Statues of 57 Indian soldiers in France

 1. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रान्समधील लॅव्हेन्टी या शहरात नव्याने उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण 11 नोव्हेंबर रोजी, सैन्य दिनानिमित्त झाले.
 2. 1918 मध्ये पहिले महायुद्ध संपल्याच्या स्मरणार्थ हा दिन पाळला जातो. 
 3. ब्रिटिश सैन्यातून लढताना हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांना फ्रान्समधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये दफन केलेले आहे.
 4. या ठिकाणांजवळ अशी 57 स्मृतिस्थळे उभारण्याची योजना ‘इंटर फेथ शहिदी कोमेमोरेशन असोसिएशन‘ (आयएफएससी) या संस्थेने आखली आहे. त्यापैकी हा सात फुटी कांस्य पुतळा पहिलेच स्मारक आहे.
 5. तर लॅव्हेन्टी येथील दोन मृतावशेष हे 39व्या रॉयल गढवाल रायफल्सच्या जवानांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे गेल्या वर्षी पुन्हा लष्करी इतमामात दफन करण्यात आले होते.
 6. फ्रान्सच्या भूमीत चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांचे अशा सर्व 57 ठिकाणी पुतळे उभारण्याच्या प्रकल्पाला लॅव्हेन्टीतून प्रारंभ झाला आहे.


'gaj' hurricane in Bay of Bengal

 1. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या गज या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, पुढील दिवसांत त्याची तीव्रता वाढणार आहे.
 2. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 3. दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार गज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
 4. चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
 5. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने या परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
 6. महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश असल्याने कोकण, मुंबई विभाग वगळता इतर ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्याने थंडी अवतरली आहे.
 7. अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली आला आहे. चक्रीवादळाच्या स्थितीत राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.


Sebi will keep the market through the companies

 1. बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सेबी (सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आता विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांची मदत घेणार आहे.
 2. सेबी विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांच्या मदतीने बाजारावर नजर ठेवणार आहे.
 3. तर इतर कंपन्यांमध्ये एसेंचर सोल्युशन, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेज इंडिया, हेलवेट पेकार्ड एंटरप्रायजेस (इंडिया), ईआईटी सर्व्हिसेज इंडिया आणि तरावू टेक्नॉलाजीचा समावेश आहे.
 4. सेबीची या कंपन्यांच्या मदतीनं डेटा स्टोरेज क्लाऊड, ब्रोकर्सवर नजर ठेवून आकलन करणे, विश्लेषण क्षमतेचा विस्तार करण्याची इच्छा आहे.
 5. या कंपन्यांमुळे सेबीला डाटा मायनिंग (माहिती हुडकून काढणे), हेरगिरीची साधने विकसित करण्यासह सायबर हल्ले रोखण्यास मदत मिळणार आहे.
 6. तसेच नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिग्रहण सौद्यात छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सेबीने या कंपन्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे.
 7. तसेच नवीन प्रवर्तकांमार्फत छोट्या गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या मूल्यांबाबत स्वतंत्रपणे आकलन केले जाणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.