MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशांतर्गत स्पर्धासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत परवानगी घेण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या नियमाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जोरदार आक्षेप घेतला आहे.

2. इंडियन प्रीमियर लीग किंवा रणजी करंडकासह अन्य देशांतर्गत स्पर्धासाठी आयसीसीकडून परवानग्या मागण्याची बीसीसीआयची इच्छा नाही.

3. आंतरराष्ट्रीय खेळाडूने आपल्या पालक मंडळाने आयोजित केलेल्या ट्वेन्टी-20 लीगसह फक्त एकाच आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळावे, असा आयसीसीचा नवा नियम प्रस्तावित आहे.

4. तर आयसीसीने हा नवा नियम बनवला असून आयपीएल, बिग बॅश तसेच रणजी करंडकासह शेकडो देशांतर्गत स्पर्धासाठी संलग्न असलेल्या जगातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आयसीसीची परवानगी घेण्याचे सुचवले आहे.

5. तसेच देशांतर्गत स्पर्धाचे आयोजन करताना आयसीसीची भूमिका ही फारच छोटी असते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप, हरकती आणि निरीक्षणे आयसीसीला कळवली आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

2. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय.

3. धोनीने सध्या 2 महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-सेहवान जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

2. विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत.

3. भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नीती आयोगाने वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (WTI) पुरस्कारांची चौथी आवृत्ती सुरू केली आहे. पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्षेपणानंतर लगेचच जाहीर केले जातील.

2. या वर्षाच्या पुरस्काराची थीम ‘महिला आणि उद्योजकता’ आहे, जी WTI अवॉर्ड्स 2018 च्या थीमच्या संलग्नतासह आहे. यावेळेस व्हॉट्सअॅपने WTI अवॉर्ड्स 2019 साठी निती आयोगसह सहकार्य केले आहे. 
3. विजेत्यांना देण्यासाठी 1,00,000 अमेरिकन डॉलर्स इतके सहाय्य केले जाईल. पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्षेपणानंतर लगेचच जाहीर करण्यात येईल.

4. वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (डब्ल्यूटीआय) पुरस्काराबद्दल माहिती :

• निती आयोग संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहकार्याने दरवर्षी भारतातील महिला उद्योजकांना सन्मानित करण्यासाठी याचे आयोजन केले जाते. 
• हे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (डब्ल्यूईपी) अंतर्गत सुरु केले गेले आहे. 
• संपूर्ण भारतातील अनुकरणीय महिलांच्या कथांना ओळखणे आणि साजरे करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय हत्ती दिन

2. 12 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिन

3. 12 ऑगस्ट 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.

4. पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी 12 ऑगस्ट 1953 मध्ये करण्यात आली.

5. नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – 1 12 ऑगस्ट 1960 मध्ये ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.


Top