India ranked 44th in the Intellectual Property Index of US Chamber of Commerce

 1. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) निर्देशांकात भारताने एका स्थानाने वर चढत 44 व्या क्रमांकावर जागा मिळवलेली आहे. हा निर्देशांक 50 देशांसाठी तयार केला गेला आहे.
 2. यावर्षी मूल्यमापनात भारताला 40 पैकी 12.03 गुण मिळाले आहेत, जेव्हा की मागच्या पाचव्या आवृत्तीत भारताला 35 पैकी 8.75 गुण मिळाले होते.
 3. ठळक बाबी:-
  1. निर्देशांकात 37.98 गुणांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ब्रिटन (37.97 गुण) आणि स्वीडन (37.03 गुण) यांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे.
  2. भारताने यावेळी संगणकीय प्रणालीमध्ये शोधांचे पेटंट आणि नोंदणी प्रक्रियामध्ये बदलासाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत.
  3. जुलै 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संगणकीय शोधांच्या परिक्षणासाठी मार्गदर्शिकांमुळे भारतामध्ये तांत्रिक नवकल्पनांमध्ये पेटंट घेण्याविषयीच्या वातावरणात सुधारणा झालेली आहे.
  4. याचबरोबर, सरकारने अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमध्ये IP संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आणि तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आणि राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरणाची अंमलबाजवणी केलेली आहे.
  5. मात्र तरीही भारताला अर्थपूर्ण पूरक सुधारणांची आवश्यकता आहे.

बौद्धिक संपदा बाबत

 1. बौद्धिक संपदा संबंधी अधिकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपदेच्या रक्षणार्थ वापरले जातात.
 2. या अंतर्गत पुस्तक, कविता, वैज्ञानिक वा तंत्रज्ञान आधारित शोध, औद्योगिक वा कृषी संबंधी शोध, प्रसारण, चित्रपट वा अश्या वस्तू ज्यांची रचना मौलिक रूपाने मनुष्यबळाद्वारे केली गेलेली असेल, अश्या संपदेचे बौद्धिक संपदा अधिकार राखून ठेवले जातात.  
 3. कल्पकता आणि नवनिर्मितीच्या संरक्षणासाठी पुढील साधनांचा वापर करतात:- 
  1. ट्रेडमार्क - ट्रेडमार्क कोणत्याही बोधचिन्ह, प्रतीक, शब्द, रंजक, जिंगल, चित्रे, ध्वनी आणि सुगंध किंवा या सर्व वस्तूंचे मिळतेजुळते रूप असू शकते, ज्याचा वापर कोणत्याही संरचना/सेवांना इतर संरचना/सेवापासून वेगळे दर्शविण्यासाठी केला जातो. ट्रेडमार्क कोणत्याही विशेष वस्तू/सेवाला विशिष्ट ओळख प्रदान करतो आणि दुसर्‍यांना त्याची नक्कल करण्यास परावृत्त करतो.
  2. पेटंट - पेटंट कोणत्याही व्यक्ती वा कंपनी/संघटनेच्या रूपात व्यक्तींच्या समूहाला प्रदान केला जाणारा अधिकार आहे, जो त्यांना कोणत्याही शोधापासून वा त्या संबंधित विनिर्माण प्रक्रियेपासून लाभ मिळविण्याचे अधिकार देतो. पेटंट कोणत्याही अर्जदाराच्या देशाच्या सरकारद्वारा प्रदान केला जातो आणि शोधकर्त्याला एका मर्यादित कालावधीसाठी त्याचे अधिकार मिळतात.
  3. कॉपीराइट - कॉपीराइट हे कल्पक साहित्यिक कार्य जसे पुस्तक, कादंबरी, काव्यरचना, गीत, संगणकीय प्रोग्राम आदींचे संरक्षण करण्याचे साधन आहे. या रचना अस्तित्वात येताच रचनाकर्त्याची संपत्ती बनते.
  4. डिजाइन - डिजाइन कोणत्याही उत्पादनाचे संपूर्ण वा आंशिक स्वरूप असते, जे त्याचे रंग, रूप, आकार वा कोणत्याही उत्पादनाची सामुग्री वा त्याच्या पॅकेजिंगची विशेषता प्रदर्शित करते.


Honor by Narendra Modi's 'Grand Collar' from the President of Palestine

 1. पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कॉलर’ देऊन सन्मान केला.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या चार देशांच्या दौर्‍यात जॉर्डननंतर पॅलेस्टाईनकडे प्रस्थान केले. 
 3. भेटी दरम्यान दोन्ही देशांच्या संबंधांना बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रात करार करण्यात आले आहेत.
 4. नरेंद्र मोदी पॅलेस्टाईनच्या अधिकृत दौर्‍यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
 5. पॅलेस्टाईन हा (अधिकृतपणे पॅलेस्टाईन राज्य) मध्य-पूर्व प्रांतातील एक स्वायत्त देश आहे, या देशाची राजधानी जेरुसलेम (पूर्व) शहर असून अरबी ही अधिकृत भाषा आहे.
 6. देशात इजरायली न्यू शेकेल, इजिप्शियन पाउंड, जॉर्डन दिनार ही चलने वापरली जातात.
 7. पॅलेस्टाईनचा ‘ग्रँड कॉलर’ सन्मान हा एखाद्या देशाच्या राज्याला, राज्याचे प्रमुख किंवा अश्याच प्रकारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तिला दिला जातो.


