UN फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ याला भारताने अंगिकारले

भारत सरकारद्वारा ‘यूनायटेड नेशन्स फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या तत्त्वांना अंगिकारले आहे.

तत्त्वे :-

 1. आधिकृत आकडेवारी (Official statistics) हे प्रजातांत्रिक समुदाय, शासनात सेवा देणे तसेच आर्थिक, जनसांख्यिकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय स्थितींविषयीच्या माहितीसह अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य याविषयीच्या माहिती प्रणालीमध्ये अपरिहार्य घटक प्रदान करते. शेवटी, अधिकृत माहितीधारकांकडील ही अधिकृत आकडेवारी सार्वजनिकरित्या नागरीकांना उपलब्ध करणे देणे.
 2. अधिकृत आकडेवारीबाबत विश्वास राखण्यासाठी, सांख्यिकी माहितीचे संकलन, त्यावर प्रक्रिया, त्याची साठवण आणि त्यांना सादर करण्यासाठी पद्धती आणि प्रक्रिया यांवरील वैज्ञानिक तत्त्वे आणि व्यावसायिक नैतिकता यांच्या समावेशासह गंभीरतेने व्यावसायिक विचारांनुसार सांख्यिकीय व्यावसायिकांनी निर्णय घेणे आवश्यक आहे.
 3. माहितीबाबत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, सांख्यिकीय संस्थांनी आकडेवारीच्या स्त्रोत, पद्धती आणि प्रक्रियांवरील वैज्ञानिक मानकांनुसार माहिती सादर करणे.
 4. सांख्यिकीय संस्था या आकडेवारीच्या चुकीच्या अर्थांवर आणि गैरवापराबद्दल टिप्पणी करण्यास अधिकृत आहेत.
 5. सांख्यिकीय हेतूसाठीची माहिती सर्व प्रकारच्या स्त्रोतांपासून घेतली जाऊ शकते, मग ते सांख्यिकीय सर्वेक्षणे असो किंवा प्रशासकीय नोंद. गुणवत्ता, मर्यादित अवधी, उत्तरदायित्व असलेल्यांवरील खर्च आणि भार या बाबींना अनुसरून स्रोताची निवड सांख्यिकीय संस्था करतील.
 6. सांख्यिकीय संकलनासाठी सांख्यिकीय संस्थांकडून संकलित केलेली वैयक्तिक माहिती, मग ती नैसर्गिक असो किंवा कायदेशीर व्यक्तीसंदर्भात असो, ती पूर्णपणे गोपनीय असणे आवश्यक आहे आणि केवळ सांख्यिकीय उद्देशांसाठी वापरली जाणार.
 7. ज्या अंतर्गत सांख्यिकीय प्रणाल्या चालतात अशी कायदे, नियम आणि उपाययोजना सार्वजनिकरित्या जाहीर केले जाईल.
 8. सांख्यिकीय प्रणालीमध्ये सुसंगतता आणि कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी देशांतर्गत सांख्यिकीय संस्थांमधील समन्वय आवश्यक आहे.
 9. प्रत्येक देशातल्या सांख्यिकीय संस्थाकडून आंतरराष्ट्रीय संकल्पना, वर्गीकरण आणि पद्धती यांचा होणारा वापर हा सर्व सरकारी स्तरावर सांख्यिकीय प्रणालीची सुसंगतता आणि कार्यक्षमता वाढवते.
 10. आकडेवारीमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य हे सर्व देशांतील अधिकृत आकडेवारीच्या यंत्रणेच्या सुधारणेस हातभार लावते.

भारताचा फायदा:-

 1. ही तत्त्वे देशाच्या सांख्यिकीय प्रणालीमध्ये चांगल्या पद्धती विकसित करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. याशिवाय माहिती संकलनात आणि प्रसारित करण्याच्या पद्धतींविषयी व्यावसायिक स्वातंत्र्य, निःपक्षता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रणालीमध्ये वेळोवेळी अनेक योजना आणि राजशिष्टाचार विकसित केल्या जात आहेत.
 2. सांख्यिकीय माहितीमुळे शासकीय व्यवस्थापनाविषयी अधिक प्रभावीपणे माहिती प्रदर्शित केली जाते. यामुळे आकड्यांच्या प्रदर्शनातून एखाद्या योजनेची यशस्वीता तपासली जाऊ शकते. देशाच्या प्रगतीशील दृष्टीकोनासाठी देशात स्पर्धात्मकता विकसित होणे आवश्यक असते. यामुळे आकड्यांमधील दिसणारी तफावत व्यक्तिमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करते.

UN फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स:- 

 1. 1971 साली ‘कॉन्फरन्स ऑफ युरोपियन स्टॅटिस्टिशियन्स’ ने प्रथमच ‘फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ दस्तऐवज तयार केले आणि अंगिकारले.
 2. पुढे युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशनने 11-15 एप्रिल 1994 पार पडलेल्या विशेष सत्रात या दस्तऐवजाला अनुसरून आपले संशोधित असे ‘यूनायटेड नेशन्स फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ हे दस्तऐवज तयार केले आणि अंगिकारले. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव ‘68/261’ मंजूर करून 29 जानेवारी 2014 मध्ये या दस्तऐवजाला मान्यता दिली.


गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ६३ बालमृत्यू

 1. उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने गेल्या ५ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
 2. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर के मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.
 3. बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
 4. या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स कंपनीची ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.
 5. या कंपनीने १ ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता.
 6. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्ट रोजी या हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, त्या दिवशीही ९ रुग्ण मरण पावले होते.
 7. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहे.


Top