण्याचा निर्णय दिला होता.
 6. या निर्णयाला बदलत 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने वयस्क समलैंगिकांच्या संबंधांना अवैध ठरवले होते.

IPC कलम 377

 1. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अनुसार, अनैसर्गिक गुन्ह्यांचा हवाला देते असे म्हटले गेले आहे की कोणताही पुरुष, स्त्री वा पशुसोबत निसर्गाच्या विरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास, या गुन्ह्यादाखल त्या व्यक्तीस आजीवन कारावास दिला जाणार किंवा एक निश्चित कालावधी, जो 10 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो आणि त्यावर रोख दंड देखील आकारला जाईल.
 2. सर्वसाधारणपणे लैंगिक गुन्हे तेव्हाच गुन्हे मानले जातात जेव्हा शोषित व्यक्तीच्या सहमती शिवाय केले गेले असेल.
 3. मात्र कलम 377 च्या व्याख्येत कुठेही सहमती वा असहमती शब्दांचा वापर केला गेलेला नाही. यामुळे समलैंगिकांच्या सहमतीने प्रस्थापित केल्या गेलेल्या लैंगिक संबंधांना देखील गुन्ह्याच्या श्रेणीत मानल्या जाते.
 4. कलम 377 ला 1860 साली इंग्रजांकडून भारतीय दंड संहितेत समाविष्ट केले गेले होते. त्यावेळी ख्रिस्ती धर्मातही अश्या संबंधाना अनैतिक मानले जात होते.
 5. मात्र 1967 साली ब्रिटनने देखील समलैंगिक संबंधांना अधिकृत मान्यता दिली.


India's first multi-petaphlop supercomputer dedicated to 'Pratyosh' nation

 1. पुण्यामध्ये भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर 'प्रत्‍यूष' राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे.
 2. 'प्रत्‍यूष' मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरला ‘भारतीय हवामानशास्त्र संस्‍था (IITM), पुणे’ येथे प्रस्थापित केले गेले आहे.
 3. ज्याच्या माध्यमातून भुविज्ञान मंत्रालयाकडून अचूक हवामान अंदाज मिळण्यास मदत होईल.
 4. 'प्रत्‍यूष' मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरची उच्च प्रदर्शन कंप्यूटिंग (HPC) क्षमता 6.8 पेटाफ्लॉप आहे, जी कित्येक अब्जावधी गणना एका सेकंदात करू शकते.
 5. ब्रिटन (20.4 पेटाफ्लॉप), जापान (20 पेटाफ्लॉप) आणि अमेरिका (10.7 पेटाफ्लॉप) यांच्यानंतर भारत हवामान अंदाजासंबंधी देखरेख कार्यांसाठी HPC क्षमता ठेवणारा चौथा देश बनला आहे.


Telangana TIHCL obtains approval to work as NBFC

 1. तेलंगणा इंडस्ट्रीयल हेल्थ क्लिनिक लिमिटेड (TIHCL) ला बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) च्या रूपात नोंदणी आणि कार्य करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवानगी प्राप्त झाली आहे.
 2. तेलंगणा इंडस्ट्रीयल हेल्थ क्लिनिक लिमिटेड (TIHCL) हा तेलंगणा राज्य शासनाचे एक उपक्रम आहे.
 3. हे राज्याच्या मालकीचे आणि सह-वित्तीय NBFC ठरणार आहे.
 4. बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) ही कंपनी कायदा-1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असते, जी कर्ज आणि सावकारी व्यवसाय, समभागांची खरेदी, स्टॉक, बॉण्ड्स भाडे-खरेदी, विमा व्यवसाय किंवा चिटफंड व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत असते.
 5. मात्र यात अश्या कोणत्याही संस्थेचा समावेश होत नाही, ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती, औद्योगिक क्रियाकलाप किंवा स्थावर मालमत्तेची विक्री, खरेदी किंवा बांधकाम या बाबींचा समावेश आहे.
 6. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून NBFC च्या कामकाजाचे नियमन केले जाते.


Bengali actress Soumitra Chattopadhyay received French 'Legion of Honor' award

 1. प्रसिद्ध बांग्ला अभिनेता सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्स सरकारकडून ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार घोषित झाला आहे.
 2. 82 वर्षीय चट्टोपाध्याय यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अभिजन’, ‘चारूलता’, ‘अरण्येर दिनरात्री’, ‘अशनी संकेत’ आणि अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका वठवलेल्या आहेत.
 3. त्यांनी 1959 साली ‘अपूर संसार’ चित्रपटात रे यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले होते.
 4. ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सन्मान फ्रेंच सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून फ्रान्समध्ये आणि जगातील कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल लेखक आणि कलाकारांना दिला जातो. 
 5. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
 6. याची सुरुवात 1957 मध्ये करण्यात आली होती आणि वर्षातून तीन वेळा दिले जाते.


India's atomic Pvt. Baldev Raj dies

 1. भारताचे अणुवैज्ञानिक प्रा. बलदेव राज त्यांचे ६ जानेवारी रोजी पुणे येथे एका परिषदेसाठी आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 2. त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला पण नंतर ते बंगलोरला स्थायिक झाले. रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी व नंतर बंगलोरच्या आयआयएससी या संस्थेतून पीएचडी केली.
 3. त्यांचे बहुतांश संशोधन अणुक्षेत्रात असले तरी पदार्थ विज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान व विज्ञानविषयक धोरणे यांवरही त्यांनी बरेच काम केले होते.
 4. वैज्ञानिक राजनय व वैज्ञानिक धोरण यात त्यांनी सरकारला मोठी मदत केली.
 5. अणुशक्ती विभागात ते ४५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी एकूण ८० पुस्तके, १३०० शोधनिबंध व १०० लेख लिहिले आहेत.
 6. सध्याच्या काळात ऊर्जा, पाणी, आरोग्य सुविधा, उत्पादनक्षमतेत वाढ अशा बहुअंगी आव्हानांचा वेध त्यांच्या संशोधनाने घेतला.
 7. सोडियम फास्ट रिअ‍ॅक्टर्स व त्याच्याशी संबंधित इंधनचक्र याचे संशोधन त्यांनी केले. तसेच वेल्डिंग करोजन, फेरोफ्लुइड्स व सेन्सर्स हेदेखील त्यांचे संशोधनाचे विषय होते.
 8. कलपक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रीसर्च या संस्थेत त्यांनी काम केले होते. सध्या ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेचे संचालक होते.
 9. इंटरनॅशनल न्यूक्लियर एनर्जी अ‍ॅकॅडमी, इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग इंटरनॅशनल अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले.
 10. कलपक्कम येथे संशोधन करताना त्यांनी फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टर व फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर या दोन्ही प्रकारच्या अणुभट्टय़ांची प्रारूपे तयार करण्यात यश मिळवले.
 11. अणुसाहित्य, यांत्रिकी, नॅनोसायन्स (अब्जांश तंत्रज्ञान), रोबोटिक्स या क्षेत्रात अनेक संस्था उभ्या करण्यात त्यांचा वाटा होता.
 12. पद्मश्री, होमी भाभा सुवर्णपदक, एच के फिरोदिया पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, वासविक पुरस्कार, इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा जीवनगौरव, गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.


Top