State Food Security Scheme launched in Odisha

 1. ओडिशा सरकारने अलीकडेच राज्य अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या २५ लाख गरीब लोकांना ही योजनेचा लाभ होईल.
 2. गांधी जयंतीच्या प्रसंगी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी २ ऑक्टोबर रोजी बोलंगीर, बालासोर, सुंदरगड आणि मयूरभंज येथे ही योजना सुरू केली.
 3. उर्वरित जिल्ह्यांमध्ये या योजनेची सुरूवात राज्यातील खासदार आणि आमदारांनी केली.
 4. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट न केलेले लोक राज्य अन्न सुरक्षा योजनेचे मुख्य लाभार्थी असतील.
 5. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ १ रुपये प्रतिकिलो दरानेदेण्यात येईल.
 6. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा २०१३मध्येही अशीच तरतूद करण्यात आली असून, सध्या ओडिशातील ७८ टक्के लोकसंख्या (३.३६ कोटी) याचा फायदा घेत आहे.
 7. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३:- 
  1. या अधिनियमाचा उद्देश, देशातील दोन तृतीयांश लोकांना (७५ टक्के ग्रामीण क्षेत्र आणि ५० टक्के शहरी क्षेत्र) सवलतीच्या दराने अन्न पुरविणे आहे.
  2. या योजनेमध्ये गहू, तांदूळ आणि भरडधान्ये अनुक्रमे ३, ३ आणि २ रुपये प्रतिकिलो दरानेलोकांना उपलब्ध करून दिले जात आहे.
  3. याशिवाय गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुले यांना माध्यान्ह भोजन आणि एकीकृत बाल विकास योजनेअंतर्गत पोषक अन्न पुरवले जातात.
  4. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना ६००० रुपयांपेक्षा अधिक मातृत्व लाभही देण्यात येतो.


Pune's largest diamond dome in the world

 1. जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोणी काळभोर (पुणे) येथे करण्यात आले.
 2. याची निर्मिती महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे.
 3. हा घुमट असलेल्या प्रार्थनागृहाला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे नाव देण्यात आले असून, याचा व्यास १६० फूट आणि उंची २६३ फूट आहे.
 4. आतापर्यंत ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वात मोठे तीर्थस्थळ असलेल्या व्हॅटिकनमधील चर्चच्या घुमटाचा व्यास हा सर्वाधिक म्हणजे १३९.६ फुट होता.
 5. मात्र विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज सभागृहाचा घुमट आता जगातील सर्वात मोठा घुमट ठरला आहे.
 6. सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी या घुमटाची निर्मिती करण्यात आली असून, या घुमटाच्या चारही बाजूंना जगभरातील ५४ तत्त्ववेत्ते आणि महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.


JIMEX 18: india-japan marine maneuvers

 1. भारत-जपानच्या संयुक्त सागरी युद्धाभ्यास जिमेक्स १८च्या तिसऱ्या आवृत्तीला आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरूवात झाली.
 2. जिमेक्स १८चा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये एकमेकांमधील कार्यक्षमता आणि समुद्री सुरक्षा सहयोग वाढविणे आहे.
 3. जिमेक्स १८:- 
  1. या युद्धाभ्यासाचे आयोजन ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये ४ दिवस बंदरांवर तर ४ दिवस समुद्रात असा २ टप्प्यात सराव केला जाईल.
  2. बंदरावरील सरावात जहाजावरील चमूसोबत योजना आखणी, चर्चा आणि क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
  3. तर सागरी टप्प्यात पाणबुडी विरोधी युद्धसराव, गन फायरिंग आणि क्रॉस चेक हॅलो ऑपरेशन इत्यादींचा समावेश आहे.
  4. या सरावात जपानी नौदलाचे प्रतिनिधित्व कागा (इजुमो श्रेणीतील हेलिकॉप्टर विध्वंसक), इनाजुमा (मार्गदर्शक क्षेपणास्त्र विध्वंसक) आणि एस्कॉर्ट फ्लोटीला यांद्वारे केले जात आहे.
  5. तर भारताचे प्रतिनिधित्व आयएनएस सातपुडा, पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज आयएनएस कदमत, क्षेपणास्त्र कॉर्वेट, आयएनएस शक्ती यांद्वारे केले जात आहे.
  6. याव्यतिरिक्त या सरावात एक पाणबुडी, पी८आय हे लांब पल्ल्याचे समुद्री टेहळणी विमान आणि एक हेलिकॉप्टरही सहभागी होणार आहेत.
 4. पार्श्वभूमी:-
  1. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याच्या उद्देशाने जानेवारी २०१२मध्ये भारत आणि जपान यांच्या नौदलांमध्ये जिमेक्स युद्धाभ्यासाला सुरुवात झाली.
  2. या सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन जपानच्या किनारपट्टीवर करण्यात आले होते. तर यापूर्वीचा सराव डिसेंबर २०१३मध्ये चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता.


