Honor of 'Time' for Ion Grillot

 1. यंदाच्या वर्षी ह्य़ूस्टन येथे वर्णविद्वेषातून गोळीबारात श्रीनिवास कुचीभोटला या भारतीय तंत्रज्ञाचा गोळीबारात मृत्यू झाला. त्या वेळी हल्लेखोराच्या काही गोळ्या अंगावर झेलणारा अमेरिकी नागरिक आयन ग्रिलॉट याचा 'टाइम' नियतकालिकाने गौरव केला आहे.
 2. या घटनेत कुचीभोटला याचा सहकारी आलोक मदासानी हा जखमी होऊन वाचला होता.
 3. २०१७ मध्ये आशेचा किरण ठरलेले नायक म्हणून ज्या पाच जणांची नावे टाइम नियतकालिकाने घेतली आहेत त्यात ग्रिलॉट याचे नाव आहे.
 4. नौदलाचा माजी अधिकारी असलेल्या अ‍ॅडम प्युरींटन याने फेब्रुवारीत कन्सासमधील ओलाठ येथे एका बारमध्ये कुचीभोटला व त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळीबार सुरू असताना अमेरिकी नागरिक ग्रिलॉट हा मदतीसाठी धावून गेला व त्याने काही गोळ्या अंगावर झेलल्या, त्यात तो जखमी झाला होता.
 5. 'टाइम' नियतकालिकाने कन्सास येथील ग्रिलॉट याचा सन्मान करताना त्याला 'खरा अमेरिकी नायक' अशा शब्दात गौरवले असून भारतीय अमेरिकी समुदायाने त्याला कन्सास येथे त्याच्या मूळ गावी घर घेण्यासाठी १ लाख डॉलर्सची मदत केली होती.


The UN denied the United States of America's decision to be Israel's capital

 1. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) अमेरिकेच्या प्रशासनाने अलीकडेच घेतलेल्या जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्यासंबंधीचा निर्णय अमान्य केला आहे.
 2. या मुद्द्यावरून उठलेल्या विवादासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आपल्या आपातकालीन बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
 3. जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत. दोनही देश जेरुसलेम हा आपल्या देशाचा भाग असून आपली राजधानी असल्याचा दावा वारंवार करत आहेत.
 4. यहुदी धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे मुख्य ठिकाण म्हणून जेरुसलेम शहराची ओळख असल्याने हा आंतरराष्ट्रीय विवादाचा मुद्दा बनत आहे.


International Human Rights Day 10 December

 1. दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
 2. या वर्षी 'लेट्स स्टँड अप फॉर इक्वेलिटी, जस्टीस अँड ह्यूमन डिगनीटी' या विषयाखाली हा दिवस साजरा केला गेला आहे. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) याचे हे ७० वे वर्ष आहे.
 3. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात तसेच पॅरीस मधील पॅलेस डे चाएलोट येथे '# स्टँडअप 4 ह्यूमन राइट' या वर्षभर चालणार्‍या मोहिमेला सुरुवात केली गेली आहे.
 4. मानवी अधिकार किंवा मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्यप्राण्यांचे मूलभूत अधिकार आहेत, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, रहिवासी, लिंग, राष्ट्रीय, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो.
 5. वैश्विक मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, करार, सरावपद्धती, सर्वसाधारण तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे अन्य स्रोत अश्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.
 6. १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये (UNGA) मानवाधिकाराचे सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights) अंगिकारले गेले. मानवाधिकारांचे सार्वत्रिक घोषणापत्र आज जगातील ५०० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे
 7. त्यानंतर १९५० साली, UNGA मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून १० डिसेंबर हा दिवस साजरा करण्यासंबंधी ठराव 423 (V) पारित केला गेला.
 8. निर्वासित किंवा स्थलांतरित, अपंग, LGBT व्यक्ती, स्त्री, मूलं, स्थानिक, अल्पसंख्याक तसेच भेदभाव किंवा हिंसाचाराचा याचा धोका असलेल्या व्यक्ती अश्या समाजातील विविध घटकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
 9. मानवाधिकार उच्चायुक्त (High Commissioner for Human Rights) हे मुख्य संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकार कार्यकारी मंडळ आहे. हे अधिकृत कार्यालय जगभरात या दिवशी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावते.


