PANKAJ ADWANI SPORTS

  1. भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावतानाच अडवाणीने 32व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर कब्जा केला. 

  2. अडवाणीच्या खात्यात आता 11 कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपदे, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा ‘सिक्स-रेड’ स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद आणि नऊ वेळा स्नूकरचा विजेता अशी 32 राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने 21 वेळा जागतिक स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत. 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम फेरीवर पूर्णपणे अडवाणीचे वर्चस्व पाहायला मिळाले. अडवाणीने रावतवर 6-0 अशी मात केली.

  3. महिलांच्या अंतिम फेरीत, बेंगळुरूचा वर्षां संजीव हिने महाराष्ट्राचा अरांसा सांचीझ हिला 4-2 अशी धूळ चारत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षांने उपांत्यपूर्व फेरीत अमी कमानी हिला तर उपांत्य फेरीत विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.


CHINUK HELICOPTERS

  1. भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे, कारण अमेरिकेच्या ‘चिनुक‘ हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. 

  2. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर ‘चिनुक‘ हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली. लवकरच ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

  3. सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून 22 अॅपॅचे हेलिकॉप्टर्स व 15 ‘चिनुक’ हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे.

  4. तर याच वर्षी सर्व 15 हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील अशी शक्यता वायुसेनेकडून वर्तवण्यात आली आहे.


JAN DHAN YOJNA

  1. जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव 90 हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे.

  2. अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जन धन खात्यांतील जमा रक्कम मार्च, 2017 पासून स्थिरपणे वाढत असून, आता ती रक्कम 30 जानेवारी रोजी 89,257.57 कोटी झाली आहे. 23 जानेवारी रोजी ही जमा रक्कम 88,566.92 कोटी रुपये झाली आहे.

  3. प्रत्येक घराचे बँकेत खाते असावे, या हेतूने प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) 28 आॅगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारने 28 आॅगस्ट 2018 नंतर जी नवी खाती सुरू केली त्यांच्यासाठी अपघात विम्याचे संरक्षण एक लाखांऐवजी दोन लाख रुपये केले आहे. या खात्यातील ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही दुप्पट करून 10 हजार रुपये केली गेली आहे.


DIN VISHESH

  1. लंडन विद्यापीठाची स्थापना 11 फेब्रुवारी 1826 मध्ये झाली.

  2. सन 1830 मध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

  3. पोप पायस (11वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झालेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर सन 1929 मध्ये राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

  4. पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सन 1979 मध्ये अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.


Top