NAREDCO's skill training and employment generation agreement

 1. राष्ट्रीय रियल एस्टेट विकास परिषदेने (NAREDCO) शहरी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयासह कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी करार केला आहे.
 2. या करारांतर्गत २.५ लाख लोकांना बांधकाम क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
 3. या भागीदारीमुळे दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत शहरी भागात राहणाऱ्या गरीब लोकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळतील.
 4. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अर्ध-कुशल कामगारांना प्रशिक्षण देणे, हादेखील या कराराचा एक उद्देश आहे.
 5. NAREDCO या कराराच्या अंमलबजावणीचे कार्य करणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात नवीन आणि उच्च प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करेल.
 6. या कार्यक्रमाअंतर्गत, किमान प्रशिक्षण कालावधी १० दिवस (८० तास) आणि जास्तीत जास्त ६ महिने असेल.
 7. राष्ट्रीय रियल एस्टेट विकास परिषद(NAREDCO: National Real Estate Development Council)
  1. स्थापना: १९९८
  2. मुख्यालय: नवी दिल्ली
  3. ही केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त आणि स्वयं-नियामक संस्था आहे.
  4. हे रिअल इस्टेट उद्योगाची उच्चतम राष्ट्रीय संस्था आहे. ही सरकार, रिअल इस्टेट उद्योग आणि जनता यांना विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंच प्रदान करते.
  5. रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि नैतिकतेला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्राला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनविणे, हा या परिषदेचा उद्देश आहे.


Interpol president Meng Hongwei resigns

 1. अचानक बेपत्ता झाल्यामुळे चर्चेत आलेले आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 2. इंटरपोलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी मेंग हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते.
 3. सध्या मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीन ताब्यात घेतले आहे.
 4. इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे मेंग हे पहिले चिनी व्यक्ती आहेत. नोव्हेंबर २०१६मध्ये इंटरपोलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाल २०२०पर्यंत होता.
 5. हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे.
 6. १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दुबईत संघटनेची बैठक होईल, त्यामध्ये नवा प्रमुख निवडला जाईल.
 7. आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना (इंटरपोल):-
 8. INTERPOL: International Criminal Police Organization
  1. स्थापना: १९२३
  2. सदस्य: १९२ देश
  3. मुख्यालय: लिऑन, फ्रांस
  4. इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस सहयोग संस्था आहे.
  5. इंटरपोलची स्थापना १९२३ साली International Criminal Police Commission या नावाने झाली.
  6. यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद, संघटीत गुन्हे आणि सायबर क्राइम यासंबधी गुन्ह्यांची प्रामुख्याने दखल घेतली जाते.
  7. गुन्हेगारीविरुद्ध लढण्याकरता सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संघटना, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन संघासोबत मिळून इंटरपोलची यंत्रणा काम करते.
  8. संघटीत गुन्हे, गुन्ह्यांचे नेटवर्क, अनधिकृत व्यवहार यांना संपुष्टात आणण्यासाठी तसेच कमकुवत समुदायाच्या रक्षणासाठी ही संस्था कार्यरत असते.
  9. देशाची सीमारेषा ओलांडून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी तसेच मानवी तस्करी थांबवण्याकरता इंटरपोलची मदत घेतली जाते.
  10. त्याशिवाय जागतिक स्तरावरील दहशतवादाविरोधात लढण्याचे कार्यही इंटरपोल करते.


Top