sidhivinayak temple tapal ticket

 1. भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प‘ या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 2. मुख्यमंत्री म्हणाले, सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहील. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल.
 3. या वेळी टपाल विभाग व सिद्धिविनायक न्यास संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. या योजनेअंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचे छायाचित्र सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध झाली .


blind chess competition won by goa sanjay kavlekar

 1. गोव्याचे संजय कवळेकर यांनी येथील कालिकादेवी सभागृहात आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय मानांकित अंध बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला.
 2. तर महाराष्ट्राचे अमित देशपांडे हे द्वितीय स्थानी राहिले.
 3. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सहा राज्यातील शंभरपेक्षा अधिकखेळाडूंनी सहभाग तर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे 25 पुरूष आणि पाच महिला खेळाडूंची गुजरात येथे 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय ब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 4. त्यात महाराष्ट्राच्या अमित देशपांडे, सचिन वाघमारे, अमोल सकपाळ, विकास शितोळे, वैशाली सालावकर, अनिरूध्द खुंटे, दत्तात्रय वाडेकर, कार्तिक दामले, सुनील ससाणे, रोशन दिवारे, सतीश वाहुळे, आशिष रोकडे, तीजन गवर, शोभा लोखंडे, रितू टेंभूर्णीकर, मृणाली पांडे यांचा समावेश आहे.


apsara activated at trombay

 1. अप्सरा’ ही आशियातली पहिली संशोधन अणुभट्टी ऑगस्ट 1956 मध्ये ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित झाली होती.
 2. पाच दशकांहून अधिक काळाच्या अविरत सेवेनंतर 2009 मध्ये ती बंद करण्यात आली.
 3. अप्सरा अस्तित्वात आल्यापासूनच्या सुमारे 62 वर्षांनंतर जलतरण तलावासारखी अधिक क्षमता असलेली संशोधन अणुभट्टी ‘अप्सरा-अपग्रेडेड’ ट्रॉम्बे येथे 10 सप्टेंबर 2018 रोजी संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी अस्तित्वात आली.
 4. अणुभट्टी स्वदेशी बनावटीची असून एलईयूपासून होणाऱ्या चकतीसारख्या डिस्पर्जन इंधन घटकाचा वापर करते.
 5. वैद्यकीय उपाययोजनासाठी रेडिओ आयसोटोप्स, अणुभौतिकशास्त्र, भौतिक विज्ञान आणि विकिरण संरक्षण यातील संशोधनासाठी या अणुभट्टीचा उपयोग होईल.


Top