1. तुलसी गबार्ड यांना वर्ष 2018 मध्ये शिकागो (अमेरिका) च्या इलिनोइस येथे होणार्‍या दुसरी ‘जागतिक हिंदू कांग्रेस (WHC)’ च्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आहे. ही परिषद 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2017 या काळात आयोजित आहे.
  2. जागतिक हिंदू कांग्रेस या परिषदेचे आयोजन वर्ल्ड हिंदू फाउंडेशनतर्फे केले जाते. दर चार वर्षानंतर आयोजित केले जाणारे WHC हे एक वैश्विक मंच आहे, जेथे हिंदू समुदायाचे व्यक्ती एकमेकांशी त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करतात.
  3. पहिली जागतिक हिंदू कांग्रेस वर्ष 2014 मध्ये नवी दिल्लीत आयोजित केली गेली होती.
  4. अमेरिकेच्या परिषदेमधील पहिली हिंदू मंत्री तुलसी गबार्ड (36 वर्षीय) या हवाईमधून तीनदा अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रेटिक सदस्यच्या रूपात निवडून आल्या. सध्या त्या हाऊस कांग्रेशनल कॉकसच्या सह-अध्यक्ष आहेत.


  1. दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  2. पुण्यातील दंतवैद्यक व दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांच्या कर्णबधीर मुलावर आधारित 'अजान' या लघुपटाला 4 लाख रुपये आणि प्रशस्त‌‌पित्राने गौरविण्यात आले.
  3. मुंबईच्या ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित 'झेब्रा क्रॉसिंग' या टीव्ही स्पॉटला अव्वल पुरस्कारासह 5 लाख रुपये आणि प्रशस्त‌पित्राने तर मुंबईच्याच सीमा आरोळकर दिग्दर्शित 'धीस इज मी' या टीव्ही स्पॉटला व्दितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
  4. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण आणि चित्रपट महोत्सव विभागाच्या वतीने सिरीफोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या 'दिव्यांग सक्षमीकरण लघुचित्रपट स्पर्धा-2017' चे सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते 9 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले.


Top