International mountains day: 11th December

 1.  दरवर्षी 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ साजरा करण्यात येतो.
 2. या वर्षी हा दिवस "माउंटन्स अन्डर प्रेशर: क्लायमेट, हंगर अँड मायग्रेशन" या संकल्पनेखाली राबवला गेला आहे.
 3. हवामानातील बदल, भूमीची निकृष्टता, शोषण तसेच वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे पर्वत धोक्यात आले आहेत.
 4. अश्या गंभीर परिस्थितीला जगापुढे मांडण्यासाठी यावर्षी पर्वतांवर होणारे विपरीत परिणामासंबंधी जनजागृती केली जात आहे. 
 5. पृथ्वीवरील सुमारे 22% पृष्ठभाग हा पर्वतीय प्रदेशांनी आच्छादलेला आहे.
 6. या पर्वतीय प्रदेशात जगभरातील 13% म्हणजेच 915 दशलक्ष लोकसंख्या निवास करते.
 7. पर्वतीय प्रदेशांचा जगाच्या शाश्वत विकासामध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 8. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) नुसार, जगातील 669 पर्यावरण-अनुकूल संरक्षित क्षेत्रांपैकी 376 म्हणजेच 56% क्षेत्रांमध्ये पर्वतीय पर्यावरण आढळते. 
 9. शिवाय, खाली पायथ्याशी असलेल्या जगात अप्रत्यक्षरित्या अब्जावधी लोकांना लाभ देते.
 10. जगात 91% पर्वतीय रहिवासी विकसनशील देशांमध्ये वास्तव्यास आहेत, जिथे बहुसंख्य दारिद्र्यरेषेखाली जगतात आणि प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला अन्न असुरक्षिततेचा धोका आहे.
 11. पर्वत जगातील 60-80% ताजे पाणी पुरवतो, ज्याविना दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलनाचे लक्ष्य साधणे शक्य नाही.
 12. नाविकरणीय ऊर्जा प्रदान करण्यासाठी पर्वत एक प्रमुख भूमिका निभावतात, विशेषत: जलविद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस यांच्याद्वारे.
 13. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (UNGA) 2002 हे UN आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून जाहीर केले होते.
 14. त्याप्रसंगी आमसभेने वर्ष 2003 पासून दरवर्षी 11 डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ ​​म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.


Cristiano Ronaldo is honored with the honor of the 'Ballon d'Or'

 1. पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलन डी ऑर’ हा मानाचा पुरस्कार पटकाविला आहे.
 2. या पुरस्काराच्या शर्यतीत अर्जेंटीनाचा मेस्सी हा दुसऱ्या तर ब्राझीलचा नेयमार हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
 3. रिअल माद्रिदच्या रोनाल्डोने सलग दुसऱ्या पुरस्कारासह सर्वाधिक वेळा हा पुरस्कार पटकावणाऱ्या बार्सिलोनाच्या लियोनेल मेस्सीशी (५ पुरस्कार) बरोबरी साधली आहे.
 4. रोनाल्डो यापूर्वी २००८, २०१३ , २०१४ आणि २०१६ साली या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
 5. त्याने मागील मोसमात सर्व स्पर्धांमध्ये मिळून ४२ गोल नोंदवले. त्याचप्रमाणे युरोपियन वर्ल्ड कप पात्रता फेरीमध्येही त्याने १५ गोल केले.
 6. चॅम्पियन्स लीगच्या गेल्या सत्रात रोनाल्डो गोल नोंदवण्यात अव्वलस्थानी होता. त्याच्या जोरावर माद्रिदने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकाविले होते.
 7. त्याचप्रमाणे, ला लीगा स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वाखाली रियाल माद्रिदने विजेतेपद निश्चित केले होते.
 8. फुटबॉलच्या मैदानातील प्रतिष्ठित पुरस्काराशिवाय रोनाल्डोने यावर्षी ‘प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देखील पटकवला आहे.


'Bodhi festival: BIMSTEC festival of Buddhist heritage' celebrations

 1. 8 ते 10 डिसेंबर 2017 या दरम्यान नवी दिल्लीत ‘बोधी पर्व: BIMSTEC फेस्टिवल ऑफ बुद्धिस्ट हेरिटेज’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
 2. 2017 हा BIMSTEC समुहाचा 20 वा स्थापना वर्ष आहे.
 3. त्या निमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने बौद्ध वारसावर आधारित तीन दिवसीय महोत्सव आयोजित केला गेला.
 4. भारताच्या ‘शेजारी पहिले (Neighbourhood First)’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ या विदेशी प्राधान्यकृत धोरणाचा हा एक भाग आहे.
 5. 6 जून 1997 रोजी बँकॉकमध्ये बांग्लादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड यांच्याकडून BIST-EC हा एक नवीन उप-प्रादेशिक गट स्थापन करण्यात आला.
 6. याचे मुख्यालय ढाका, बांग्लादेश येथे आहे.
 7. बहु-क्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation -BIMSTEC) हा बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सात देशांचा समूह आहे.
 8. बंगालच्या उपसागरालगत असलेल्या दक्षिण आशियाई आणि दक्षिण-पूर्व आशियायी देशांत विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्य चालवण्याच्या उद्देशाने हा समूह तयार करण्यात आला.


Top

Whoops, looks like something went wrong.