maharashtra on 13 th position in ease of doing buisness

  1. इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण) आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. 
  2. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. तर हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.
  3. विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश तर नंतर ओडिशाचा क्रमांक लागतो.
  4. पहिल्या वर्षी क्रमवारीत केवळ सात राज्यांनीच सरकारने सुचवलेल्या 50 टक्के सूचना लागू केल्या होत्या. दुसऱ्यांदा 18 राज्यांनी असे केले तर यंदाच्यावेळी 21 राज्य या सूचीत आले होते.
  5. राज्यातील सरकाररे हे इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत अनेक प्रक्रियांऐवजी एक खिडकी पद्धतीवर काम करत आहेत.
  6. सरकारने निर्धारित केलेल्या मानकांनुसार बांधकाम परवाना, कामगार नियमावली, पर्यावरण नोंदणी, जागेची उपलब्धता आणि एक खिडकीचा समावेश आहे.


Top