Signing of Six Bilateral Agreements between India and Palestine

 1. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅलेस्टाईन देशाच्या दौर्‍यादरम्यान राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यासोबत झालेल्या एका द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील पॅलेस्टाईन, UAE आणि ओमान या देशांच्या दौर्‍यावर आहेत.
 3. बैठकीचे फलित म्हणून शेवटी, आरोग्य, शिक्षण अश्या सहा विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
 4. भारत-पॅलेस्टाईन संबंध:-
  1. भारत हा पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला (PLO) "पॅलेस्टाईन लोकांचा एकमात्र वैध प्रतिनिधी" म्हणून मान्यता देणारे प्रथम गैर-अरब देश होता.
  2. भारत आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) यांच्यात 1974 साली पहिल्यांदा संबंध प्रस्थापित झालेत.
  3. 1975 साली नवी दिल्लीत PLO चे कार्यालय स्थापना करण्यात आले आणि मार्च 1980 मध्ये दोन्ही देशांमध्ये पूर्णता राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आलेत.
  4. 18 नोव्हेंबर 1988 रोजी अंगिकारलेल्या घोषणापत्रानंतर भारताने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
भारत व पॅलेस्टाईन यांमधील करार
 1. या करारांची यादी पुढीलप्रमाणे:-
 2. बेथलेहमच्या बेत सहौरमध्ये $30 लक्षच्या गुंतवणुकीतून एक भारत-पॅलेस्टाईन सुपर-स्पेशियलिटी रुग्णालयाची स्थापना
 3. महिलांच्या सशक्तिकरणासाठी $5 कोटीच्या गुंतवणुकीतून ‘तुराथी’ नामक भारत-पॅलेस्टाईन केंद्राची उभारणी
 4. $5 लक्षच्या गुंतवणुकीसह रमल्लामध्ये एक राष्ट्रीय प्रिंटिंग प्रेसची स्थापना
 5. अनुक्रमे $11 लक्ष आणि $10 लक्षच्या गुंतवणुकीसह तुबास प्रांताच्या तमनून आणि मुथालथ अल शौहादा गावांमध्ये दोन शाळांची उभारणी
 6. अबू दीस येथील जवाहर लाल नेहरू स्कूल फॉर बॉयज या शाळेच्या इमारतीमध्ये एक अतिरिक्त माळा तयार करणे


Indra Nooyi - ICC's first female director

 1. 'पेप्सिको'च्या अध्यक्षा आणि CEO इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. यासोबतच, इंद्रा नूयी या ICC च्या प्रथम महिला संचालक बनल्या. त्या जून 2018 पासून पदाचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारतील. 
 3. नूयी यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
 4. इंद्रा नूयी यांची जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये गणना होते.
 5. ICC ने जून 2017 मध्ये स्वतंत्र संचालकपदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव मान्य केला होता.
 6. 'स्वतंत्र कार्यभार एका महिलेला देण्यात यावा' अशी अट या प्रस्तावात होती.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 2. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 3. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 4. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


A national meeting was organized in New Delhi on 'Grassroot Informatics'

 1. डिजिटल भारत याच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीत 8-10 फेब्रुवारी 2018 या दरम्यान ‘ग्रासरूट इन्फॉर्मेटिक्स’ संदर्भात दुसरी राष्ट्रीय बैठक (VIVID 2018) आयोजित करण्यात आली आहे.
 2. "सायबर सेक्युरिटी अँड इनोवेशन" या विषयाखाली ही बैठक राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) कडून आयोजित करण्यात आली आहे.
 3. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
 4. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre -NIC) याची 1976 साली स्थापना करण्यात आली.
 5. तेव्हापासून ही संस्था “ई-शासन/ई-प्रशासन" याचे मुख्य बांधकाम व्यावसायिक म्हणून तळागाळ पातळीवर तसेच शाश्वत विकासासाठी डिजिटल संधीचा प्रवर्तक म्हणून उदयास आली आहे.
 6. ‘NICNET’ या त्याच्या ICT जाळ्याच्या माध्यमातून, याचे केंद्र सरकारची सर्व मंत्रालये/विभाग, 36 राज्यशासन/केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सुमारे 708 जिल्हा प्रशासनाशी संस्थात्मक संबंध आहेत. 


International Union Council of Medical Research in New Delhi

 1. 10-11 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्लीत ‘मुख्य प्रवाहात आरोग्य सेवांमध्ये युनानी चिकित्सा प्रणालीचे एकीकरण’ या विषयाखाली आंतरराष्ट्रीय युनानी चिकित्सा परिषद भरविण्यात आली.
 2. युनानी चिकित्सा क्षेत्रातले प्रसिद्ध हकीम अजमल खाँ (जन्म: 11 फेब्रुवारी) यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्रीय युनानी चिकित्सा संशोधन परिषद (CCRUM) च्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली.
 3. युनानी चिकित्सा क्षेत्राला उद्योगांशी जोडण्याकरिता संशोधन व विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी या परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली गेली.
 4. या प्रसंगी, बांग्लादेशमध्ये वैद्यकीय क्षेत्रात युनानी प्रणालीला "शैक्षणिक" स्वरूप देण्याकरिता CCRUM आणि हमदर्द विद्यापीठ (बांग्लादेश) यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.
 5. 11 फेब्रुवारी 1868 ला जन्मलेले प्रसिद्ध हकीम अजमल खाँ यांचा जन्मदिवस भारतात युनानी दिवस म्हणून पाळला जातो.
 6. हकीम अजमल खान एक प्रसिद्ध भारतीय युनानी चिकित्सक होते आणि ते युनानी चिकित्सामध्ये वैज्ञानिक शोधाचे संस्थापक होते.


Top